“शांग – ची अँड द लिजेंड् ऑफ द टेन रिंग्स” चित्रपट समीक्षा | Shang-Chi and The Legend of the Ten Rings Review
Written by : के. बी.
Updated : जुलै 17, 2022 | 3:53 PM
“शांग – ची अँड द लिजेंड् ऑफ द टेन रिंग्स” चित्रपट समीक्षा : मारवेल स्टुडिओ ची वेगळी कथा | Shang-Chi and The Legend of the Ten Rings Review : Marvel Studios is a different story
शांग-ची अँड द लिजेंड् ऑफ द टेन रिंग्स
शैली : – ॲक्शन, कल्पनारम्य, साहसी, सुपरहिरो “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – ३. ४✰ / 5✰
दिग्दर्शक : – डेस्टीन डॅनिअल क्रेटन
कलाकार : – सिमू लिऊ, अवक्वाफिना, टोनी लेऊंग, मेंगेर झांग, फला चेन, बेनेडिक्ट वोंग, मिशेल येओह, फ्लोरियन मुनटेनु, राणी चिंग
|
संगीत : – जोएल पी. वेस्ट
प्रदर्शित तारीख : – ३ सप्टेंबर २०२१
भाषा : – इंग्लिश
देश : – संयुक्त अमेरिका
कथा :-
वेणवू एक वाईट दरवाजा उघडत आहे ज्याने पूर्ण जगाला धोका होऊ शकतो. शांग ची चे वडील वेणवु शी लढण्यास तयार आहे.
समीक्षा : –
कोरोना ची दुसरी लहर झाल्यानंतर चित्रपट आला. मारवेल स्टुडिओ च्या या चित्रपटांमध्ये पहिल्यादांच एका आशियातील ऍक्टर ला घेण्यात आले. एक आम तरुणाचे जीवन जगत असताना अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्याच्यातील हिरो निर्माण होतो. ज्याने लहानपानापासूनच शिस्तबद्ध कठोर आणि काठीन प्रशिक्षण घेतले होते. एक मार्शल आर्टस् प्रशिक्षित शांग ची ची भूमिका सिमू लिऊ यांनी उत्तम रित्या पार पडली , शांग ची याची मैत्रीण केटी ची भूमिका अवक्वाफिना यांनी केली जी एक नैसर्गिक भूमिका भासते. यांच्या डोळ्यातील पहले कि शिस्तबद्ध, कठोर काळजाचा, जे हवे आहे ते करवून घेणारी व्यक्तिमत्व दिसेल असा शांग ची चा वडील वेणवु भूमिका टोनी लेऊंग यांनी हुबेहूब केली. क्सिआलिंग वेणवू ची मुलगी – मेंगेर झांग, यिंग ली शांग ची ची आई आणि वेणवु ची पत्नी चे पात्र – फला चेन, शांग ची ची ऑंटी यिंग नान ची भूमिका मिशेल येओह यांनी केली आहे.
याच्या मध्ये एक मित्र मैत्रीण ची साथ आहे, भाऊ बहिणीचे लढाई आहे, त्यानंतर वडील मुलाची लढाई आहे थोडक्यात पूर्ण चित्रपट फॅमिलीशी निगडित
असल्याचे दिसून येते. वेणवु कडे दहा रिंग आहेत त्या रिंग चा वापर करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. तरीपण शांग ची त्यांच्याशी लढत आहे. दोघेही मार्शल आर्टस् मास्टर आहेत त्यामुळे लढाई मध्ये ट्विस्ट निर्माण होते कि कोण जिंकेल. मार्शल आर्टस् ॲक्शन सिक्वेन्स चॅन पद्धतीने बनवण्यात आले जे आपल्याला रिअल फायटिंग वाटते. या चित्रपटांचे व्ही. एफ. एक्स. खूपच भारी आहे. त्यातील बॅग्राऊंड म्युजिक त्या त्या मोव्हमेन्ट ला छान झाले आहे.
मारवेल स्टुडिओ कॉमिक्स आधारित डेस्टीन डॅनिअल क्रेटन यांनी “शांग – ची अँड द लिजेंड्स ऑफ द टेन रिंग्स” चित्रपटाचे उत्तम दिग्दर्शन केलं आहे त्याच बरोबर एक अनोखी कथा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला मारवेल स्टुडिओ चे सर्व चित्रपट बघायची गरज भासत नाही. जी मारवेल सिनेमॅटिक युनिव्हर्स शी वेगळी आहे. या चित्रपटामध्ये वोंग आणि ब्रूस बॅनर चा कॅमियो रोल पाहायला मिळतो. जो पुढे मारवेल सिनेमॅटिक युनिव्हर्स मध्ये जोडण्यात येईल.
हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता. हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ भाषांमध्ये रिलीज केला आहे.
चित्रपट कुठे पाहू शकतो..?
यू ट्यूब, ऍमेझॉन प्राईम विडिओ, नेटफ्लिक्स. डिजनी प्लस हॉटस्टार, झी फाईव्ह, गुगल प्ले मुव्ही, ॲपल टी. व्ही. या ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वरती “शांग – ची अँड द लिजेंड् ऑफ द टेन रिंग्स” चित्रपट पाहू शकता. तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी भाडे द्यावे लागेल. प्रत्येक ओ. टी. टी प्लॅटफॉर्म चे रेंट ची अमाऊंट वेगवेगळी आहे. रेंट ची किमंत बदलत राहते. काही टी. टी. प्लॅटफॉर्म चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, कथा, भूमिका, व्ही. एफ. एक्स. यासाठी माझ्याकडून “३.5 ” ला ५ स्टार पैकी स्टार देईन.