FilmsFilms NewsHindiHomeMarathi

“रक्षाबंधनाच्या दिवशी विसरा सगळी भांडणं आणि कटकट त्यासाठी पहा बहीण भावाच्या नात्याचं भावविश्व दाखविणारे हे काही सुंदर चित्रपट…..”

Written by : आकांक्षा कोलते

Updated : ऑगस्ट 10, 2022 | 10:10 PM

“रक्षाबंधनाच्या दिवशी विसरा सगळी भांडणं आणि कटकट…

 त्यासाठी पहा बहीण भावाच्या नात्याचं भावविश्व दाखविणारे हे काही सुंदर चित्रपट…..”

      “एखादं विशेष नातं, सण आणि सिनेमा” हे नेहमीच जुळून आलेलं समिकरण. म्हणजे बहुतांश सिनेमात कोणत्या ना कोणत्या सणाच्या निमित्ताने एखादं नातं खूप छान पद्धतीने उलगडून दाखवतात. एखादा सिन बघताना आपण आपसूकच भावनिक होऊन जातो. तो सिन बघताना आपल्याला आपली माणसं, आपली नाती आठवतात. मग आई, वडील, वा प्रेयसी / प्रियकर असेल.  त्यापैकीच एक नातं म्हणजे बहीण भावाचं.

        बॉलिवूड असो वा मराठी चित्रपटसृष्टी, बहीण भावाच्या नात्यावर आधारित असे बरेच चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झाले आहेत. आज रक्षाबंधनच्या निमित्ताने तुम्हाला अशाच काही छान चित्रपटांची नावं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

       रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा असा सण. आणि हेच नातं दृढ करण्यासाठी, तुमच्या नात्यातील प्रेमाची उजळणी करण्यासाठी “जगभरून फिल्म्स”  चा हा रक्षाबंधन विशेष लेख.

       चला तर मग बघूया असे कोणते मराठी हिंदी चित्रपट आहेत जे आजच्या दिवशी तुम्ही बघू शकता. 

Rakshabandhan%20hardik%20shubhecha
रक्षाबंधन

 

१. एलिझाबेथ एकादशी

२०१४  सीबीएफसी :- यू    कालावधी : – १ तास ३० मिनिटे 
शैली : – नाटक, साहसी, परिवार                                       
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films) ” रेटिंग : – 4.0 / 5
लेखक                       : – मधुगंधा कुलकर्णी 
दिग्दर्शक                   : – परेश मोकाशी 
कलाकार                   : – श्रीरंग  महाजन, सायली भंडारकवठेकर, नंदिता धुरी 

          “बांगड्या गरम…. बांगड्या गरम” असा  “चहा गरम..चहा गरम” च्या लयीमधला डायलॉग असलेला एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट पाहिला नसेल असा मराठी प्रेक्षक विरळाच. विज्ञान आणि श्रद्धा यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटात बहीण भावाच्ं गोड नातं पाहायला मिळतं. अत्यंत गरिबीत वाढणारी मुक्ता(सायली बांदाकवठेकर) आणि ज्ञानेश(श्रीरंग महाजन) ही भावंडं आपल्या आईला मदत करण्यासाठी काय काय करतात. प्रसंगी खोटं बोलून एकमेकांना सांभाळतात. त्यांचे हे गोड प्रयत्न बघताना खूप भावूक व्हायला होतं. पंढरपूर मधील वातावरण घरबसल्या अनुभवायला मिळतं. अजून काय हवं..? 

      २०१४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही तुम्हाला “झी 5” वर विनामूल्य बघता येईल.माझ्याकडून या चित्रपटाला  ५ पैकी ४.५ रेटिंग देईन.

     

२. खारी बिस्किट

२०१९  सीबीएफसी :- यू    कालावधी : – १ तास ४६ मिनिटे 
शैली : – नाटक                                                                  
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films) ” रेटिंग : – 3.5 / 5          
लेखक                       : –  संकेत माने 
दिग्दर्शक                   : –  संजय जाधव 
कलाकार                   : – संजय नार्वेकर, सुशांत शेलार, अस्मिता आजगांवकर       

           नाही नाही खाण्याच्या खारी बिस्किटांबद्दल नाही बोलत आम्ही. हा एक अतिशय सुंदर असा २०१९ साली प्रदर्शित झालेला संजय जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. आपल्या दृष्टीहीन छोट्या बहीणीची , खारीची(वेदश्री खाडिलकर) सारी स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास असलेला तिचा भाऊ बिस्कीट(अथर्व कदम) तिच्यासाठी नक्की नक्की काय काय करतो हे बघताना आपसूकच आपले डोळे पाणावतात.

        २०११ साली झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपचा आधार घेऊन हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. हाच वर्ल्डकप चा सामना बघण्याचा म्हणजेच अनुभवण्याचा खारीचा हट्ट बिस्कीट कसा पूर्ण करतो हे बघण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी हा चित्रपट नक्कीच बघा. अथर्व आणि वेदश्री चा अभिनय बघून नक्कीच त्यांच्या प्रेमात पडाल. “झी 5” वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ पैकी ३.५ रेटिंग देईन. 

३. अनन्या

२०२२  सीबीएफसी :- यू / ए    कालावधी : – २ तास २ मिनिटे 
शैली : – नाटक                                                               

“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films) ” रेटिंग : – 4.1 / 5    
लेखक                       : –  प्रताप फड  
दिग्दर्शक                   : –  प्रताप फड 

कलाकार                   : – हृता दुर्गुळे, अमेय वाघ, चेतन चिटणीस     

              नुकताच म्हणजेच २२ जूलै २०२२ रोजी प्रदर्शित झालेला अनन्या हा प्रेरणादायी चित्रपट तुम्ही या रक्षाबंधन दिवशी तुमच्या भावंडांसोबत नक्कीच बघू शकता. 

              हा चित्रपट बघताना तुम्हाला जाणवेल की आपल्या बहिणीला/ भावाला त्यांच्या पडत्या काळात, अडचणीच्या काळात आपल्या आधाराची किती गरज असते. धनंजय देशमुख ( सुव्रत जोशी )हा अनन्या च्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. एका मोठ्या अपघातात आपले हात गमावल्यानंतर आपल्या भावाकडून प्रेम आणि आधाराच्या ऐवजी जेव्हा तिरस्कार आणि उपहास मिळतो तेव्हा मनाची होणारी बिकट अवस्था हृताने आपल्या अभिनयातून अचूक व्यक्त केली आहे. हे बघताना आपल्याकडून कधी काही चुकलं असेल तर त्याची जाणीव नक्कीच होईल.

           हृता दुर्गुळेला अनन्या च्या भुमिकेत बघताना तिच्या अभिनयाची ताकद दिसून येते. एकंदरच आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा आपली भावंड, कुटुंब यांचा आधार सगळ्यात जास्त महत्वाचा हे चित्रपट बघताना प्रकर्षाने जाणवतं. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ पैकी ४ रेटिंग देईन.

४. माहेरची साडी

१९९१  सीबीएफसी :- यू    कालावधी : – २ तास १९ मिनिटे 
शैली : – नाटक                                                              
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films) ” रेटिंग : – 3.5 / 5            
दिग्दर्शक                   : –  विजय कोंडके
कलाकार                   : – रमेश भाटकर अलका कुबल, विजय चव्हाण, अजिंक्य देव  

         १९९१ साली प्रदर्शित झालेला माहेरची साडी हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भाऊ बहीणीच्या नात्याविषयी चित्रपट म्हटलं की माहेरची साडी हे नाव सगळ्यात आधी आठवत. या चित्रपटा शिवाय ही यादी अपूर्ण राहील. या चित्रपटात अलका कुबल आणि अजिंक्य देव यांनी बहिण भावाच्ं नातं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. 

      हा चित्रपट बघताना मोठी माणसं, तेव्हाचा काळ अनुभवलेल्या स्त्रिया आजही तेवढंच रडतात. हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य. याच चित्रपटामुळे अलका कुबल यांची मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण झाली. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ पैकी ३.५ रेटिंग देईन.

५. हॅप्पी जर्नी

२०१४  सीबीएफसी :- यू / ए     कालावधी : – २ तास १० मिनिटे 
शैली : – नाटक                                                                       
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 2.9 / 5   
लेखक                       : – सचिन कुंडलकर
दिग्दर्शक                   : – सचिन कुंडलकर 
कलाकार                   : – अतुल कुलकर्णी, प्रिया बापट कृतिका देव 

           हॅप्पी जर्नी हा वेगळ्याच धाटणीचा सिनेमा 

२०१४ साली प्रदर्शित झाला होता. प्रिया बापट आणि अतुल कुलकर्णी यांची जबरदस्त केमिस्ट्री असलेली भावा बहिणीची जोडी या चित्रपटात पाहायला मिळते. मृत्यु नंतर सुद्धा बहीण भावाचं किती घट्ट असतं ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे. अवखळ, अल्लड अशी प्रिया बापट आणि तेवढाच जबाबदारचं ओझं पेललेला भाऊ अतुल कुलकर्णी यांनी या चित्रपटात अतिशय सुंदर अभिनय केला आहे. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ पैकी ३.५ रेटिंग देईन.

६. बम बम बोले.

२०१०  सीबीएफसी :- यू     कालावधी : – २ तास ५ मिनिटे 
शैली : – नाटक / रहस्य / परिवार                                         
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.0 / 5
लेखक                       : – मनीषा कोरडे (स्क्रीनप्ले)
दिग्दर्शक                   : – प्रियदर्शन 
कलाकार                   : – अतुल कुलकर्णी, रितुपर्ण सेनगुप्ता, दर्शील सफारी 

        हा सिनेमा म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही पाहीला तरी डोळ्यांत पाणी आणणारा. २०१० साली प्रदर्शित झालेला हा हिंदी सिनेमा भाऊ बहीणीच्या गोड नात्यातील समंजसपणा ठळकपणे दर्शवतो. पिनूच्या हातून (दार्शिल साफरी)  आपल्या छोट्या बहीणीच्या, रिमझिमच्या( झिया) चप्पलचा जोड हरवतो. आणि ते आपल्या वडिलांना कळू न देता काही दिवस ते दोघं बहीण भाऊ चप्पलचा एकच जोड दोघांत मिळून कसा वापरतात आणि आपल्या चिमुकल्या बहीणीला नवीन चप्पल घेऊन देण्यासाठी हा छोटासा भाऊ काय करतो ते अतिशय सुंदररीत्या आणि हळुवारपणे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. युट्युब, जिओ सिनेमा तसेच मॅक्स प्लेयर या प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही फ्रि बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५ पैकी ४ रेटिंग देईन.

७. सरबजीत

२०१६  सीबीएफसी :- यू / ए     कालावधी : – २ तास ११ मिनिटे 
शैली : – नाटक                                                                        
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films) ” रेटिंग : – 3.5 / 5
पथकथा                    : – उत्कर्षिणी वशिष्ठा, राजेश बेरी 
दिग्दर्शक                   : – उमंग कुमार 
कलाकार                   : – ऐश्वर्या राय बच्चन, रणदीप हुडा, रिचा चड्डा 

       सरबजीत हा एक हिंदी चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. ऐश्वर्या राय आणि रणदीप हुडा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एका खऱ्या कहाणीवर बनवण्यात आलेला आहे. सरबजीत सिंग हा भारतीय चुकून एकदा दारुच्या नशेत भारत पाकिस्तान ची सीमा ओलांडून पाकिस्तान मध्ये जातो आणि पाकिस्तानी सैन्याकडून पकडलि जातो आणि मग पुढे दलबिर ही त्याची बहीण त्याला सोडवण्यासाठी काय प्रयत्न करते. आपलं अख्खं आयुष्य त्याला न्याय मिळवून देण्यासाठी खर्च करते. 

      बहीण भावासाठी काहीही करू शकते हे या चित्रपटातून खूप सुंदररित्या दाखवलं आहे. हा चित्रपट बघताना तुमच्या बहीणी बद्दल असलेला आदर अजून वाढेल आणि भावाबद्दल असलेली काळजी, प्रेम अजून दाटून येईल यात अजिबात शंका नाही. ॲमेझॉन प्राईमवर हा सिनेमा तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५✰ पैकी ४.८✰ रेटिंग देईन. 

८.हम साथ साथ है

१९९९  सीबीएफसी :- यू      कालावधी : – २ तास ५७ मिनिटे 
शैली : – नाटक / परिवार                                                    
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.3 / 5
लेखक                       : –  सुरज बर्जत्या (संवाद)
दिग्दर्शक                   : – सुरज बर्जत्या 
कलाकार                   : – सलमान खान, सैफ अली खान, करिष्मा कपूर, मोहनीश बहाल, तब्बू, सोनाली बेंद्रे 

      १९९९ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे. कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित हा सिनेमा बघताना कधीच कंटाळा येत नाही. सलमान खान, सैफ अली खान, मोहनीश बहल हे तीन भाऊ आणि एकुलती एक लाडकी बहिण निलिम कोठारी यांच्या नात्यांची सुंदर गुंफण या चित्रपटात दाखवली आहे.

   बहीणीवर संकट आल्यावर सगळे भाऊ मिळून कसे पाठीशी उभे राहतात हे या चित्रपटात पाहायला मिळतं. हा चित्रपट तुम्हाला तुमच्या सुंदर आठवणींच्या काळात घेऊन जातो. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला, माझ्याकडून या चित्रपटाला  ५✰ पैकी ४.५✰ रेटिंग देईन.

 ९. इक्बाल

२००५  सीबीएफसी :- यू      कालावधी : – २ तास १२ मिनिटे 
शैली : – नाटक / परिवार                                                         
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 4.1 / 5
लेखक                       : –  नागेश कुकुनूर, विपूल के नायर (कथा)
दिग्दर्शक                   : – नागेश कुकुनूर 
कलाकार                   : – शेयर्स तळपदे, नसरूडदीन शाह, प्रतीक्षा लोणकर       

 २००५ साली प्रदर्शित झालेला “इक्बाल” हा हिंदी सिनेमा क्रिकेट खेळावर आधारित आहे. मुकबधीर असलेल्या आपल्या भावाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहचवण्यासाठी त्याची बहीण त्याला कशाप्रकारे प्रोत्साहन देते ते या सिनेमात दाखवण्यात आले आहे. श्रेयस तळपदे याची प्रमुख भूमिका असून श्वेता प्रसाद बासू त्याची छोटी बहीण दाखविली आहे. “झी 5” या ॲपवर हा सिनेमा तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला, माझ्याकडून या चित्रपटाला  ५✰ पैकी ४.५✰ रेटिंग देईन.

१०. भाग मिल्खा भाग

२००५  सीबीएफसी :- यू      कालावधी : – २ तास १२ मिनिटे 
शैली : – नाटक / बायोपीक / खेळ                                         
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 4.2 / 5
लेखक                       : – प्रसून जोशी 
दिग्दर्शक                   : – राकेश मेहरा

कलाकार                   : – फरहान अख्तर, दिव्या दत्ता, जपतेज सिंग.   फरहान अख्तर, दिव्या दत्ता, जपतेज सिंग. 

        २०१३ साली प्रदर्शित झालेला हा अतिशय रोमांचक असा हिंदी चित्रपट आहे. भारतीय धावपटू व पद्मश्री पुरस्कार विजेता मिल्खा सिंग ह्याच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

       भारत पाकिस्तान फाळणी मधल्या अनेक निर्वासित कुटुंबापैकी एक म्हणजे मिल्खा सिंग यांचं कुटुंब. अख्ख्या कुटुंबांमध्ये फक्त एकटेच वाचलेले मिल्खा सिंग यांचा जिवन प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात त्यांची बहीण आणि त्यांच्यावर चित्रित केलेले सिन बघताना काय वाटतं ते शब्दात मांडणं निव्वळ अशक्य. 

       फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांच्या भुमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. तर दिव्या दत्ता हीने नेहमीप्रमाणे शांत, समंजस आणि भावावर मनापासून प्रेम करणारी, त्याची काळजी करणारी बहीणीची भुमिका सुंदर केली आहे. फक्त बहीण भावाच्या नात्यासाठीच नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जिद्द असेल आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर जिंकता येतं हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा. हॉटस्टार डिस्नी वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५✰ पैकी ४.८✰ रेटिंग देईन. 

 ११. दिल धडकने दो

२०१५  सीबीएफसी :- यू / ए     कालावधी : – २ तास ५० मिनिटे 
शैली : – नाटक / विनोदी / प्रणय                                               
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.0 / 5
लेखक                       : –  झोया अख्तर (पथकथा), रीमा कागटी (पथकथा), जावेद अख्तर (संवाद ) 
दिग्दर्शक                   : – झोया अख्तर 
कलाकार                   : – फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा जोनस, अनिल कपूर,

      २०१५ साली प्रदर्शित झालेला हा हिंदी सिनेमा बऱ्याच लोकांना माहित नसेल. रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा हे दोघं भाऊ बहीणीच्या भुमिकेत आहेत. ज्यांच्या नात्याचा बंध अतिशय घट्ट पण तेवढाच साधा सहज दाखविण्यात आला आहे. 

       कमल मेहरा (अनिल कपूर) आणि नीलम मेहरा (शेफाली शाह) यांच्या लग्नाचा वाढदिवस क्रूजवर साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केलेलं असतं.  क्रूझ वरील प्रवास आणि त्या दरम्यान नात्यातील वीण, चढ उतार सगळंच सगळ्यांना अनुभवायला मिळतं. प्रवासादरम्यान आयुष्यातील एक नवीन धडा घेऊन प्रत्येक जण बाहेर पडतो. हा सिनेमा बघायचा असल्यास नेटफ्लिक्स वर तो पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला  ५✰ पैकी ३✰ रेटिंग देईन. 

 १२. रक्षाबंधन

       अजून एक खुशखबर म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा “रक्षाबंधन” हा चित्रपट आजच “रक्षाबंधनच्याच” मुहूर्तावर प्रदर्शित होतोय. तो बघून आल्यावर तुम्ही आम्हाला जरूर सांगा तुम्हाला तो कसा वाटला. आम्ही ते जाणून घेण्यासाठी उत्सूक आहोत. 

रक्षा बंधन चित्रपटाची पुर्ण समीक्षा वाचण्यासाठी “रक्षाबंधन” वर क्लिक करा.

      चला मग आम्हाला पटापट कमेंट करून सांगा वरीलपैकी कोणते कोणते चित्रपट पाहीले आहेत. आणि नसेल तर यापैकी कोणता चित्रपट पहायला आवडेल ते सुद्धा सांगा.

                                                                                                                                                  धन्यवाद.

लेखक – आकांक्षा कोलते

Akanksha%20Kolte%20bio

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *