HomeDocumentaryDramaFilmsMarathi

“राजा हरिश्चंद्र” (१९१३) भारतीय पहिला पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य मूक माहितीपट चित्रपट | “Raja Harishchandra” (1913) Indian First full length feature silent Documentary Film

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 7, 2022 | 6:05 PM

राजा हरिश्चंद्र (१९१३)

कालावधी : – ४० मिनिटे   
शैली : – माहितीपट, इतिहास,                                               “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.9 / 5

लेखक                    : –  दादासाहेब फाळके
दिग्दर्शक                : –  दादासाहेब फाळके 
कलाकार                : –  दत्तात्रय दबके, अण्णा साळूंखे, गजानन साने, भालचंद्र फाळके

Raja%20Harishchandra%20(1913)
Raja Harishchandra
निर्माता                   : –  दादासाहेब फाळके
वेळ                         : –  ४० मिनिटे
भाषा                       : – फिचर मूक चित्रपट
देश                         : –  इंडिया  
प्रदर्शित तारीख       : –  ३ मे १९१३

        3 मे 1913 मध्ये “दादासाहेब फाळके” (Dadasaheb Phalke) यांनी “राजा हरिश्चंद्र” (Raja Harishchandra) हा पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य मूक माहितीपट चित्रपट बनवला. ते भारतातील पहले दिग्दर्शक बनले. हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. दादासाहेब मराठी होते. दादासाहेब यांनी द लाईफ ऑफ क्रिस्त ह्या चित्रपटांमध्ये त्यांनी येशूना पहिले. त्यांना कल्पना सुचली यामध्ये त्यांना हिंदू देवता दिसू लागले आणि त्यांनी  ठरवले आपण पण चित्रपट निर्माण करायचे. त्यानुसार त्यांनी चित्रपट निर्मितीची सुरुवात केली. दादासाहेब फाळके यांनी “राजा हरिश्चंद्र” हा पूर्ण लांबीचा वैशिष्ट्य मूक माहितीपट चित्रपट बनवला. ह्या चित्रपटाने भारतीय सिनेमाचा पाया रचला. म्हणूनच त्यांना भारतातील चित्रपटांचे जनक म्हणतात.

          राजा हरिश्चंद्र आपल्या मुलाला धनुष्यबाणांचे शिक्षण देत असताना काही प्रजाजन राजाला शिकारीला जाण्यासाठी विनंती करतात. प्रजाजण राजा सोबत दरीखोऱ्यांतून जात असतात. राजाला स्त्रियां ओरडण्याचा आवाज आल्यावर राजा त्या दिशेनं जातो. विश्वामित्रा त्रिगुणशक्ती प्राप्त करण्यास यज्ञ करत आहते. राजा त्रिगुणशक्तीना सोडवून त्यांचा यज्ञात अडथळा निर्माण झाल्याने विश्वामित्रा  संतंप्त होतात. तेव्हा राजा आपले राज्य दान करण्याचे वचन देतात. वचन दिल्याप्रमाणे  विश्वमित्रा राजाला राज्य सोडून जाण्यास सांगतात. राजा, राणी आणि त्यांच्या मुलगा राज्य सोडून जातात. राजा वनवासात राहत असताना रोहिताश्व मरण पावतो आणि त्याचे मोफत अंत्यसंस्कार करण्यासाठी राजा तारामती ला डोम ला जाण्यास सांगतो. वाटेवर ऋषी विश्वामित्रा यांनी काशी राजपुत्राला दुसऱ्याकडून मारून लपवून बसतात. तारामतींचा  त्या शवाला पाय लागून घाबरतात आणि त्या शवाला हात लावताच राजपुत्राचा खून तारामती यांनी केला असा आरोप ऋषींनी लावला. ऋषींनी राजाला तिला मारण्यास सांगितले. ऋषींचा आदेश पूर्ण करण्यासाठी राजा हरिश्चंद्र तलवार उचलताच भगवान शिव प्रकट होतात. ऋषींनी राजाची अखंडतेची परीक्षा घेत असल्याचे सांगितले आणि राजाचे राज्य परत करून राजाचा हरिश्चंद्राच्या पुत्राला पण जिवंत करतात. 

          “राजा हरिश्चंद्र” या चित्रपटात भारतातील पहिले अभिनेता म्हणून काम करायला संधी मिळाली. दत्तात्रय दबके (Dattatray Dabke) हे भारतातील पहिले अभिनेता बनले. यांनी हरिश्चंद्राची प्रमुख भूमिका साकार केली. स्त्रियांना काम करण्यास मनाई असल्याने त्यांचे सहकलाकार अण्णा साळूंखे (Anna Salunkhe) यांनी स्त्री पात्राची भूमिका केली. विश्वात्मा या पात्राची भूमिका गजानन साने (Gajanan Sane) यांनी केली. हरिश्चंद्र राजा च्या मुलाची भूमिका दादासाहेब फाळके यांचा मुलगा भालचंद्र फाळके यांनी केली. भालचंद्र फाळके (Bhalchandra Phalke) हे भारतातील पहले बाल कलाकार बनले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *