लोकी : सीजन २ | एमसीयू ची टाइम लाईन ची अफरातफर करणारी वेब सीरिज
Written by : के. बी.
Updated : जानेवारी 21, 2024 | 10:07 PM
लोकी : सीजन २ |
लेखक | एरिक मार्टिन |
दिग्दर्शक | जस्टिन बेन्सन, आरोन मुरहेड, कासरा फाराहानी |
कलाकार | टॉम हिडलेस्टन, ओवेन विल्सन, सोफिया डी मार्टिनो, के हुई क्वान, जॉनाथन मेजर्स, गुगु म्बथा – रॉ, उन्मी मोसाकु |
निर्माता | मार्वल |
सीजन | २ |
एकूण एपिसोड | ६ |
प्रदर्शित तारीख | ५ ऑक्टोबर २०२३ |
देश | युनाइटेड स्टेट्स |
भाषा | इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगु |
कथा :-
लोकीच्या पहिल्या सीजन मध्ये लोकीला अटक करून टी व्ही ए मध्ये आणले जाते. यात लोकिला समजते के सर्व काही चालत आहे ते टाइम वॅरिअन्स ऑथॉरिटी कंट्रोल करत आहे. सर्व टाईम लाईन टीव्हीए मधूनच सुरुवात होते. यात त्याची भेट मोबियस, बी-१५, सिल्व्ही, शी होते. सिल्व्ही शी प्रेमाचे अंकुर सुद्धा यात फुलताना दिसले. पहिला सीजन चा शेवट झाला तेथून दुसरा सीजन चालू होतो. दुसऱ्या सीजन मध्ये टेम्पोरल रूम नष्ट होत आहे. ते नष्ट झाले सर्व काही बरखास्त होऊन जाईल. त्यासाठी लोकी जे काही करता येईल ते प्रयत्न करत आहे. लोकी ला सारखे सारखे भविष्यात जाण्याचे ग्रहण लागले आहे. लोकी मोबियस आणि ओरोबोरोस ची मदत घेतो आणि दुसऱ्या टाइम लाईन मध्ये जाऊन टी व्ही ए ला वाचवण्याचे प्रयत्न करतो. टी व्ही ए ची निर्मिती कोणी केली, टाइमली वेक्टर कोण आहे? हि हू रेमन्स काय करेल.? काय लोकी टी व्ही ए ला वाचवू शकेल.? ते नक्की पहा.
“लोकी : सीजन २” चित्रपट समीक्षा :-
मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स मधील लीकी सिरीज चा दुसरा सीजन रिलीज झाला. पहिल्या सिरीज ने विचार करायला लावले आहे. आता सीजन दोन पण साठी लक्ष देऊन पाहावे लागेल. कारण वेग वेगळ्या टाइम लाईन त्या टाइम लाईन ची पुनरावृत्ती झाली आहे. प्रत्येक एपिसोड आपल्याला अचंबित करून सोडतो हे काय चालले आहे. यासाठी तुम्हाला पहिला सीजन बघावाच लागेल. या सीजन मध्ये दिग्दर्शकांनी लोकी वर जास्त फोकस केला आहे. पूर्ण सूत्रधार लोकीच आहे. जस्टिन बेन्सन, आरोन मुरहेड, कासरा फाराहानी, डॅन डिलिउ यांनी दिग्दर्शन ची धुरा उत्तम अशी संभाळली आहे. या सिरीज च्या अगोदर शरारती देवता असणारा, कोणाचा विचार न करणारा लोकी आपणाला आता सुज्ञ असा समजुदार लोकी दिसेल.
टॉम हिडलेस्टन यांनी लोकी ची उत्कृष्ट भूमिका केली जी आपण या भूमिकेत दुसऱ्या कोणालाच पाहू शकत नाही. त्यांच्या त्या अभिनयाचे बरेच फॅन झाले असतील. ओवेन विल्सन इन्व्हेस्टिगेशन डेंजरस टाइम क्रिमिनल ऑफिसर ची उत्तम भूमिका केली आहे. असे वाटते कि ते टी व्ही ए मध्येच जन्माला आले आहेत. सोफिया डी मार्टिनो यांनी सिल्व्ही हि भूमिका चांगली केली आहे, के हुई क्वान यांनी ओरोबोरोस ( रिपेर्स अँड अडवान्सड डिपार्टमेंट) ची भूमिका उत्तम केली आहे, त्यांच्या काही संवाद वर मजा येते. जॉनाथन मेजर्स यांनी वेक्टर टाइमली ची भूमिका अति उत्तम केली आहे. जो एक महान शास्त्रज्ञ वाटतो अशी उठाव भूमिके केली आहे. आणि त्यांनी प्रत्येक हि हू रेमन्स ची सुद्धा उत्तम प्रकारे भूमिका निभावली आहे. गुगु म्बथा – रॉ यांनी टी व्ही ए जज ची भूमिका केली आहे. उन्मी मोसाकु यांनी हंटर बी – १५ ची चांगली भूमिका केली आहे. जी एक कट्टर रक्षक आहे.
नेहमी प्रमाणे एमसीयू च्या या हि सिरीज चे व्ही. एफ. एक्स. उत्तम करण्यात आले आहे. याचे बॅकग्राऊंड म्युजिक चांगल्या प्रकारचे आहे. जे स्टोरीलाईन शी कनेक्ट करते. त्या त्या मशीनचा आवाज हि उत्तम ऐकू येतो.
“लोकी : सीजन २” सीरीज कुठे पाहू शकतो..?
डिज्नी प्लस हॉटस्टार फ्री मध्ये पाहू शकता त्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.६ स्टार देईन.
तुम्ही लोकी : सीजन २ सीरीज पाहिली असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.