समीक्षा :- कांतारा : ए लिजेंड | रिशब शेट्टी दिग्दर्शित बेस्ट फिल्म्स
Written by : के. बी.
Updated : नोव्हेंबर 11, 2022 | 12:12 PM
वर्ष :- २०२२ सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास ३० मिनिटे
शैली : – ॲक्शन, रोमांचक, नाटक, रहस्य
“जगभरून फिल्म्स” (Jugbharun Films) रेटिंग : – ४.४✰ / ५✰
लेखक : – रिशब शेट्टी
दिग्दर्शक : – रिशब शेट्टी
कलाकार : – रिशब शेट्टी, सप्तमी गोवडा, किशोर कुमार जी, अच्युत कुमार, प्रमोद शेट्टी
निर्माता : – विजय किरगंडूर
संगीत : – बी. अजनिश लोकनाथ
प्रदर्शित तारीख : – ३० सप्टेंबर २०२२
भाषा : – कन्नड
देश : – भारत
कथा :-
१८४७ साली सर्वसंपन्न राजाला शांती मिळत नव्हती. ती मिळवण्यासाठी काहीं ऋषी गुरुंच्या मार्गदर्शना वरून राजा बाहेर पडतो. एका जंगलात राजाला आवाज येतो राजा त्या दिशेने जातो त्याला एक पुजलेला दगड दिसतो. ते पाहून राजा हातातील शस्त्र त्याग करून राजा दगडाला शरण जातो. इतक्यात तेथील गांवलोक राजाच्या भोवती जमा होतात. राजा त्यांना विनंती करतो कि मला हा दैव पाहिजे. दैव राजाला बोलतात तुला हव ते भेटेल पण त्यासाठी तुला माझा जीथे पर्यंत आवाज जाईल तिथ पर्यंत जमीन गांव वाल्यांना देणे. राजा पंजुर्लीचे बोलणे मान्य करतो. दैव घेवून जातो गावाला जमीन देवून टाकतो. तेव्हा पासून राजाला सुखशांती प्राप्त होते. अनेक वर्षांनी १९७० मध्ये परंपरेने भूत कोला चा उत्सव चालू असताना राजाचे वंशज जमीन गांववाल्यांकडून जमीन परत घेण्याची मागणी करतात. दैव त्या मागणीस नकार देतात. राजाचे वंशज कोर्ट मध्ये जाण्याची धमकी देतात. वंशज दैव ला बोलतात कि फक्त दैव बोलतोय कि फक्त स्वत: च बोलताय. एक वेळ पंजुरली माप करेल मी गुलीगा तुला कधी माप करणार नाही. जो जाईल तो रक्ताची उलटी होवून मरेल. राजांचा वंशज कोर्टाची पायरी चढताच रक्ताची उलटी होवून मरून जातो. परत अनेक वर्षांनी १९९० च्या साली परत त्यांचे वंशज जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर फोरेस्ट ऑफिसर जंगल ची जमिन सरकार च्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न करत आहेत. शिवा या दोघांपासून गांववाल्यांचे रक्षण कसा करतो.
कांतारा : ए लिजेंड समीक्षा : –
चित्रपटा कसा असावा असे एक जिवंत उदाहरण म्हणून याच्याकडे पाहता येईल, असे का मी म्हणतोय हे तुम्हाला स्वत: चित्रपट पाहल्यावर समजेलच तत्पृवी मी तुम्हाला थोडेसे सांगू पाहतो. भारतीय चित्रपटातील हा एक सर्वोत्तम चित्रपटापैकी एक आहे असे म्हणायाला काहीच हरकत नाही. एक युनिक स्टोरी आहे. स्टोरी लाईन चांगल्या प्रकारे लिहिली आहे. ॲक्शन, प्रणय, रोमांचक, नाटक, भय, विनोद, सर्व शैली चे दर्शन या चित्रपटातून दिसेल. आपण त्या मुव्ही स्क्रीन च्या बाहेर बघत असे वाटत नाही तर मुव्ही स्क्रीन च्या आत मधूनच पाहतो कि काय असे वाटू लागते. मीच त्या फिल्म मध्ये खुर्चीवर बसून घडत असलेला प्रकार बघत आहे असे वाटते. अशा चित्रपटाचे दिग्दर्शन रिशब शेट्टी यांनी केले आणि त्याच सोबत लेखन, नायकाची भूमिका सुद्धा केली. रिशब शेट्टी यांनी , दिग्दर्शन, लेखन अशी ३ मेन डिपार्टमेंट ची कामे त्यांनीच संभाळली आहेत. या चित्रपटातून सामाजिक विषमता, रूढी, परंपरा, दिसून येईल. उत्तम दिग्दर्शन आहेच त्याच सोबत त्यांनी केलीली भूमिका डोक्यातून जात नाही. दोन टू व्हीलर वरून हिरो ची एन्ट्री, दोन घोड्यावरून हिरो ची एन्ट्री तुम्ही पाहली असेल पण कांतारा मधील शिवाने केलेली दोन म्हशी वरून एन्ट्री पाहल्यावर सुपर्ब नक्कीच बोलाल कारण तो जो स्लो – मोशन वाला सीन बघितला कि शर्यत बघयला मजा येते. चित्रपटाच्या शेवटी १५ मिनिटे जे थरारक दृश्य पाहिल्यावर अंगावर काटा आल्या शिवाय राहणार नाही. ऑक्सर विजेता प्रमाणे भूमिका केली आहे.
किशोर कुमार जी (मुरली – फोरेस्ट ऑफिसर ) डेंजर ऑफिसर वाटतात. सप्तमी गोवडा, अच्युत कुमार, प्रमोद शेट्टी आणि इतर सर्वांणी भूमिका उत्तम केल्या आहेत. विनोद थोढे डबल मिनिंग वाले एकल्यावर हसू तर येणारच. गांवकऱ्यांची वेशभूषा, बॅग्राऊंड स्थळ, गावाकडील घरे जशी असतात तशी दाखवलेली आहेत. केलेली कास्टिंग हे प्रत्येक पत्राला शोबून दिसते. सिनेमॅटोग्राफी उत्तम प्रकारे झाले आहे. शिवाचे ते फायटिंग करताना फिरलेला कॅमेऱ्याचा अँगल असो, भले मोठे झाड गाडीवर पडत असताना चा कॅमेरा अँगल असो एकदम बघायला भारी वाटते. सुरुवातीला फिल्म पटापट धावत चालल्या सारखी चित्रे जात आहेत. हाच एक विक पॉईंट वाटतो. थोडीशी फास्ट फोर्वोर्डिंग तर आहेच पण त्याचा कथा न समजण्यासारखे असे काही नाही. ती कथा समजते आणि आपण ते पाहण्यास रमतो सुद्धा. अचानक आलेल्या म्युजिक चा आवाज आपल्याला भीती वाटल्यावर शिवाय राहणार नाही. बॅग्राऊंड म्युजिक खुपच उत्तम बनवले आहे.
हा चित्रपटात एक कीस सीन दाखवला आहे. फमिली सोबत बघू शकता. हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ भाषांमध्ये रिलीज केला आहे. हिंदी भाषेत १४ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रदर्शित केला आहे.
चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक रेटिंग स्टार :-
माझ्या कडून या चित्रपटासाठी ५ स्टार पैकी ४.४ स्टार देईन.