शॉर्ट मूव्ही – “द हॉर्स इन मोशन” (1878) | Short Movie – The Horse in Motion (1878)
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 1, 2022 | 6:45 PM
शॉर्ट – “द हॉर्स इन मोशन” | Short Movie – The Horse in Motion
शैली : – माहितीपट, मूक चित्रपट “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.5✰ / 5✰
![]() |
The Horse in Motion (1878) |
ईडवेर्ड मुयब्रिज ( Eadweard Muybridge ) यांनी 19 जून 1878 मध्ये “द हॉर्स इन मोशन” ( The Horse in Motion ) हा पहिला मोशन पिक्चर निर्माण कारण्याचे काम केले.
ईडवेर्ड मुयब्रिज ( Eadweard Muybridge ) ब्रिटीश फोटाग्राफर त्यावेळी “झूप्रॅक्सिस्कोप” (Zoopraxiscope) तंत्राचा वापर केला. द हॉर्स इन मोशन यामध्ये एक घोडा आणि घोडेस्वार यांची हालचाल दिसणारी सहा ते बारा स्वयंचलित इलेकट्रो प्रतिमा यांच्या क्रमशः मालिका दाखवते. असे एक दृश्य निर्माण केले कि घोडा धावत आहे घोडेस्वार घोड्यावर बसून घोडेस्वारी करत आहेत असे चलचित्र निर्माण होण्यास मदत झाली. जसे कि तुम्हाला एक फ्लीफ बुक माहीतच असेल ज्याच्यामध्ये प्रत्येक पानावर चित्रे काढले जाते आणि फ्लीफ बुक मधील पाने जसे झटपट एक एक पुढे पलटतो तेव्हा एक व्हिडिओ निर्माण होतो.
घोडा पळताना काही क्षणापर्यंत त्याचे चारही पाय हवेत स्तिर राहतात कि नाही हे दाखवण्यास एक प्रयोग चालू केला. एका रेसट्रॅक वर जाऊन रेसट्रॅक च्या बाजूनी कॅमेरा असे लावले होते कि घोडेस्वारी करताना प्रत्येक कॅमेरा घोडेस्वारी च्या प्रत्येक हालचाली च्या प्रतिमा काढता येईल अश्याप्रकारे लावण्यात आले होते. अश्या टिपलेल्या छायाचित्रातून घोड्याचे पाय काही क्षणासाठी का होईना ते हवेत स्तिर राहतात असे या संशाधनातून सिद्ध झाले. मोशन पिक्चर ला चालना मिळाली.