“हॉकआई” वेब सिरीज सर्व भाग समीक्षा | “Hawkeye” Web Series All Episode Review : Jeremy Renner & Hailee Steinfeld Star
Written by : के. बी.
Updated : जुलै 18, 2022 | 8:49 PM
“हॉकआई” वेब सिरीज सर्व भाग समीक्षा | “Hawkeye” Web Series All Episode Review : Jeremy Renner & Hailee Steinfeld
हॉकआई
202१ सीबीएफसी :- यू / ए १३+ कालावधी : – १ तास / भाग सीजन : 1
शैली : – ॲक्शन, गुन्हेगारी, साहसी, सुपरहिरो “जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 3.6 ✰ / 5 ✰
मेन लेखक : – जॉनाथन इग्ला
दिग्दर्शक : – रायस थॉमस, बेर्ट आणि बर्टी
कलाकार : – जेरेमी रेनर, हेली स्टिनफिल्ड, व्हेरा फार्मिगा, फ्रा फ्री, टोनी डाल्टन, झान मॅकक्लार्नन, ब्रायन डी’आर्सी जेम्स, अलाक्वा कॉक्स
![]() |
|
निर्माता : – केविन फिगे, रायस थॉमस, ब्रॅड विंडरबॉम, त्रिन्ह ट्रॅन व्हिक्टोरिया अलोन्सो, लुईस डी’ रेस्पोसिटो,
प्रदर्शित तारीख : – पहिला भाग २४ नोव्हेंबर २०२१ ते सहावा भाग २२ डिसेंबर २०२१
एकूण भाग : – ६
भाषा : – इंग्लिश
देश : – संयुक्त अमेरिका
कथा :-
२०१२ मधील अव्हेंजर्स लढाई करत असतात त्यातील एक अव्हेंजर्स क्लिंट बार्टन “हॉकआई” ज्याच्याकडे कोणतीच अशी पॉवर नाही तरीही तो एलियन शी लढत असताना एक छोट्या मुलीला दिसतो. ती मुलगी केट बिशप जीला हॉकआई बनण्याची इच्छा निर्माण होते. त्या हल्ल्यात वडिलांचे निधन होते. मोठी झाल्यावर ती सर्व काही शिकते. केट ची आई जॅक च्या प्रेमात पडते. बिशप ला जॅक आवडत नाही कारण तो वाईट माणूस आहे याचा तिला संशय येतो. ती जॅक चा माघावर जाते. तिला थॅनॉस संपल्यावर अव्हेंजर्स होते. त्यातील काही अव्हेंजर्स सूट , तलवार, आदी साहित्याचे लिलाव होत असतो. त्या लिलावात बाहेरील गुंड येऊन त्याची चोरी करण्याचा प्रयत्न करत तेव्हा बिशप त्या लिलावासाठी ठेवलेला रोनिन चा सूट घालून ती त्या गुंडाना मारते. ते गुंड तिचा पाठलाग करतात. एका कुत्र्याचे ऍक्सिडेंन्ट होणार इतक्यात बिशप पळत असताना त्या कुत्र्याला वाचवते. हा विडिओ क्लिंट बार्टन एका न्यूज चॅनेल ला पाहतो. आपली ख्रिसमस चे नियोजन करत असतात. क्लिंट बार्टन या ख्रिसमस ला आपल्या फॅमिली सोबत राहण्याचे सांगत असतो. क्लिंट चा स्वतःचा रोनिन सूट च्या वेशात कोण आहे शोध घेण्यासाठी तो आपल्या पत्नीला विचारून घराबाहेर पडतो. त्या सूट मध्ये त्याला बिशप दिसते.
केट ला जॅक चे खरे रूप काय ते आईला दाखवायचे आहे. त्यासाठी ती खूप मेहनत घेते क्लिंट बार्टन ची मदत सुद्धा घेते. क्लिंट ने रोनीन सूट घातल्यावर त्याने बऱ्याच कत्तली केल्या आहेत. त्यामुळे त्याचे ट्रॅकसूट माफिया चे मेंबर मारण्यास पाठीमागे लागले आहेत. आणि ब्लॅक विडो ची बहीण येलेना आपल्या बहिणीचा बदला घेण्यासाठी आली आहे. आता क्लिंट बार्टन ला आपल्या रोनिन सूट ला नष्ट करायचा आहे आणि त्या बिशप चे रक्षण सुद्धा करायचे आहे.
समीक्षा : –
मारवेल कॉमिक्स आधारित “हॉकआई” सिरीज चे दिग्दर्शन रायस थॉमस, बेर्ट आणि बर्टी यांनी उत्तम प्रकारे केलं. याच्या अगोदर “वांडा व्हिजन” , द “फाल्कन अँड द विंटर सोल्डजर”, आणि लोकी या सिरीज बऱ्यापकी होत्या. हॉकआई ने मारवेल ची सिरीज ची पकड मजबूत केली आहे. यात ॲक्शन, सोबत थोडीशी कॉमेडी दिसेल. नेहमीप्रमाणे मारवेल स्टुडिओ चे व्हिजुअल इफेक्ट एकदम मस्त असते. जे पाहायला रिअल वाटतात.
या सिरीज ची सुरुवात “द अव्हेंजर्स” या चित्रपटातील २०१२ साली एलियन्स लढाई होत असते. त्या लढाईत क्लिंट बार्टन इमारती वरून झेप घेत एलियन्स शी लढत असतो ते एक छोटी मुलगी पाहते. ती मुलगी केट बिशप जीला हॉकआई बनण्याची इच्छा निर्माण होते. बिशप रोनिन च्या वेशात असताना क्लिंट बार्टन तिला पकडतो आणि तेथून त्यांच्या सफर ला सुरुवात होते. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र असतात तेव्हा तेव्हा त्या दोघांची मस्ती, बडबड, बघायला मजा येते. आम्हाला वाटले यातील हॉकआई त्याची मुलगी बनेल पण असे काही झाले नाही. काही सांगू शकत नाही कदाचित पुढेही बनवतील. असो पण केट बिशप दोघांची जोडी खूप छान वाटते. जेरेमी रेनर यांनी हॉकआई क्लिंट बार्टन हि भूमिका उत्तम केली आहे. हेली स्टिनफिल्ड यांनी केट बिशप ची भूमिका उत्तम दर्जाची केली. या दोघांची जोडी मुळे जी या सिरीज ला बोर होऊ देत नाही.
आयर्न मॅन टोनी स्टार्क जसे आपले शास्त्र स्वतः बनवतो त्याचप्रमाणे क्लिंट बार्टन सुद्धा वेग वेगळ्या प्रकारचे बाण निर्माण करतो. याआधी तुम्हाला क्लिंट च्या बाणाबद्दल दाखवण्यात आले नव्हते ते सिरीज मधून तुम्हाला दाखवण्यात आले. केट च्या आई चे जॅक शी डेटिंग आणि क्लिंट च्या फॅमिली सोबत असणारे प्रेम यातून तुम्हाला इमोशनल नाटक सुद्धा दिसून येईल.
डेअरडेव्हिल्स सिरीज मधला खलनायक किंगपिन जो गुन्हेगारी जगतातील सर्वात मोठा डॉन आहे. जे त्याला पाहिजे ते तो करवून घेतो. हाच किंगपिन हॉकआई सिरीज मध्ये दिसला. किंगपिन ची व्हिन्सेंट डी’ओनोफ्रीओ यांनी भूमिका साकारली आहे. त्यांची ती भूमिका कुख्यात गुंड असल्याची भासते. यामध्ये त्यांचा थोडासा रोल आहे पण त्यामध्येहि मजबूत अभिनयातून भीती निर्माण केली आहे. ट्रॅकसूट माफिया ची कमांडर एक बधिर आहे. आणि ब्लॅक विडो ची बहीण येलेना यांची फायटिंग सीन खूप रिअल वाटतात.
हळू हळू सिरीज पुढे जात आहे तरीपण बघायला तुम्ही बोर होणार नाही. हि सिरीज तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता. हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ भाषांमध्ये रिलीज केली आहे.
“हॉकआई” सिरीज कुठे पाहू शकतो..?
डिजनी प्लस हॉटस्टार फ्री मध्ये पाहू शकता त्यासाठी डिजनी प्लस हॉटस्टार चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, कथा, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.७ स्टार देईन.