राजा शिवछत्रपती टीव्ही मालिका समीक्षा | Raja Shivchhatrapati TV Show Review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 17, 2022 | 6:54 PM
राजा शिवछत्रपती
कालावधी : – २२ मिनिटे ( एक एपिसोड)
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 4.6✰ / 5✰
कथा : – शिरीष देशपांडे
दिग्दर्शक : – हेमंत देवधर
कलाकार : – अमोल कोल्हे, म्रीणल कुलकर्णी, यतीन कार्येकर, नीना कुलकर्णी, अविनाश नारकर
Raja Shivchhatrapati |
संगीतकार : – अजित – अतुल
थीम संगीतकार : – अशोक पत्की
प्रदर्शित तारीख : – २४ नोव्हेंबर २००८ – २००९
वेळ : – २२ मिनिटे ( एक एपिसोड)
भाषा : – मराठी
देश : – इंडिया
कथा :-
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांच्या पुत्र शिवाजी यांचे बालपण, त्यांचे प्रशिक्षण, त्यांची राजनीती, युद्धनीती, प्रजेच्या हक्कासाठी, रक्षणासाठी केलेल्या लढाई, स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक केला. अशा रयतेच्या राजाचा घडलेला जीवन प्रवासाचा इतिहास दाखवला आहे.
समीक्षा :-
इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी “राजा शिवछत्रपती” हि कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीचे रूपांतर एक मालिका मध्ये केले गेले. या मालिकेचे नाव कादंबरी चे आहे तेच राजा शिवछत्रपती ठेवण्यात आले. नितीन देसाई निर्मित आणि हेमंत देवधर दिग्दर्शित राजा शिवछत्रपती मालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचे काम केले आहे. स्टारप्रवाह या चॅनेल वर राजा शिवछत्रपती मालिका लागायची.स्टारप्रवाह या चॅनेल वर राजा शिवछत्रपती मालिका लागायची हि आता तुम्ही राजा शिवछत्रपती हि मालिका हॉटस्टार या ऑटॊटी प्लॅटफॉर्म वर पाहू शकता.
शिवाजी महाराज यांचा जीवन प्रवास दाखवण्यात आला. या मालिके मध्ये छत्रपती शिवाजी महाराज – अमोल कोल्हे, अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांचे दिसणे, चालणे, बोलणे, वागणे, हुबेहूब भूमिका एकवटली आहे. जी प्रेक्षकांना बघण्यास उत्साह निर्माण होतो. राजमाता जिजाबाई – म्रीणल कुलकर्णी, शहाजी राजे – अविनाश नारकर, सईबाई – ऋतुजा देशमुख, सोयराबाई – नीलम शिर्के, औरंगजेब – यतीन कार्येकर, बडी बेगम – नीना कुलकर्णी आणि इतरांनीही केलेल्या भूमिका चांगल्या प्रकारे केल्या आहेत.
सोळाव्या शतकातील गड, किल्ले व आतील रचनेतील सेट उभारून केलेलं काम, त्यांची वस्त्र परिधान, वेशभूषा, अंगावरील असलेले दागिने, लढाई चे शस्त्र, चांगल्या प्रकारे दाखवले आहे.
अजय – अतुल यांनी संगीत दिले आहे. अजय यांनी गायलेले राजा शिवछत्रपती टायटल ट्रॅक सॉंग “रघुकुल राज है” हे गाणे प्रचंड गाजले.
कुठे बघायचे : – राजा शिवछत्रपती टीव्ही मालिका हॉटस्टार या अँप्लिकेशन वर पाहू शकता.