सीक्रेट इनवेजन वेब सीरिज समीक्षा । Secret Invasion Web Series Review
Written by : के. बी.
Updated : मार्च 09, 2024 | 11:22 PM

सीक्रेट इनवेजन |
आधारित | मार्वल कॉमिक्स |
लेखक | काइल ब्रॅडस्ट्रीट |
दिग्दर्शक | अली सेलीम |
कलाकार | सॅम्युअल एल जॅकसन, बेन मेंडेलसोहन, मार्टिन फ्रीमन, कोबी स्मल्डर्स, किंग्सले बेन-आदिर, चार्लेन वुडर्ड, किलियन स्कॉट, सॅम्युअल अडेवून्मी, डर्मोट मुलरोनी, ख्रिस्तोफर मॅकडोनाल्ड, केटी फिनेरन, इमिलिया क्लार्क, ऑलिव्हीया कोलमन, डॉन चीडल, रिचर्ड डॉर्मर |
निर्माता | केविन फाइगी |
संगीत | क्रिस बॉवर्स |
नेटवर्क | डिज्नी प्लस हॉटस्टार |
प्रदर्शित तारीख | २१ जून २०२३ – २६ जुलै २०२३ |
सीजन | १ |
एकूण भाग | ६ |
देश | युनाइटेड स्टेट |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
निक फ्यूरी ने स्क्रल च्या समुदायाला एक घर मिळवून देण्याचे सांगितले होते. पण फ्यूरी ते पूर्ण करू शकले नाही. स्क्रल कोणाचेहि रूप धारण करू शकतात. त्यांनी अनेकांचे रूप धारण करून त्यांनी पृथ्वी ग्रहावर राहू लागले. पण काही स्क्रल स्वतः हुकूमत करण्याच्या हेतूने तयारी करत आहेत. निक फ्यूरी आणि चांगले स्क्रल त्यांचे कूट कारस्थान रोखू शकतात का.? ते नक्की पहा.
“सीक्रेट इनवेजन” चित्रपट समीक्षा :-
एक रंग बदलू गिरगिट अशीच कहाणी वाटते असे म्हणायला काही हरकत नाही लेखकाने नवीन प्रजाती दाखवली आहे जी कोणाचे हि रूप परिधान करू शकते आणि त्यांची मेमरी सुद्धा तशीच राहून रूप बदलतात. त्यामुळे खरी व्यक्ती ओळखणे कठीण आहे. खरा मानवी जीव कोणता आणि स्क्रल प्रजाती कोणती सांगणे कठीण आहे. त्यामुळे पाहायला बरे वाटते. अशीच एक्स में सीरिज मधील “डार्क फिनिक्स” या चित्रपटामध्ये रेवेन डार्कहोल्म नावाची कॅरेक्टर आहे. ती सुद्धा रूप बदलणारी म्युटंट होती.
सुरुवातीला तुम्हाला कहाणी थोडी वीक वाटेल नंतर हळू हळू कॅरेक्टर समजल्यावर स्टोरी बघायला बरे वाटते. यात तूम्हाला निक फ्यूरी ज्याच्याकडे काहीच शक्ती नाही तरीही तो लढत आहे. हे दिग्दर्शकाने चांगले दाखवले आहे. काही ठिकाणी निक फ्यूरी चे एक प्रेमिका, आणि त्यांच्यातील इमोशन सुद्धा बघायला मिळतात. प्रेम असेल चेहरा बघून प्रेम नाही होत. हे पण त्यात दाखवले आहे. एक कॅरेक्टेर दुसऱ्या वेशात जातो. वेगवेगळ्या ठिकाणी होणारे बदल समजून येतात. हे अली सेलीम दिग्दर्शकाने चांगले मांडले आहे.
निक फ्यूरी ची भूमिका सॅम्युअल जॅकसन यांनी उत्तम केली आहे. ते त्यांचा कॅरेक्टर मध्ये परफेक्ट दिसतात. जगप्रसिध्द असलेली “गेम ऑफ थ्रोन्स”
सीरिज मधील डेनेरीस टारगारेन ची भूमिका इमिलिया क्लार्क यांनी केलीली होती. ती भूमिका खूप प्रख्यात आहे. आणि आता सीक्रेट इनवेजन सिरीज मध्ये गिया ची भूमिका केली आहे. तसेच इतरांनीही त्या त्या कॅरेक्टेर नुसार योग्य भूमिका निभावली आहे.
यातील व्ही. एक. एक्स. चांगल्या प्रकारे करण्यात आले आहे. बॅकग्राऊंड साऊंड ची चांगली साथ आहे. वेशभूषा चांगली केली आहे.
“सीक्रेट इनवेजन” सीरीज कुठे पाहू शकतो..?
डिज्नी प्लस हॉटस्टार पाहू शकता त्यासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.५ स्टार देईन.
तुम्ही “सीक्रेट इनवेजन“ सीरीज पाहिली असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.