मराठी चित्रपटसृष्टीचेअच्छे दिन – २०२२ मध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याचा सिलसिला अजूनही सुरूच…भाग – २
पहिल्या आर्टिकल मध्ये जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ मधील एकूण १६ चित्रपटांची माहिती आणि समीक्षा पहिली. आता याच्या दुसऱ्या भागात आपण एप्रिल २०२२ – जुलै २०२२ मधील मराठी चित्रपटांची माहिती आणि समीक्षा पाहूया.
“विशू” चित्रपट समीक्षा :- मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित ‘विशू’ हा चित्रपट म्हणजे कोकणात फुललेली प्रेमाची एक अनोखी कहाणी. दोन वेगवेगळ्या मानसिक अवस्था किंवा साध्या सरळ शब्दात सांगायचे तर भिन्न स्वभावाच्या जोडीची ही प्रेमाची गोष्ट एकदा बघण्यासारखी नक्कीच आहे. कोकणातील सौंदर्य तसं शब्दात वर्णन करणे अवघडच. म्हणूनच हे सौंदर्य याची डोळा पहायचं असेल तर विशू हा चित्रपट जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.
१८. मी वसंतराव
२०२२. नाटक / संगीत / कौटुंबिक. २ तास ५५ मिनिटे. [ यु ]
"मी वसंतराव" या नावावरूनच लक्षात येते की हा चित्रपट म्हणजे संगीतक्षेत्रात स्वतःची वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या, स्वतःची विशिष्ट गायकी असणाऱ्या गायक पंडित वसंतराव देशपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे.
प्रवाहाच्या विरुध्द काही करणाऱ्यांना त्रास देणारी जमात ही आधीपासूनच अस्तित्वात असल्यामुळे वयाच्या चाळीशी नंतर सुरू केलेला वसंतरावांचा संगीतक्षेत्रातील प्रवास हा किती खडतर होता हे या चित्रपटात पहायला मिळते. राहुल देशपांडे, अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सांगितीक मेजवानीला माझ्याकडून साडेचार स्टार.
१९. शेर शिवराज
२०२२. ऐतिहासिक, ॲक्शन, नाटक. २ तास ३३ मिनिटे [ यु / ए ]
दिग्पाल लांजेकर यांच्या "शिवराज अष्टक" या मालिकेतील चौथा सिनेमा म्हणजे "शेर शिवराज - स्वारी अफजलखान'. नावावरूनच लक्षात येते की हा चित्रपट म्हणजेच अफजलखानाच्या वधाचा थरार यात पहायला मिळतो.' मुकेश रिशी' या हिंदी कलाकाराने या चित्रपटात अफजल खानाची भुमिका साकारली आहे. ऐतिहासिक कलाकृतीला न्याय द्यायचा म्हटल्यावर बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि दिग्दर्शक दिग्पाल यांनी प्रत्येक चित्रपटात ही काळजी घेतलेली दिसून येते. आपल्या लहान मुलांना तुम्ही अफजलखानाच्या वधाची गोष्ट अजून सांगितली नसेल तर हा चित्रपट त्यांना जरूर दाखवा. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईम वर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
२०. चंद्रमुखी
२०२२. प्रणय / नाटक. २ तास ४४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक
चिन्मय मांडलेकर
दिग्दर्शक
प्रसाद ओक
स्टारकास्ट
अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे
प्रदर्शित तारीख
२९ एप्रिल २०२२
भाषा
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३. ५ ⭐/ ५⭐
“चंद्रमुखी” चित्रपट समीक्षा :-
"चंद्रमुखी' या चित्रपटातील संगीताने सर्वांना घातलेली भुरळ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवून आहे. कान्हा, चंद्रा या गाण्यांनी तर रेकॉर्ड केले. अमृता खानविलकर हीने सादर केलेली लावणी कलावंतीण जशीच्या तशी हुबेहूब साकारली आहे. तिने या भुमिकेसाठी घेतलेली मेहनत नक्कीच दिसून येते.
लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित हा चित्रपट आहे. प्रसाद ओक यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटासाठी सगळ्यांनीच फार मेहनत घेतली आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या 'चंद्रा'ची प्रेमकहाणी 'चंद्रमुखी' सिनेमात अतिशय रंजकपणे दाखवण्यात आली आहे. मृण्मयी देशपांडे हीच्या वाटणीला आलेली छोटीशी भूमिका पण तीने दमदारपणे निभावली आहे.
ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
२१. अदृश्य
२०२२. भयपट, सस्पेन्स, रोमांचक, २ तास २१ मिनिटे. [ यु / ए ]
"प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेस" हा आजार असणाऱ्या दोन जुळ्या बहिणींची ही कथा. मुळ स्पॅनिश भाषेतील '
‘ज्युलियाज आइज’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. त्यामुळेच हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे मनावर ताबा मिळवत नाही. एखाद्या वेगळ्या भाषेतील चित्रपटाचा रिमेक बनवताना आपल्या भाषेतील पटकथा आणि संवाद तेवढेच दमदार असायला हवेत पण नेमका तिथेच हा चित्रपट फसतो. बाकी अभिनय, उत्तम छायाचित्रणासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. पाहुणा कलाकार म्हणून रितेश देशमुखची या चित्रपटात वर्णी लागली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२२. धर्मवीर
२०२२. जीवनचरित्र, नाटक. २ तास ५८ मिनिटे. [ यु / ए ]
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३ .६⭐/ ५⭐
“धर्मवीर” चित्रपट समीक्षा :-
ठाणे शहर म्हटलं की आनंद दिघे हे आपसूकच आठवतं. त्यांना जाऊन वीसेक वर्षं होतील पण अजूनही ठाणेकरांच्या आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या मनात असलेलं त्यांच्याबद्दलच प्रेम , त्यांचं स्थान अढळ आहे. आनंद दिघे यांच्याबद्दल लोकांना किती आपुलकी होती हे धर्मवीर चित्रपट बघताना जाणवतं. प्रसाद ओक याने आनंद दिघे यांना हुबेहूब आपल्यासमोर उभं केलं आहे असं वाटतं. खरं तर चित्रपट कथानकाच्या आणि दिग्दर्शनाच्या दृष्टीने अजून सक्षम होऊ शकला असता पण तरीही आनंद दिघे यख माणसाला जाणून घ्यायचं असेल तर धर्मवीर हा चित्रपट जरूर बघा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
२३. सरसेनापती हंबीरराव
२०२२. ऐतिहासिक, ॲक्शन, नाटक. २ तास ३८ मिनिटे.[ यु / ए ]
स्वराज्याचे कर्तबगार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची महती सांगणारा हा चित्रपट बघताना तुमची छाती अभिमानाने फुलून आल्याशिवाय राहणार नाही. कथा, पटकथा, दिग्दर्शन, संवाद आणि मुख्य भूमिका या सगळ्याच जबाबदाऱ्या प्रविण तरडे यांनी अतिशय उत्तम आणि लिलया पार पाडल्या आहेत. गश्मिर महाजनी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या दोन्ही भूमिका उत्तम साकारल्या आहेत. महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य टिकवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे खंबीरपणे उभी असलेली व्यक्ती म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. क्वचित प्रसंगी काहीतरी राहून गेलंय असं वाटलं तरी आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास सांगणारा हा चित्रपट एकदा तरी बघायलाच हवा. नेटफ्लिक्स , हॉटस्टार, वूट वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३ .०⭐/ ५⭐
“फनरल” चित्रपट समीक्षा :-
वाईटातही चांगलं शोधायला आणि बघायला लिवणारा हा चित्रपट आहे. 'हिरा' नावाच्या नायकाची ही कथा आहे. माणसाच्या मृत्यूनंतर कितीतरी नको त्या रीती आपण पाळत असतो. ते सोडून त्या माणसाची शेवटची इच्छा पुरवण्यासोबतच इतरही समाजहितासाठी आपण खूप काही करू शकतो हे या चित्रपटाच्या निमित्ताने खूप छान पद्धतीने दाखवण्यात आले आहे. 'फ्युनरल' ते 'फनरल' चा सुरूवातीला विनोदी वाटणारा पण तेवढंच गांभीर्य असणारा हा प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.
२५. अन्य
२०२२. गुन्हेगारी, नाटक. २ रास १९ मिनिटे. [ यु / ए ]
सिम्मी जोसेफ दिग्दर्शित अन्य हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. समाजात घडणारे अत्याचार, कुपोषण, बालमजुरी, आत्महत्या, मानवी तस्करी अशा महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घालणारा हा चित्रपट आहे. समाजात घडणाऱ्या या घटनांमध्ये राजकीय नेत्यांची भुमिका किती दुटप्पी असते हे प्रकर्षाने जाणवतं. तगडी कलाकार मंडळी एकत्र आल्यामुळे अभिनयाच्या बाबतीत या चित्रपटाचं पारडं नक्कीच जड आहे. झी फाईव्ह सिनेमा वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२६. आठवा रंग प्रेमाचा
२०२२. नाटक, प्रणय. १ तास ५८ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शक
खुशबू सिन्हा
कलाकार
रिंकू राजगरू, मकरंद देशपांडे, विशाल आनंद, आशिष वारंग, कांचन जाधव, तुषार कावले, अदिती पाटील
एकतर्फी प्रेम आणि त्यातून निर्माण होणारी सुडाची भावना हा विषय चित्रपटांसाठी काही नवीन नाही. पण अशाच सुडाच्या भावनेतून झालेल्या ॲसिड हल्ल्याची ही वेदनादायी कथा खुशबू सिन्हा यांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने पहील्यांदाच मराठी चित्रपटातून मांडली आहे. रिंकू राजगुरू हीची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात मकरंद देशपांडे यांनी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित वाय हा चित्रपट बघण्यासाठी मुक्ता बर्वे हे एक आरण पुरेसं असलं तरीही हा चित्रपट बघण्यासाठी अजूनही खूप कारणं आहेत. वास्तववादी चित्रण असलेला हा चित्रपट "स्त्रीभ्रूणहत्या" या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर भाष्य करणारा एक थरारपट आहे. हा चित्रपट पाहताना तुम्ही माणूस म्हणून अंतर्मुख होऊन विचार नाही केला तर नवलच. प्लॅनेट मराठी, ॲमेझॉन प्राईम, झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, हेमांगी कवी या कलाकारांची नखवं वाचल्यावर लक्षात आलच असेल की हा चित्रपट नक्कीच धमाल असणार आहे. नवीन, वेगळं म्हणजेच काव्याच्या धर्तीवर हा चित्रपट बेतलेला आहे. पुन्हा एकदा समाजाला चार चांगल्या गोष्टी आपल्या स्टाईलने दाखवण्याचा प्रयत्न संजय जाधव यांनी केला आहे. सोनाली कुलकर्णी नेहमीप्रमाणेच या चित्रपटात सुद्धा झळकली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
२९. अनन्या
२०२२, नाटक. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शक
प्रताप फड
कलाकार
ऋता दुर्गुळे,अमेय वाघ,चेतन चिटणीस,ऋचा आपटे,योगेश सोमण,सुव्रत जोशी
घरातील एक व्यक्ती दवाखान्यात ॲडमीट असेल किंवा आजारी असेल तर अख्खं घर आजारी पडल्यासारखं असतं. तेच या चित्रपटात पहायला मिळत. एका अपघातात आपले हात गमावलेल्या एका जिद्दी अनन्याची ही कथा आहे. पण कथेमध्ये तिच्यासोबत घरातील इतर सदस्यांवर काय परिणाम होतो आणि त्यांची भुमिका काय असते हे विशेष महत्त्वाचं आहे. एकांकिका, दोन अंकी नाटक आणि आता चित्रपटाच्या माध्यमातून ही कथा आपल्या भेटीला आलेली आहे. दिग्दर्शक आणि लेखक प्रताप फड यांनी अतिशय सुंदर ही कथा चित्रित केलेली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.
३०. टाईमपास ३
२०२२. प्रणय, नाटक. २ तास २७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शक
रवी जाधव
कलाकार
ऋता दुर्गुळे, प्रथमेश परब, संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले
टाईमपास मधील दगडू आणि प्राजूच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता याच दगडूसोबत प्राजू नाही तर पालवी बघायला मिळते. ती त्याच्या आयुष्यात का आणि कशी आली हे बघण्यासाठी टाईमपास ३ हा चित्रपट बघायला हवा. प्रथमेश परब आणि ऋता दुर्गुळे हे पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करत आहेत. बिनधास्त, डॅशिंग अशी पालवी ऋता ने छान साकारली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.