FilmsFilms NewsMarathiMarathi Films

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी – भाग 3 – ( ऑगस्ट २०२२ – डिसेंबर २०२२ मधील मराठी चित्रपट )

Written by : आकांक्षा कोलते

Updated : नोव्हेंबर 28, 2022 | 11:16 PM

all marathi film in 2022 part 3

१. दे धक्का २
२०२२. विनोदी, नाटक. २ तास १२ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकमहेश मांजरेकर
कलाकारमकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आणि संजय खापरे , गौरी इंगावले, सक्षम कुलकर्णी
प्रदर्शित तारीख५ ऑगस्ट २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

दे धक्का २” चित्रपट समीक्षा :-

     जवळपास बारा वर्षांपूर्वी दे धक्का चित्रपट प्रदर्शित झाला होता पण आजही टेलिव्हिजन वर सुद्धा लोकं तो चित्रपट तेवढ्याच आवडीने बघतात. म्हणूनच जर तुम्ही त्याच अपेक्षेने किंवा उत्साहात हा दे धक्का २ बघायला जाल तर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो. थेट लंडनवारी घडवणारा हा चित्रपट डोकं लावून बघायला जाल तर विनोंदांची मजा घालवून बसाल. आणि पहीला दे धक्का विसरून बघाल तर या चित्रपटाचा आनंद तुम्ही घेऊ शकता.  माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.

२. एकदा काय झालं
२०२२, कौटुंबिक. २ तास १० मिनिटे. [ यु ]
लेखकडॉ. सलील कुलकर्णी
दिग्दर्शकडॉ. सलील कुलकर्णी
स्टारकास्ट उर्मिला कानेटकर, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, अद्वैत गुळेकर, राजेश भोसले, सतिश आळेकर, ऋषिकेश देशपांडे
प्रदर्शित तारीख५ ऑगस्ट २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६/ ५

“एकदा काय झालं” चित्रपट समिक्षा :-

      वडिलांचा प्रकाशनाचा चालू असलेला व्यवसाय बंद करून शिक्षणात वेगळे प्रयोग करणारी "नंदनवन" नावाची शाळा सुरू करणारा किरण (सुमीत राघवन) आणि त्याचा मुलगा चिंतन (अर्जुन पूर्णपात्रे) यांची ही गोष्ट आहे. यात किरणची पत्नी श्रुती म्हणून (उर्मिला कानेटकर), तर आई- (सुहास जोशी), वडील (डॉ. मोहन आगाशे) यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 
  वाढत्या वयातील मुलगा आणि त्याचे वडील यांच्या नात्यातील बंध उलगडणारा हा सिनेमा म्हणजे "एकदा काय झालं.." सलील कुलकर्णी लिखीत आणि दिग्दर्शित हा चित्रपट बघताना तुम्ही अंतर्मुख होऊन जाल हे नक्की. ही आपलीच गोष्ट आहे असं वाटावं हेच या चित्रपटाचं यश! माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.

३. टकाटक २
२०२२. विनोदी, प्रणय. २ तास ११ मिनिटे [ ए ]
दिग्दर्शकमिलिंद कवडे
कलाकारप्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम
प्रदर्शित तारीख१९ ऑगस्ट २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“टकाटक २” चित्रपट समीक्षा :-

  हल्लीच्या तरूण पिढीला जे आवडेल ते सगळं या चित्रपटात आहे. तरूण मित्र मैत्रिणींचा ग्रुप, मज्जा, धमाल, मस्ती, गाणी आणि बोल्ड सीन्स असा सगळा मसाला असलेला हा चित्रपट दगडी चाळ २ या चित्रपटासोबतच प्रदर्शित झाला होता पण तरीही प्रेक्षकांना सिनेमागृहिपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी झाला होता. निव्वळ मजा मस्ती आणि मनोरंजन म्हणून बघायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. 

४. दगडी चाळ २
२०२२. गुन्हेगारी, नाटक. २ तास १३ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकचंद्रकांत कणसे
कलाकारअंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, पुजा सावंत
प्रदर्शित तारीख१९ ऑगस्ट २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३ .१⭐/ ५

दगडी चाळ २” चित्रपट समीक्षा :-

    गुन्हेगारी विश्वातून बाहेर पडू पाहणारा सुर्या, त्याच्यासमोर असणारी नवी आव्हानं , डॅडी उर्फ अरुण गवळी यांची या सगळ्यामागे असलेली भुमिका आणि या सगळ्याचा सुर्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम हे सगळं आपल्याला दगडी चाळ २ या सिनेमात बघायला मिळतं. 
    निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर डॅडींना सुर्याची गरज भासते. पण गुन्हेगारी विश्वाला रामराम ठोकलेला सुर्या डॅडींना मदत करतो का.? की या दोघांमध्ये संघर्ष सुरू होतो.! हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. 

५. रूप नगर के चिते
२०२२. नाटक. २ तास ५६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकविहान सूर्यवंशी
कलाकारकरण परब, कुणाल शुक्ल, सना प्रभू, मुग्धा चाफेकर, आयुषी भावे, हेमल इंगळे, ओंकार भोजने
प्रदर्शित तारीख१६ सप्टेंबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“रूप नगर के चिते” चित्रपट समीक्षा :-

   रूप नगर नावाच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या मित्रांची ही गोष्ट आहे. दोन मित्रांमध्ये असलेल्या घनिष्ठ मैत्रीमध्ये कसा दुरावा येतो..? गैरसमज निर्माण होतात. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या मैत्रिणींमुळे त्यांची मैत्री कशी तुटते वैगरे ही सगळी तीच तीच वर्षानुवर्षे चालत आलेली कथा. नवीन असं काही नसल्यामुळे चित्रपट तुम्हाला आवडेल की नाही शंका आहे. त्यामुळे अगदीच वेळ जात नाहीय म्हणून काही बघायचं असेल तर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार. 

६. बॉईज ३
२०२२. विनोदी, २ तास १६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकविशाल देवरुखकर
कलाकारपार्थ भालेराव,प्रतीक लाड,सुमंत शिंदे,विदुला चौगुलेदर्जा
प्रदर्शित तारीख १६ सप्टेंबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३ .०⭐/ ५

बॉईज ३” चित्रपट समीक्षा :-

   धैर्य, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुट पुन्हा एकदा बॉईज ३ च्या निमित्ताने प्रेक्षकांना भेटायला आले आहेत, ते पण नवीन अंदाजात. याआधीच्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तोच प्रतिसाद या चित्रपटाला सुद्धा मिळाला. विशेष म्हणजे आधी या सिरीजमध्ये दोन चित्रपट येऊन गेले असले तरी बॉईज ३ हा स्वतंत्र वेगळी कथा असलेला एक धमाल चित्रपट आहे. तीन मित्र, त्यांचा पुणे ते कर्नाटक असा प्रवास, प्रवासात भेटलेली एक मुलगी जी स्वतःच्या लग्नातून पळून आलेली आहे. ती त्यांना भेटल्यावर त्यांच्या प्रवासात कोणतं नवं वळण येतं हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. 

७. राडा
२०२२. ॲक्शन, नाटक. २ तास १ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकरितेश सोपान नरवाडे
कलाकारआकाश शेट्टी, मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड, योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा
प्रदर्शित तारीख२३ सप्टेंबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

“राडा” चित्रपट समीक्षा :-

  "राडा" या चित्रपटाच्या नावावरूनच लक्षात येते की या चित्रपटात राडे असणार! साऊथ स्टाईल कॉपी केलेला हा मराठी चित्रपट म्हणजे मारामारी, ॲक्शन सीन, स्टंटबाजी या सगळ्यांनी खचाखच भरलेला आहे. ॲक्शनसोबत कॉमेडी आणि रोमॅंटिक सीन्स सुद्धा या सिनेमात बघायला मिळतात. आकाश शेट्टी या नवोदित कलाकाराने या चित्रपटातून पदार्पण केले आहे. मारामारी न आवडणाऱ्या लोकांना हा चित्रपट कंटाळवाणा वाटू शकेल. बाकी माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.

८. शिवप्रताप गरूडझेप
२०२२. ऐतिहासिक, ॲक्शन, नाटक. २ तास १५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शककार्तिक केंढे
कलाकारडॉ. अमोल कोल्हे, यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक भारतीया, हरीश दुधाडे
प्रदर्शित तारीख१० जुन २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६⭐/ ५

शिवप्रताप गरूडझेप” चित्रपट समीक्षा :-

  अलिकडच्या काळात शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडवणारे किंवा आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगणारे, आपल्या मावळ्यांच्या शौर्यगाथा सांगणारे बरैच हिंदी मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. शिवप्रताप गरूडझेप हा चित्रपट सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची "आग्रा भेट आणि सुटकेचा थरार" या प्रसंगावर आधारित आहे. डॉ. अमोल कोल्हे यांना याआधी पण आपण महाराजांच्या भुमिकेमधे पाहीलेलं आहे. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी अभिनय चित्रपटाला साजेसा असा केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं चित्रीकरण थेट दिल्लीतील लाल महालात झालं आहे. थोड्या फार तांत्रिक गोष्टी सोडल्या तर आपल्या महाराजांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी बघायलाच हवा. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. 

९. आपडी थापडी
२०२२. विनोदी, नाटक. २ तास. [ यु / ए ]
दिग्दर्शकआनंद करीर
कलाकारश्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे , नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी
प्रदर्शित तारीख५ ऑक्टोबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“आपडी थापडी” चित्रपट समीक्षा :-

    आपल्या लहानपणी आपण सगळ्यांनी ऐकलेलं गाणं म्हणजे "आपडी थापडी गुळाची पापडी". खरं तर हा एक खेळ आहे जो लहानपणी सगळेच खेळतात. पण आताचा हा आपडी थापडी म्हणजे एक चित्रपट आहे. एका छोट्या मुली भोवताली फिरणारी कथा.  ही गोष्ट आहे तिच्या अतिशय अतिशय कंजूस असलेल्या बाबांची म्हणजेच सखाराम पाटलाची. बाकी कशाही पेक्षा जेव्हा पैशाला महत्त्व देऊन प्रत्येक गोष्टीत हिशोब बघणारा हा सखाराम पाटील.  ही भूमिका साकारली आहे गुणी कलाकार श्रेयस तळपदे याने. आणि चित्रपटाला चार चांद लावलेत या पाटलाच्या बायकोने म्हणजेच मुक्ता बर्वे हीने. 
     चांगले कथानक, कोकणाची सफर, दर्जेदार अभिनय हे सगळं बघायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. 

१०. हवाहवाई
२०२२. नाटक, परिवार. २ तास ३१ मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शकमहेश टिळेकर
कलाकारनिमिषा सजयन, वर्षा उसगावकर, संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले
प्रदर्शित तारीख७ ऑक्टोबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

हवाहवाई” चित्रपट समीक्षा :-

   आयुष्यात जिद्दीने काहीतरी करु पाहणाऱ्या प्रत्येक स्रीची प्रेरणादायी कथा सांगणारा हा चित्रपट आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात "निमिषा सजयन" या मल्याळम अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारत सर्वांनाच अचंबित केले आहे. अर्थातच वर्षा उसगावकर यांनी सुद्धा महत्वाची भूमिका साकारली आहे. 
   परिस्थिती कशीही असली तरी घरातील स्त्री ही सदैव आपल्या परिवाराचा विचार करत असते. प्रसंगी ती हळवी होते तर प्रसंगी खंबीर. वेळ पडली तर अख्ख्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी स्वतः पदर खोचून कामधंदा करतात. अशाच एका फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलेची ही कथा आहे. चित्रपट बघताना बऱ्याचदा वास्तवतेची जाणीव होते. हृदयाला हात घालणारा हा चित्रपट नक्कीच बघावा असा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. 

११. हरहर महादेव
२०२२. ऐतिहासिक, ॲक्शन, नाटक. २ तास ४२ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअभिजीत देशपांडे
कलाकारशरद केळकर, सुबोध भावे, निशिगंधा वाड, अमृता खानविलकर, हार्दिक जोशी
प्रदर्शित तारीख२५ ऑक्टोबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

हरहर महादेव” चित्रपट समीक्षा :-

   प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाबद्दल बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. २५ ऑक्टोबर ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट बांदल सेनेचे प्रमुख बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट बघताना आपण आपसूकच काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या पावनखिंड या सिनेमासोबत तुलना करतो. ऐतिहासिक चित्रपट बनवायचा म्हणजे जबाबदारी वाढते किंबहुना त्या जबाबदारीचं भान ठेवून इतिहास मांडला गेला पाहिजे. पण ही गोष्ट या चित्रपटाच्या बाबतीत कमी पडलेली दिसते. पण एकंदर बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतार बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. 

१२. मन‌ कस्तुरी रे
२०२२. नाटक, प्रणय. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकसंकेत माने
कलाकारअभिनय बेर्डे, तेजस्वी प्रकाश, वीणा जामकर
प्रदर्शित तारीख४ नोव्हेंबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

मन‌ कस्तुरी रे” चित्रपट समीक्षा :-

   ४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या मन कस्तुरी रे या  चित्रपटात तेजस्वी प्रकाश, अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत  असून या चित्रपटात प्रेम ,रोमान्स, द्वेष, सुडाची भावना, सस्पेन्स असं सगळंच बघायला मिळेल. सर्वसामान्य घरातील कष्टाळू, संस्कारी मुलगा आणि श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी , त्यांचं प्रेम त्याला होणारा विरोध अशी टिपीकल फिल्मी कथा असली तरी त्यात नंतर एक ट्विस्ट येतो. तो काय बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. 

१३. सनी
२०२२. नाटक. २ तास २३ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकहेमंत ढोमे
कलाकारललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग , अभिषेके देशमुख, अमेय बर्वे, पार्थ केतकर
प्रदर्शित तारीख२९ जुलै २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.२⭐/ ५

सनी” चित्रपट समीक्षा :-

     गेल्या वर्षी हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष आवडला होता. म्हणूनच सनी या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. या चित्रपटाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाचा एक शो दाखवण्यात आला होता. मराठी चित्रपटसृष्टीत हे पहील्यांदाच झालं आहे. "घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट" ही सिनेमाची टॅग लाईन आहे आणि हीच सिनेमाची गोष्ट सुद्धा. अतिशय सुंदर अशी कथेची मांडणी आहे. दिग्दर्शन सुद्धा अप्रतिम. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार. 

१४. जेता
[ यु / ए ]
दिग्दर्शकयोगेश महाजन
कलाकारनीतिश चव्हाण, स्नेहल देशमुख, शरद गोयेकर, अनिकेत केळकर
प्रदर्शित तारीख२५ नोव्हेंबर २०२२
भाषामराठी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

“जेता” चित्रपट समीक्षा :-

   जीवनात अतिशय कष्ट करून प्रतिकूल परिस्थितीत संघर्षावर मात करून यशस्वी होणाऱ्या ध्येयवेड्या तरुणाची ही गोष्ट आहे. नावावरूनच कळतं ही गोष्ट आहे एका जिद्दीने मिळवलेल्या विजयाची. एका वीजेत्याची ही गोष्ट आहे. अभिनेता नितीश चव्हाण हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळतो. याच कथेवर आधारित बरेच चित्रपट याआधी पण येऊन गेल्यामुळे नवं असं काही सापडत नाही पण तरीही चित्रपट बघायचा असेल तर  चित्रपटगृहात जाऊन तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. 

१५. एकदम कडक
२०२२. विनोदी. नाटक. २ तास १० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकगणेश शिंदे
कलाकारपार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे , अरबाज
प्रदर्शित तारीख२ डिसेंबर २०२२
भाषामराठी

“जगभरून फिल्म्स” चित्रपट समीक्षा :-

   एकंदर नावावरून आणि पोस्टर वरून तरी असं वाटतंय की चित्रपट सुद्धा एकदम कडक असणार आहे. २०२२ मध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले, त्यापैकी काही सोडले तर प्रेक्षकांच्या पसंतीस सुद्धा उतरले. त्यामुळे एकदम कडक हा चित्रपट कसा असेल हे २ डिसेंबरलाच कळेल. सगळ्यांचा आवडता कलाकार पार्थ भालेराव हा या चित्रपटात असून त्याच्यासोबत सैराट फेम तानाजी गलगुंडे व अरबाज हे दोघं सुद्धा धमाल करायला येत आहेत. 

१६. वेड
[ यु / ए ]
दिग्दर्शकरितेश देशमुख
कलाकाररितेश देशमुख, जेनेलिया डिसुझा
प्रदर्शित तारीख३० डिसेंबर २०२२
भाषामराठी

“वेड” चित्रपट समीक्षा :-

    ३० डिसेंबर ला प्रदर्शित होणारा "वेड" हा चित्रपट रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या दोघांचा एकत्र काम केलेला पहिला मराठी चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन सुद्धा रितेश देशमुख याने स्वतः केलेलं आहे. प्रेम म्हटलं की प्रेमात वेड हे आलंच. हेच वेड काय काय करायला लावतं हे दाखवणारा हा चित्रपट आहे. जेनेलिया आणि रितेश या दोघांना मराठी पडद्यावर एकत्र बघण्यासाठी  सगळेच आतुर आहेत. टीझर वरून चित्रपट खास असणार हे नक्की. 

१७. ऑटोग्राफ
[ यु / ए ]
दिग्दर्शकसतिश राजवाडे
कलाकारअंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे , मानसी मोघे
प्रदर्शित तारीख३० डिसेंबर २०२२
भाषा

ऑटोग्राफ” चित्रपट समीक्षा :-

    प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची एक विशिष्ट ओळख, कामाची पद्धत असते. सतिश राजवाडे यांचे आतापर्यंतचे सगळेच चित्रपट प्रेक्षकांना आवडले. प्रेम सेम असलं तरी प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते आणि तीच दाखवण्याचा प्रयत्न सतिश राजवाडे आपल्या चित्रपटांतून करत असतात. ऑटोग्राफ हा चित्रपट सुद्धा नातेसंबंधावल भाष्य करणारा आहे. आयुष्यात प्रत्येक जण काही कारणांमुळे आपल्या आयुष्यात येतो आणि तो गेला तरी त्याच्या सोबतच्या आठवणी त्याच्यासोबतच्या नात्याचा धागा हा कायम राहतो. अशीच काहीशी अव्यक्त प्रेमाची , आठवणींची, आयुष्यावर आणि मनावर छाप पाडणाऱ्या नात्यांची ही गोष्ट आहे. नात्यांची गुंफण उलगडणारा हा चित्रपट सिनेमागृहात नक्की जाऊन बघा. 

हे हि वाचा : –

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी – भाग १ – ( जानेवारी २०२२ – मार्च २०२२ मधील मराठी चित्रपट )

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपटांची यादी – भाग २ – ( एप्रिल २०२२ – जुलै २०२२ मधील मराठी चित्रपट )

बॉलिवूडला पण मागे टाकणारे २०२२ मधील पाच सुपरहिट मराठी चित्रपट तुम्ही पाहीलेत का..?

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेले आणि लॉकडाऊन सुसह्य करणारे हे काही मराठी सिनेमे/ वेबसिरीज तुम्ही पाहीले नसतील तर जरूर बघा…

यामधील तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता हे कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *