सलार : भाग १ – सीजफायर समीक्षा | प्रभास यांचा धडाकेबाज ॲक्शनपट चित्रपट
सलार : भाग १ – सीजफायर |
लेखक | प्रशांत नील |
दिग्दर्शक | प्रशांत नील |
कलाकार | प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हसन, जगपती बाबू |
निर्माता | विजय किरागंदूर |
संगीत | रवी बसरूर |
प्रदर्शित तारीख | २२ डिसेंबर २०२३ |
देश | भारत |
भाषा | तेलुगु, हिंदी |
कथा :-
११२७ पासून दहशत चालत आलेल्या खानसार शहर ची गोष्ट आहे. असे शहर जे भारताच्या नकाशावरून हटवण्यात आले आहे. देशाचे शासन या शहरात चालत नाही. पण खानसार आपल्या पद्धतीने हुकुमत चालवू शकतो. खानसार एक भयानक शहर आहे. खानसार चे सरदार पद मिळवण्यासाठी सगळे कुट कारस्थान करत आहेत. याच खानसार मध्ये लहानपणा पासून वर्धा आणि देवा हे दोन खास मित्र आहेत. काही कारणास्तव लहानपणीच मित्र खानसार सुडून जातो. वर्धा ला खानसार चा सरदार होण्याचे मित्राला सांगून आपल्या मित्राला परत घेवून येतो. कारण वर्धाला माहित आहे तो एकटाच सर्वांना काफी आहे. वर्धा खानसार चा सरदार बनेल का.? सलार कोण आहे. खानसार चा असली वारसदार कोण आहे तर नक्की बघा.
“सलार : भाग १ – सीजफायर” चित्रपट समीक्षा :-
प्रशांत नील यांनी निर्माण केलेला “के. जी. एफ.” चित्रपटाचा पहिला भाग आणि दुसरा भाग पण सुपर हिट झाला. आणि आता “सलार” चित्रपट घेऊन आले आहेत. याचा ट्रेलर पाहल्यावर आपणाला वाटेल कि हा के. जी. एफ. चा पार्ट आहे का ? असे वाटले. चित्रपट बघितला आणि लगेच मला के. जी. एफ. ची आठवण आली. सेम फिलिंग होती. त्याच अंदाज ने चित्रपटाची स्टोरी दाखवण्यात आलेली दिसते. जसे के. जी. एफ. चे शहर आहे तसेच खानसार चे शहर दाखवण्यात आले आहे. खानसार ला एक मैत्री चे रूप देण्यात आले आहे. आणि यात अजून तरी प्यारवाली लव्हस्टोरी दिसून येत नाही. कदाचित पुढच्या भागात दाखवण्यात यईल. फक्त आई मुलाचे प्रेम, मित्रप्रेम दिसेल. इंटरवल च्या पहिल्या भागात स्टोरी समजायला कठीणच जाईल. कारण बरेच पात्रांची नावे आहेत आणि त्यांची एकमेकांसोबत असणारे नाते पहिल्या भागात लक्ष्यात येत नाही पण इंटरवल च्या नंतर ती नाती आठवायला लागतील. पहिला भाग थोडा स्लो असला तरी बोरिंग फील होत नाही कारण स्क्रीन प्ले चांगला आहे. प्रत्येक सीन ला वेगळे काही दिसत असतं. पुढे काय होणार याचा हि सस्पेंस टिकवून ठेवण्यात आला आहे. इंटरवल नंतर चा भाग खूप भारी आहे. ॲक्शन पहिली तर अंगावर शहारे आणणारे आहेत. पण ॲक्शन मध्ये खूप आणि खूपच अतिशयोक्ती केली आहे. एका ठोक्यात दुश्मन चे चार चार जण हवेत उडत असतात. त्यामुळे याठिकाणी कोणतेच लॉजिक लावून चालणार नाही. बऱ्याच ठिकाणी जास्त स्लो मोशन मध्ये ॲक्शन दाखवण्यात आले आहेत. पण बघण्यात मात्र मजा नक्की यईल. फक्त रिअल वाटत नाही इतकेच खंत वाटते. प्रभास यांचे फॅन जे आहेत त्यांना हा चित्रपट रामायण नंतर वरदान ठरेल. शेवट अचानक थांबतो नावे चालू होतात. पण पुढच्या दुसऱ्या भागाची आतुरता लागते. शेवट संपला कि थांबू नका तुम्हाला कोणताच पोस्ट क्रेडीट सीन दिसणार नाही. डार्क मोड ची फिल्म बनवण्यात खास कामगिरी प्रशांत नील यांनी करून दाखवली आहे.
प्रभास यांनी डेंजर पर्सन, जास्त काही न बोलणारा असा देवा या पात्राला शाजेल अशी भूमिका केली आहे. भर दरबारात देवा नारंग ला मारतो असा एक सीन आहे जो तुम्हाला भर दरबारात बाहुबली ने चालवलेली तलवारीची नक्कीच आठवण करून देईल. अंगावर शहारे आणतात. प्रभास यांच्या देवा पत्रामध्ये संवाद बाजी खूपच कमी आहे. पृथ्वीराज सुकुमारन यांनी वर्धराज ची भूमिका उत्तम केली आहे, श्रुती हसन यांनी हि चांगली भूमिका केली आहे, जगपती बाबू यांना थोडी स्क्रीन भेटली त्यात त्यांनी खानसार चा किंग याची ठळक अशी दर्जेदार भूमिका केली आहे. इतर सर्वच पात्रांनी चांगली केली आहे.
यात जो व्ही. एफ. एक्स. चे काम टीम ने उत्तम केले आहे. खानसार मधील नथनी असो या गळ्यातील कडे असो सर्वांची वेशभूषा चांगली करण्यात आली आहे. हिंदी वर्जन मधील गाणी खास नाहीत. के. जी. एफ. सारखे ” न ना रि ना रे …….” आयकॉनिक म्युजिक सुद्धा नाही ऐकायला मिळत नाही. रॉकी ला दर्शवणारी बीजीएम पण नाही आहे. तसे पहिले तर बॅकग्राऊंड म्युजिक चांगलेच आहे.
यात तुम्हाला रोमान्स काहीच नाही. जे आहे ते फक्त ॲक्शन आणि ॲक्शन दिसेल. तुम्हाला ॲक्शन चित्रपट आवडत असेल तर हा चित्रपट तुम्ही थिएटर मध्ये बघायला मजा यईल. यात थोडेफार क्रूर असे कृत्य दिसतील.
“सलार : भाग १ – सीजफायर” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.5 स्टार देईन.
तुम्ही सलार : भाग १ – सीजफायर चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.