HomeFilmsMarathi

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

Written by : आकांक्षा कोलते

Updated : नोव्हेंबर 14, 2023 | 08:01 PM

  • २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हे मराठी चित्रपट तुम्ही पाहिलेत का.? आशयघन आणि दर्जेदार कथानक हा मराठी चित्रपटांचा गाभा आहे. मराठी चित्रपट हे नेहमीच वास्तववादी आणि चांगला कंटेंट घेऊन भेटीला येतात हे आता प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना प्रेक्षक आता भरभरून प्रतिसाद देतात. आपण आतापर्यंत ऑगस्ट २०२३ पर्यंत प्रदर्शित झालेले चित्रपट पाहीले आहेत. आज आपण या लेखात सप्टेंबर २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेले चित्रपट पाहुया.
Marathi Movie list release in sept 2023.
Movie reviews and information
१. टेरीटरी
२०२३. रोमांचक, नाटक. १ तास ५१ मिनिटे. [ यु ]
लेखक सचिन श्रीराम
दिग्दर्शकसचिन श्रीराम
तारांकितसंदीप कुलकर्णी, किशोर कदम
निर्माताकृष्णा सोरेन
प्रदर्शित तारीख१ सप्टेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

टेरीटरी” चित्रपट समीक्षा :-

निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक सजीवाचा प्रदेश त्याची “टेरीटरी” वेगवेगळी असते. प्राणी, पक्षी, जलचर प्रत्येकजण त्याच्या त्याच्या जीवनमाना नुसार त्याच्या प्रदेशात राहत असतो परंतु याच प्रदेशात जेव्हा इतर कोणी घुसखोरी करतं तेव्हा त्याचं जीवनचक्र बिघडून जातं. आता हेच या चित्रपटातून सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील ही गोष्ट आहे. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वार्थासाठी निसर्गाला ओरबाडल्यावर, जंगलांची कत्तल केल्यानंतर जंगलातील प्राणी मानवी वस्तीत येऊ लागले. असाच एक नरभक्षक वाघ स्वतःची भुक भागवण्यासाठी या गावात घुसलेला आहे. म्हणुनच दिसता क्षणी त्याला ठार मारण्याची परवानगी न्यायालयाने दिलेली आहे. तर त्यासाठी वनरक्षक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा त्या वाघाला शोधण्यासाठी तपास सुरू होतो.
आता पुढे त्या वाघाचं काय होतं.? तो पकडला जातो का.? या प्रश्नांची उत्तरे चित्रपटात मिळतील. अभिनेता संदीप कुलकर्णी आणि किशोर कदम यांनी अर्थातच उत्कृष्ट अभिनय केला आहे. दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी सुद्धा अतिशय बारकावे लक्षात घेऊन या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी, संगीत सारं उत्तम आहे. परंतु चित्रपट थोड्या वेगळ्या धाटणीचा असल्यामुळे मधे मधे संथ वाटू शकतो. परंतु एकंदर चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार, लोकेशन या सगळ्यामुळे चित्रपट रंजक बनला आहे.
प्रत्येक प्राणीप्रेमी आणि निसर्ग प्रेमी प्रेक्षकांनी हा चित्रपट जरूर बघावा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


२. बापमाणुस
२०२३. परिवार, नाटक. १ तास ४५ मिनिटे. [ यु ]
लेखक ओमकार गोखले, जीत अशोक, विराजस कुलकर्णी
दिग्दर्शकयोगेश फुलफगर
तारांकितपुष्कर जोग,केया इंगळे,अनुषा दांडेकर,कुशल बद्रिके,शुभांगी गोखले
निर्माताआनंद पंडीत, पुष्कर जोग
प्रदर्शित तारीख१ सप्टेंबर २०२३
भाषा
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

बापमाणुस” चित्रपट समीक्षा :-

हल्ली भावनाप्रधान कौटुंबिक असे चित्रपट सगळ्यांनाच आवडतात असं नाही. त्यातही ते प्रेक्षकांना भावणारे असतील तर प्रेक्षकांची पसंती मिळते. दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी दिग्दर्शित केलेला बापमाणुस हा चित्रपट अशीच एका बाप आणि मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा आहे. खरं तर ही कथा एकल पालकत्व म्हणजेच सिंगल पॅरेंटींग या संकल्पनेवर आधारित आहे.
मुळचा पुण्यातील श्रेयस बापट हा लंडनमध्ये आपल्या पत्नीसोबत अस्मिता सोबत स्थित असतो व दोघांचा सुखाचा संसार चालू असतो. परंतु प्रसुती दरम्यान मुलीला जन्म देऊन अस्मिताचा मृत्यू होतो. आणि इथुनच खऱ्या कथेला सुरुवात होते.
अस्मिताची आई म्हणजे सुनिता (शुभांगी गोखले) मुलीचा सांभाळ करण्यासाठी तयार असतात. परंतु आई आणि बाप म्हणून सारी जबाबदारी श्रेयस ला स्वतः पेलायची असते. एकल पालकत्व स्विकारून तो आपली मुलगी कुकीची(केया इंगळे) काळजी घेत असतोच. परदेशात आपल्या मुलीला एकट्याने मोठं करण सोपं नसतं. परंतु या साऱ्या प्रवासात त्याला क्रिशा म्हणजेच अनुषा दांडेकर, त्याचा मित्र माधव व त्याची बायको या सगळ्यांची साथ असते.
साधी सरळ फार गुंतागुंत आणि ट्विस्ट नसलेली ही कथा आहे. भावनाप्रधान चित्रपट बघायला आवडत असतील तर नक्की हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


३. बापल्योक
२०२३. परिवार, नाटक. १ तास १४ मिनिटे. [ यु ]
लेखक विठ्ठल नागनाथ काळे , मकरंद माने
दिग्दर्शकमकरंद माने
तारांकितविठ्ठल काळे, शशांक शेंडे
निर्माताविजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने
प्रदर्शित तारीख१ सप्टेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

बापल्योक” चित्रपट समीक्षा :-

आपल्याकडे सर्वसाधारणपणे बाप आणि लेकाचं नातं म्हटलं की ते फारसं मैत्रीपूर्ण वैगरे असतं. असं नातं फार दुर्मिळ. बहुतांश घरांमध्ये बाप आणि मुलगा असे वागतात जणू एकमेकांशी छत्तीसचा आकडा. पण खरं तर दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रेम, माया ही असतेच. हेच लपलेलं नातं उलगडणारा चित्रपट म्हणजे बापल्योक.
मकरंद माने यांनी अगदी हळुवारपणे हे नातं मोठ्या पडद्यावर उलगडून दाखवलं आहे. सागर हा पुण्यातील करीअर सोडून आपल्या आईबाबांसोबत गावात राहून शेती करत असतो. त्यामुळे त्याचं लग्न जमत नसतं. पण नंतर शेजारच्या गावातील एका मुलीसोबत त्याचं लग्न ठरतं.
चित्रपटाची कथा खरी सुरू होते जेव्हा हा सागर आणि त्याचे वडील एकत्र बाईक वरून त्याच्या लग्नाच्या पत्रिका वाटायला गावोगावी नातेवाईकांकडे जातात. या प्रवासात त्यांचे भांडणं, रूसवे फुगवे, एकमेकांशी उडणारे खटके, मधेच एकमेकांबद्दल वाटणारी काळजी हे सगळं खूप छान पद्धतीने दाखवलं आहे. शशांक शेंडे आणि विठ्ठल काळे यांनी उत्तम असा नैसर्गिक अभिनय केला आहे.
अगदी हलकीफुलकी निव्वळ दिड तासांची ही बापलेकाची गोष्ट तुमच्या मनाचा ठाव घेणारी आहे हे नक्की. प्रत्येक हा चित्रपट जरूर बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


४. तीन अडकून सीताराम
२०२३. विनोदी, नाटक. २ तास १५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक ऋषिकेश जोशी
दिग्दर्शकऋषिकेश जोशी
तारांकितअलोक राजवाडे, वैभव तत्ववादी, ऋषिकेश जोशी, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता माळी
निर्मातालालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, नितीन वैद्य
प्रदर्शित तारीख२९सप्टेंबर २०२३
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

तीन अडकून सीताराम” चित्रपट समीक्षा :-

ऋषिकेश जोशी दिग्दर्शित तीन अडकून सीताराम हा एक विनोदी चित्रपट असून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा आहे. ही तीन मित्रांची गोष्ट आहे म्हणून तीन अडकून सीताराम असं या चित्रपटाचं नाव आहे.
मित्र म्हटलं की फिरण्याचे प्लॅन हे होतच असतात. असेच हे मित्र फिरायला लंडनला गेलेले असतात. परंतु तिकडे गेल्यावर, खरं तर जातानाच त्यांच्यासोबत अशा काही घटना घडायला सुरुवात होते की त्यांचं आयुष्य बदलून जातं. त्यांच्यासोबत त्यांच्यापैकी एकाची गर्लफ्रेंड असते. एकापाठोपाठ एक अशा अडचणी त्यांच्या समोर येत असतात परंतु या सगळ्यात सुद्धा इतका कॉमेडी ह्युमर आहे की तुम्ही पोट धरून हसाल. आता ते कसे कसे अडकतात की त्यांना कोणी अडकवतं हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. डोकं बाजूला ठेवून बघण्याचा हा चित्रपट आहे. उगीच लॉजिक वैगरे लावत बसाल तर कदाचित तुम्हाला हा चित्रपट अजिबात आवडणार नाही.
मधे मधे चित्रपट रेंगाळतो पण तरीही चित्रपट संपुर्ण वेळ तुमचं मनोरंजन करतो. अलोक राजवाडे, वैभव तत्ववादी, ऋषिकेश जोशी आणि संकर्षण कऱ्हाडे या सगळ्यांनी एकदम धमाल केली आहे. त्यामुळे एकदा तरी हा चित्रपट बघायलाच हवा.

तर मित्रांनो, यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि या विकेंड ला कोणते बघायला जाणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा.

हे पण वाचा :-

जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी | या मराठी चित्रपटांनी केली २०२३ ची धमाकेदार सुरवात!

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

एप्रिल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

मे २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

जुलै २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी

तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *