“स्पायडर – मॅन : नो वे होम” (2021) चित्रपट – 3 स्पायडर मॅन एकाच चित्रपटांत टॉम हॉलंड, टोबी मॅग्वायर, अँड्रयू गारफिल्ड | Spider – Man : No Way Home (2021) – 3 Spider Man in the same movie Tom Holland, Toby Maguire, Andrew Garfield
Written by : के. बी.
Updated : जून 26, 2022 | 6:40 PM
“स्पायडर – मॅन : नो वे होम” (2021) चित्रपट – 3 स्पायडर मॅन एकाच चित्रपटांत टॉम हॉलंड, टोबी मॅग्वायर, अँड्रयू गारफिल्ड | Spider – Man : No Way Home (2021) – 3 Spider Man in the same movie Tom Holland, Toby Maguire, Andrew Garfield
शैली : – ॲक्शन, कल्पनारम्य, साहसी, सुपरहिरो “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.9✰ / 5✰
सीबीएफसी :- यू / ए
लेखक : – जॉन वॉट्स
दिग्दर्शक : – ख्रिस मकेन्ना, एरीक सोमर्स
कलाकार : – टॉम हॉलंड, झेंडया, बेनेडिक्ट कंबरबॅच, जेकब बैटलन, जॉन फॅवरू , बेनेडिक्ट वोंग, टोबी मॅग्वायर, अँड्रयू गारफिल्ड,
|
निर्माता : – केविन फीगे, एमी पास्कल
संगीत : – मायकेल जियाचिनो
प्रदर्शित तारीख : – १७ डिसेंबर २०२१
वेळ : – २ तास २८ मिनिटे
भाषा : – इंग्लिश
देश : – युनाइटेड स्टेट
कथा :-
पीटर पारकर हाच स्पायडर मॅन अशी ओळख पूर्ण जगाला कळते. स्पायडर मॅन ची ओळख नष्ट करण्यासाठी पीटर पारकर डॉक्टर स्ट्रेंज यांची मदत घेतो. डॉक्टर स्ट्रेंज मंत्र म्हणत असताना पीटर पारकर बोलतो कि फक्त आपल्या मित्रांना आपली स्पायडरमॅन ची ओळख असावी या शब्दात डॉक्टर स्ट्रेंज यांचे मंत्र काही उलट होतात. त्यामुळे बहुविश्व उप्तन्न होते त्यामधील काही भूतकाळातील जीव परत येतात. यातून निर्माण झालेल्या संकटाना ३ स्पायडर मॅन कसा सामना करतात ते दाखण्यात आले आहे.
समीक्षा : –
स्पायडर मॅन नो वे होम पाहण्या अगोदर तुम्हाला स्पायडर मॅन होमकमिंग आणि स्पायडरमॅन फार फ्रॉम होम हे पाहायला लागतील कारण हे हे स्पायडरमॅन २ चित्रपट पाहल्यावर तुम्हाला पीटर पारकर कोण आहे हे समजेल
पीटर पारकर म्हणजे स्पायडरमॅन याची कॅप्टन अमेरिका : सिविल वॉर मध्ये एन्ट्री झाली कॅप्टन अमेरिका शी लढला त्यानंतर अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर मध्ये डायरेक्ट थॅनॉस शी लढताना दिसला याच चित्रपटांत त्याचे अस्तित्व संपले. अव्हेंजर्स एन्ड गेम मध्ये टाईम मशीन च्या साह्याने संपलेले सर्व जीव आणि स्पायडर मॅन पण परत आला लढाई मध्ये भाग घेतला अव्हेंजर्स च्या या ३ लढाई मध्ये आपल्याला स्पायडर मॅन लढताना दिसला. टोनी स्टार्क च्या निधन झाल्यावर स्पायडर मॅन फार फ्रॉम होम मध्ये मिस्टोरिओ ला मारतो तेव्हा मिस्टेरीओ मरता मरता स्पायडरमॅन ची ओळख दाखवणारा स्वतःचा विडिओ सर्व न्यूज माध्यमांना पाठवतो. पीटर पारकर च स्पायडर मॅन असल्याचे जगाला कळते.
मी स्पायडर मॅन असल्याची ओळख सर्वाना समजल्यावर पीटर पारकर चे जीवन बदलून जाते लोक त्याच्याकडे सारखे बघत राहतात. आपली स्पायडर मॅन ची ओळख नष्ट करण्यासाठी तो डॉक्टर स्ट्रेंज ची मदत घेतो. डॉक्टर स्ट्रेंज मंत्र म्हणत असताना पीटर पारकर बोलतो कि फक्त आपल्या मित्रांना आपली स्पायडर मॅन ची ओळख असावी या शब्दात डॉक्टर स्ट्रेंज यांचे मंत्र काही उलट होतात. त्यामुळे बहुविश्व उप्तन्न होते. त्यामधील काही स्पायडर मॅन च्या संबधीत असणारे भूतकाळातील जीव परत येतात.
“स्पायडर मॅन” या ट्रिलॉजि चित्रपटांत टोबी मॅग्वायर यांनी पीटर पारकर ची भूमिका केली आणि ” द अमेझिंग स्पायडर मॅन ” यांचे दोन चित्रपटांमध्ये अँड्रयू गारफिल्ड यांनी पीटर पारकर ची भूमिका केली आहे. “स्पायडर मॅन” या ट्रिलॉजि मधील खलनायक विलिअम डॅफोई ( नॉर्मन ओसबॉर्न – ग्रीन गोब्लिन ), आल्फ्रेड मोलिना (ओट्टो ओक्टोव्हियस – डॉक्टर ऑक्टोपस ), थॉमस हाडेन चर्च ( फ्लिंट मार्को – सॅण्डमॅन ) आणि द अमेझिंग स्पायडर मॅन भाग १ मधील खलनायक डॉ. राइस इफांस (कर्ट काँनर्स – लिझार्ड ) द अमेझिंग स्पायडर मॅन २ मधील जॅमी फॉक्स ( मॅक्स डिलन – इलेकट्रो ) ह्या २ स्पायडर मॅन सोबत लढलेले खलनायक डॉक्टर स्ट्रेंज उलट मंत्रा मुळे परत वर्तमान काळात येतात. हे पाहायला आपल्याला खूपच रोमांचक वाटते. भूतकाळातील खलनायकाशी आणि त्यातील २ स्पायडर मॅन ची भेट होते. एकाच चित्रपटांत ३ स्पायडर मॅन बघायची मजाच भारी होती.
स्टॅन ली स्टिव्ह डिटको यांच्या स्पायडर मॅन कॉमिक्स बुक च्या आधारावर ख्रिस मकेन्ना, एरीक सोमर्स यांनी स्टोरी लिहिली आहे. जॉन वॉट्स यांनी उत्तम प्रकारे दिग्दर्शित केला आहे. थोडीशी कॉमेडी सीन पण तुम्हाला हसायला प्रवत्त करतात. व्ही. एफ. एक्स. चे काम खूप छान पद्धतीने केले गेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला मोहून टाकते. फायटिंग चे एक सीन जो मला खूप अतिशयोक्ती वाटलं तो म्हणजे ओसबॉर्न पीटर पारकर ला एका पाठोपाठ एका भिंतीतून खाली पाडत मारत जात असतो. भल्या मोठ्या पुतळ्यावरील लास्ट फायटिंग चे दृश्य खूपच भारी होते. ३ हि स्पायडर प्रत्येक खलनायकाला टक्कर देतात. स्पायडर मॅन म्हंटल्यावर इकडून तिकडे तिकडून दुसरीकडे अशा लांब लांब उड्या घेतलेले पाहिल्यावर आपल्यालाही हवेत उडावेसे वाटते. ऑक्टोपस जेव्हा ब्रिज वर तोडफोड करतो तेव्हा स्पायडर मॅन एका गाडीवरून जी उडी मारतो ती उडी बघितल्यावर मजा येते. सिनेमॅटोग्रापर आणि संगीत उत्तम आहे.
स्पायडर मॅन चे फॅन आहेत तर तुम्हाला ३ स्पायडर मॅन ची धमाल बघायला आवडेल. पण डॉक्टर स्ट्रेंज चे मल्टिव्हर्स समजायला वेळ लागेल जर का तुम्ही एम सी यू चे फॅन नसाल तर हा चित्रपट फॅमिली सोबत बघून आनंद घेऊ शकता.
“स्पायडरमॅन नो वे होम” कुठे पाहू शकतो.?
ऍमेझॉन प्राईम विडिओ, नेटफ्लिक्स. डिजनी प्लस हॉटस्टार, झी फाईव्ह, गुगल प्ले मुव्ही, यू ट्यूब, ॲपल टी. व्ही. या ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वरती स्पायडरमॅन नो वे होम पाहू शकता. तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी भाडे द्यावे लागेल. प्रत्येक ओ. टी. टी प्लॅटफॉर्म चे रेंट ची अमाऊंट वेगवेगळी आहे. रेंट ची किमंत बदलत राहते.
रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफर, भूमिका, बॅग्राऊंड म्युजिक यासाठी माझ्याकडून स्पायडरमॅन नो वे होम ला ५ स्टार पैकी ३. ७ स्टार देईन.
“स्पायडरमॅन नो वे होम” या चित्रपटातील तुम्हाला आवडलेला स्पायडर मॅन कोणता आहे कंमेंट करायला विसरू नका.