HomeFilmsFilms NewsHindi

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – २ | एप्रिल २०२२ – जून २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

मित्रांनो जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपटांची यादी आपण पहिल्या भागात पाहिली आहे. आता आपण एप्रिल २०२२ – जून २०२२ पर्यंत प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी पाहणार आहोत.

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जानेवारी 09, 2023 | 10:40 PM

all Hindi films released in 2022 part 2 1
१६. अटॅक : भाग – १
२०२२. ॲक्शन, विज्ञानकथा. २ तास १० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकलक्ष्य राज आनंद
कलाकारजॉन अब्राहम, रकुल प्रीत सिंग, जॅकलिन फर्नांडिस, प्रकाश राज
प्रदर्शित तारीख१ एप्रिल २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.७⭐/ ५

अटॅक : भाग – १” चित्रपट समीक्षा :-

जॉन अब्राहम म्हटलं की त्याचे एकाच ठराविक पठडीतील चित्रपट आठवतात. अख्ख्या सिनेमात चेहऱ्यावर एकच भाव घेऊन तो वावरत असतो पण त्यातल्या त्यात त्याच्या आधीच्या सिनेमांपेक्षा हा चित्रपट चांगला आहे. यात त्यिने एका सोल्जरची भूमिका साकारली आहे. त्याचे ॲक्शन सीन, बाईकवरचे सीन, फाईटींगचे सीन्स नक्कीच चांगले आहेत. एक आर्टिफिशियल “सुपरसोल्जर” बनवून दहशतवादापासून देशाला वाचवणं ही या चित्रपटाची कथा आहे. लॉजिक लावून चित्रपट बघायला जाल तर निश्चितच निराशा पदरात पडेल. ॲक्शन सीन वैगरे आवडत असतील तर एकदा बघायला हरकत नाही. झी फाईव्ह वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


१७. कौन प्रवीण तांबे?
२०२२. जीवनचरित्र, खेळ, नाटक. २ तास १४ मिनिटे.
दिग्दर्शकजयप्रद देसाई
कलाकारश्रेयस तळपदे, अंजली पाटील
प्रदर्शित तारीख१ एप्रिल २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.८⭐/ ५

“कौन प्रवीण तांबे?” चित्रपट समीक्षा :-

“कौन है प्रवीण तांबे?” तुम्हाला पण हा प्रश्न पडलाय का.? पडला असेल आणि तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर जरूर हा चित्रपट बघायला हवा. आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची असेल, ध्येय गाठायचं असेल तर ते मिळवण्यासाठी “वय” हे तुमचं कारण असूच शकत नाही हे सिद्ध करणारा क्रिकेटपटू म्हणजे प्रवीण तांबे. प्रवीण तांबे म्हणजे एक असा अवलिया ज्याने वेळेला सुद्धा चॅलेंज दिलं आणि ते जिंकलं सुद्धा. राहुल द्रविडने दिलेल्या संधीचं सोन करणाऱ्या या प्रवीण तांबे ची ही प्रेरणादायी कथा तुम्ही एकदातरी बघायलाच हवी. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार. डिस्नी हॉटस्टार वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


१८. कोबाल्ट ब्ल्यू
२०२२. प्रणय, नाटक. १ तास ५२ मिनिटे.
दिग्दर्शकसचिन कुंडलकर
कलाकारप्रतीक बब्बर, गीतांजली कुलकर्णी, शिशिर शर्मा, नीलय मेहेंदळे, अंजली शिवरामण, नील भूपालम, अनंत जोशी, पूर्णिमा इंद्रजित
प्रदर्शित तारीख२ एप्रिल २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

कोबाल्ट ब्ल्यू” चित्रपट समीक्षा :-

१९९६ मधला हा काळ. केरळमधील कोची येथील एका भागात घडणारी कथा. त्या काळात “समलिंगी संबंध” हा मुद्दा किती नाजूक होता हे सांगण्याची गरज नाही पण याच नाजूक विषयावर त्या काळातील कथा पडद्यावर मांडण्यात दिग्दर्शक सचिन कुंडलकर यशस्वी झाले आहेत. खरं तर या चित्रपटाला बऱ्याच छटा आहेत. काही चित्रपट असे असतात की ते अनुभवायचे असतात. कोबाल्ट ब्ल्यू त्यापैकीच एक. प्रतीक बब्बर, गीतांजली कुलकर्णी , शिशिर शर्मा, या सगळ्यांनीच उत्तम अभिनय केला आहे.


१९. दसवी़
२०२२. २ तास ६ मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शकतुषार जलोटा
कलाकारअभिषेक बच्चन, निम्रत कौर, यामी गौतमी, मनु रिषी चड्ढा, चित्तरंजन त्रिपाठी
प्रदर्शित तारीख७ एप्रिल २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ०.०⭐/ ५

दसवी़” चित्रपट समीक्षा :-

अभिषेक बच्चनला बऱ्याच काळानंतर दसवी या चित्रपटात पहायला मिळतं तेही एका राजकारणी तथा मुख्यमंत्र्यांच्या भुमिकेत. कधी कधी एखाद्या चित्रपटाचा विषय अतिशय सुंदर आणि सक्षम असतो पण तो योग्य प्रकारे जर पडद्यावर मांडण्यात आला नाही तर तो विषय कीतीही चांगला असला तरी त्याचा परिणाम हवा तसा मिळत नाही. हेच या चित्रपटाच्या बाबतीत झालं आहे हे बघताना नक्कीच जाणवतं. “शिक्षण” , किंवा शिक्षणाची गरज या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


२०. हुड़दंग
२०२२. नाटक. २ तास २ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकनिखिल नागेश भट
कलाकारसनी कौशल , नुसरत भरुचा
प्रदर्शित तारीख८ एप्रिल २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

“हुड़दंग” चित्रपट समीक्षा :-

हुड़दंग हा चित्रपट आरक्षण मुद्द्यावर भाष्य करणारा आहे. १९९० च्या काळातील आरक्षण विरोधी आंदोलन कशाप्रकारे सरकार कडून हाणून पाडण्यात आले , त्यावेळी आंदोलकांवर कशा प्रकारे अन्याय करण्यात आला हे सर्व या चित्रपटात पहायला मिळते. सनी कौशल आणि नुसरत भरुचा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात बरंच काही अजून दाखवता आलं असतं. पण काही ठिकाणी विषय, कथा सक्षम असून सुद्धा चित्रपट संथ वाटतो. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


२१. जर्सी
२०२२. प्रणय, नाटक. २ तास ५० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकगौतम तिन्ननूरी
कलाकारशाहिद कपूर, मृणाल ठाकूर, पंकज कपूर, रोनित कर्मा, गीतिका मेहंद्रू, शिशीर शर्मा, रितुराज
प्रदर्शित तारीख२२ एप्रिल २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“जर्सी” चित्रपट समीक्षा :-

क्रिकेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय. बरेच तरूण तर क्रिकेटर व्हायचं स्वप्न देखील बघतात पण सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होतात असं नाही. कारण खेळण्याची जिद्द, चिकाटी, क्षमता असली तरी परिस्थिती आडवी येते. हा चित्रपट अशाच आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या बापाची धडपड दाखवणारा आहे. शाहीद कपूर हा एक उत्कृष्ट कलाकार आहे हे त्याने बऱ्याच वेळा दाखवून दिलं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी फाईव्ह, मॅक्स प्लेयर वर बघू शकता.


२२. ऑपरेशन रोमियो
२०२२. रोमांचक, नाटक. २ तास १५ मिनिटे. [ ए ]
दिग्दर्शकशशांत शाह
कलाकारशरद केळकर,सिद्धांत गुप्ता,वेदिका पिंटो,किशोर कदम
प्रदर्शित तारीख२२ एप्रिल २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

“ऑपरेशन रोमियो” चित्रपट समीक्षा :-

सत्य घटनेवर आधारित ‘ऑपरेशन रोमियो’ हा सिनेमा ‘इश्क-नॉट लव्ह स्टोरी’ या मल्याळी सिनेमाचा रिमेक आहे. चित्रपटाचं कथानक थोडक्यात “करावे तसे भरावे” या संकल्पनेवर उभं आहे. केलेल्या चुकांची शिक्षा पुढच्या जन्मात मिळते वैगरे आता कालबाह्य झालं. आता तुम्ही केलेल्या पापाचे फळ याच जन्मात फेडायला लागतं हे सांगणारा हा सिनेमा आहे. “नाइट आउट सेलिब्रेशन” करायचं म्हणून बाहेर पडलेल्या नायक नायिकेसोबत पुढे काय काय घडतं आणि तिथूनच कशी कथा पुढे सरकते , हे बघण्यासाठी हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


२३. रनवे ३४
२०२२ . ॲक्शन, नाटक. २ तास २५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअजय देवगण
कलाकारअजय देवगण, अमिताभ ब्च्चन, रकुल प्रित सिंग, बोमण ईराणी.
प्रदर्शित तारीख
भाषा
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

“रनवे ३४” चित्रपट समीक्षा :-

अजय देवगण दिग्दर्शित ‘रनवे ३४’ हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. अतिशय कठीण परिस्थितीत विमान लँड करणाऱ्या वैमानिकाची ही कथा आहे. समोरचे काहीही दिसत नाहीय, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि इतकंच नव्हे तर रनवे संपल्यावर एक दरी आहे. या सगळ्याची कल्पना असताना अगदी शेवटच्या क्षणी डोळे बंद करून ‘दिल की सुनो’ टाइप फक्त इमॅजिन करून विमानाचे लँडिंग करणारा हा वैमानिक हिरो ठरतो की नाही हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


२४. हिरोपंती २
२०२२ . ॲक्शन, प्रणय. २ तास ३० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकएहमद खान
कलाकारटायगर श्रॉफ, नवाजुद्दीन सिद्दीकी , तारा सुतारिया
प्रदर्शित तारीख२९ एप्रिल २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.९⭐/ ५

हिरोपंती २” चित्रपट समीक्षा :-

टायगर श्रॉफ‌ आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या हिरोपंती २ ला प्रेक्षकांनी दाखवलेली नापसंती आणि प्रेक्षकांनी उडवलेली खिल्ली सांगून जाते की हा चित्रपट बघावा की बघू नये. पण तुमचा बहुमूल्य वेळ खर्च करायचा नसेल तर हा चित्रपट नाही बघीतला तरी हरकत नाही. आणि बराच वेळ हाताशी असेल तर ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. फार काही हाताशी लागणार नाही हे नक्की. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार.


२५. मेरे देश की धरती
२०२२. विनोदी, नाटक. १ तास ५१ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकफराज हैदर
कलाकारदिव्येंदु शर्मा, अनंत विधात , अनुप्रिया गोयंका
प्रदर्शित तारीख६ मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

मेरे देश की धरती” चित्रपट समीक्षा :-

” गावातील मुलांनी शहरात जायचचं कशाला ?” हा डायलॉग ऐकवून सिनेमाचा नायक दिव्यांदु आपल्या मित्रांना, गावातील मुलांना गावातच राहून काही करा हे सांगताना दिसतो. एकंदरच कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग करून पैसे कमविण्याची इच्छा असणाऱ्या गावातील शेतकरी तरुणांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते किंवा शेतकरी म्हटल्यावर समाज कसा बघतो, कोणत्या अडचणी येतात हे सगळं मेरे देश की धरती हा चित्रपट सांगतो. विषय, कथा, अभिनय चांगला असला तरी चित्रपट बऱ्याच पटीने अधिक चांगला होऊ शकला असता. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२६. थार
२०२२. ॲक्शन, गुन्हेगारी, रोमांचक. १ तास ४८ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकराजसिंह चौधरी
कलाकारअनिल कपूर, हर्षवर्धन कपूर, फातिमा सना शेख, जितेंद्र जोशी
प्रदर्शित तारीख६ मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“थार” चित्रपट समीक्षा :-

राजस्थान भधील एका गावातील ही एक रहस्यमय कथा आहे. अनिल कपूर यांनी नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय केला आहे. “बदले की भावना” या पायावर उभारलेली ही कथा रंजक असली तरी फारचं संथ गतीने चालते त्यामुळे बघताना कंटाळा येऊ शकतो. प्रचंड शिव्या ऐकून कान तापण्याची शक्यता आणि हिंसाचाराचा अतिरेक बघून डोक बधीर होण्याची शक्यता आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दिड स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


२७. जयेशभाई जोरदार
२०२२. नाटक. २ तास ४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकदिव्यांग ठक्कर
कलाकाररणवीर सिंग, बोमन इराणी, रत्ना पाठक शाह आणि शालिनी पांडे
प्रदर्शित तारीख१३ मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“जयेशभाई जोरदार” चित्रपट समीक्षा :-

“वंशाचा दिवा हवा” असा हट्ट करणाऱ्या समाजाला सणसणीत चपराक देणारा हा चित्रपट आहे. कॉमेडीचा तडका असणारा हा चित्रपट एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. रणवीर पुन्हा एकदा गुजराती भुमिका साकारताना दिसतोय. बऱ्याचदा इतरांच ऐकून आपण एखाद्या गोष्टीबद्दल मत तयार करतो. या चित्रपटाच्या बाबतीत हेच झालं आहे. काही लोकांना चित्रपट आवडला नसला तरीही एका चुकीच्या विचारसरणीचा प्रभाव कमी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या या चित्रपटाला माझ्याकडून साडेतीन स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.



२८. भुलभूलैया २
२०२२. भयपट, विनोदी. २ तास २५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअनीस बज्मी
कलाकारकार्तिक आर्यन, तब्बू , कियारा अडवाणी फर्नांडिस, प्रकाश राज
प्रदर्शित तारीख२० मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“भुलभूलैया २” चित्रपट समीक्षा :-

तब्बल पंधरा वर्षांनंतर भुलभूलैया या सिनेमाचा सिक्वेल असलेला “भुलभूलैया २” हा प्रेक्षकांना आवडला आहे. एखाद्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल आला ,त्यातील एखादं कॅरेक्टर लोकप्रिय झालं असेल आणि त्यात वेगळे कलाकार असतील तर तुलना ही होतेच. आताही ती झाली. आणि यात कार्तिक आर्यन पसंतीस उतरला आहे. एकंदर हा चित्रपट मनोरंजन करतो. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


२९. धाकड
२०२२. ॲक्शन, रोमांचक. २ तास १५ मिनिटे. [ ए ]
दिग्दर्शकरजनीश घई
कलाकारकंगना रनौत,अर्जुन रामपाल,द‍िव्‍या दत्ता,सास्‍वत चटर्जी,शर‍ीब हाशमी
प्रदर्शित तारीख२० मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.०⭐/ ५

“धाकड” चित्रपट समीक्षा :-

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करणारी अग्नी म्हणजेच कंगना रनौत एका स्पेशल एजंटच्या भुमिकेत पहायला मिळते. मुलींच्या तस्करीच्या रॅकेटला नेस्तनाबूत करणे हे तिचं मिशन आहे. नेहमीप्रमाणेच संपूर्ण चित्रपट कंगणामय आहे. अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांना मिळालेल्या भूमिका त्यांनी छान पार पाडल्या आहेत. एकदा बघायला हरकत नाही असा हा चित्रपट आहे. ॲक्शन सीनचा वारेमाप वापर केला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


३०. अनेक
२०२२. ॲक्शन, रोमांचक. २ तास २७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकअनुभव सिन्हा
कलाकारआयुषमान खुराना,अँड्रिया केव्हिचुसा,मनोज पाहवा,जे. डी. चक्रवर्ती
प्रदर्शित तारीख२७ मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

“अनेक” चित्रपट समीक्षा :-

भारताचा ईशान्य भाग. भारतात असुनही नसल्यासारखा. भारताच्याच मात्र आजही ‘भारताबाहेर’ समजल्या जाणाऱ्या ईशान्य प्रांताची गोष्ट सांगणारा “अनेक” हा चित्रपट आहे. ईशान्य भारतात राहणाऱ्या लोकांना स्वतंत्र व्हायचं आहे पण काही जण आहेत की त्यांना आपण भारतीय आहोत हे पटवून द्यायचं आहे. आता ते का आणि कसं हे चित्रपटात कळेल. अनुभव सिन्हा याची स्वतःची अशी एक दिग्दर्शनाची अनोखी पद्धत आहे. आयुषमान ला घेऊन केलेला आर्टिकल १५ जर तुम्ही पाहीला असेल तर ते तुमच्या लक्षात येईलच. हा चित्रपट सुद्धा त्याच धाटणीचा आहे. जरूर बघावा असा चित्रपट. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता


३१. देहाती डिस्को
२०२२. नृत्य, नाटक. २ तास २ मिनिटे. [ यु ]
दिग्दर्शकमनोज शर्मा
कलाकारगणेश आचार्य, रवी किशन, मनोज जोशी सक्षम शर्मा
प्रदर्शित तारीख२७ मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

देहाती डिस्को” चित्रपट समीक्षा :-

देहाती डिस्को हा चित्रपट म्हणजे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची निर्मिती असलेला चित्रपट आहे ज्यामध्ये त्यांनी स्वतः भुमिका साकारली आहे. पण त्यांची ही हिरो ची भुमिका फारशी लोकांना रुचलेली नाही. एक खेडेगाव, नृत्याला विरोध आणि नृत्यामुळेच शेवटी गावची प्रतिष्ठा राखली जाणे वैगरे अशी टिपीकल फिल्मी कथा आहे. या चित्रपटाला माझ्याकडून दीड स्टार.


३२. हेमोलिम्फ – द इनव्हिजिबल ब्लड
२०२२. जीवनचरित्र, नाटक. २ तास २ मिनिटे. [ ए ]
दिग्दर्शकसुदर्शन गमरे
कलाकाररियाझ अन्वर , रोहीत कोकटे, रूचिरा जाधव
प्रदर्शित तारीख२७ मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

“हेमोलिम्फ – द इनव्हिजिबल ब्लड” चित्रपट समीक्षा :-

११ जुलै २००६ रोजी मुंबईत ट्रेन मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर एका शिक्षकावर गंभीर कलमे लावण्यात आली होती. त्यांना एका जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता. “हेमोलिम्फ” ही “अब्दुल वाहिद शेख” या त्याच शिक्षकाची खरी जीवनकथा आहे. ज्यांनी स्वतःची सत्य बाजू मांडण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटात पहायला मिळतो. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


३३. सम्राट पृथ्वीराज
२०२२. ॲक्शन, नाटक, इतिहास. २ तास १५ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकडॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी
कलाकारअक्षय कुमार,मानुषी छिल्लर,संजय दत्त,सोनू सूद
प्रदर्शित तारीख३ जून २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

सम्राट पृथ्वीराज” चित्रपट समीक्षा :-

योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान यांची शौर्यगाथा पडद्यावर दाखवणारा हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी. ‘पृथ्वीराज रासो’ या महाकाव्यावर आधारित या सिनेमाचं कथानक असून त्याचं लिखाण सुद्धा डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. भव्य दिव्य सेट, रंगभूषा, वेशभूषा, आभूषणे सगळं काही आहे या चित्रपटात. पण तरीही कुठेतरी कमी पडला हा चित्रपट. मुळात सम्राट पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारत असलेला अक्षय कुमार हाच त्या भुमिकेसाठी फिट नाही हे मनात येत राहतं. बाकी इतर कलाकारांच्या भूमिका उत्तम. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


३४. मेजर
२०२२. ॲक्शन, नाटक. २ तास २६ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकशशी किरण टिक्का
कलाकारअदिवि शेष, सई मांजरेकर, सोभिता
प्रदर्शित तारीख२४ मे २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६⭐/ ५

मेजर” चित्रपट समीक्षा :-

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप उन्नीकृष्णन यांचा जीवनपट उलगडणारा हा चित्रपट आहे. या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले NSG चे एकूण ५१ जवानांना त्यांच्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. २६/११ चा तो हल्ला आठवला तरी भीती, चीड, संताप अशा संमिश्र भावना दाटून येतात. दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवि शेष याने “संदीप उन्नीकृष्णन” यांची मुख्य भूमिका साकारली असून अतिशय उत्तम अभिनय केला आहे. वैयक्तिक, वैवाहिक आयुष्य असतं, नातीगोती हे सगळं मागे टाकून जराही विचार न करता हे जवान आपला प्राण गमवायला तयार होतात ते फक्त आणि फक्त देशासाठी. हेच या चित्रपटात पहायला मिळतं. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.


३५. जनहित मे जारी
२०२२. विनोदी, नाटक, सोशल. २ तास २७ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकजय बसंतू सिंह
कलाकारनुसरत भरुचा,विजय राज,ब्रिजेंद्र कला,टिनू आनंद
प्रदर्शित तारीख१० जून २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.३⭐/ ५

जनहित मे जारी” चित्रपट समीक्षा :-

अतिशय आवश्यक आणि महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मध्य प्रदेशातील एका छोट्या शहरातील घडणारी ही कथा आहे. आई-वडिलांना आपल्या डबल ग्रॅज्युएट असलेल्या मुलीच्या लग्नाची काळजी आहे. पण मनोकामना म्हणजेच नुसरत भरुचा हीला मात्र त्यात रस नाही म्हणूनच आईवडिलांनी लग्नासाठी घातलेली अट पूर्ण करण्याच्या नादात काय घडतं हे दाखवणारा हा चित्रपट आहे. “कंडोम” आणि गर्भपात या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित जनजागृती करणारा हा चित्रपट आहे. ज्या विषयावर चर्चा करणं लोक उचित समजत नाही किंवा लाजतात त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कथा, विषय , कलाकार सगळं उत्तम आहे पण विषयाचं गांभीर्य तेवढ्या ताकदीने न दाखवता आल्यामुळे चित्रपट थोड फसतो. माझ्याकडून या चित्रपटाला दोन स्टार.


३६. अर्ध
२०२२, नाटक, प्रणय, १ तास २४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकपलाश मुच्छल
कलाकारराजपाल यादव , रुबीना दिलैक
प्रदर्शित तारीख१० जून २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

अर्ध” चित्रपट समीक्षा :-

मुंबई नगरीत स्वतःचं कलाकार होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या शिवाची ही गोष्ट आहे. ते करण्यासाठी त्याला काय काय करावं लागतं हे राजपाल यादव याने अतिशय समर्पक अभिनय करून पुन्हा एकदा स्वतःला उत्तम कलाकार म्हणून सिद्ध केलं आहे. कलाकार होण्याच्या नादात पैशांसाठी तृतीयपंथी म्हणून काम करताना राजपाल आपली मन‌ं जिंकतो. याच संकल्पनेवरून चित्रपटाचं नाव दिलं आहे. रूबीना आणि हितेन यांच्याही भुमिका उत्तम. काही चित्रपट चांगले असून प्रेक्षकांना बऱ्याचदा माहिती नसतात. अर्ध त्यापैकीच एक. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


३७. निक्कमा
२०२२. ॲक्शन, नाटक. २ तास ३२ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकशब्बीर खान
कलाकारशिल्पा शेट्टी, अभिमन्यु दासानी, शर्ली सेटिया
प्रदर्शित तारीख१७ जून २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.७⭐/ ५

निक्कमा” चित्रपट समीक्षा :-

शब्बीर खान दिग्दर्शित निक्कमा हा चित्रपट ‘मिडल क्लास अब्बाई’ या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. परत एकदा नेहमीप्रमाणे रिमेकचा प्रयत्न सपशेल फसलेला आहे. निक्कमा असलेल्या नायकाभोवती फिरणारी सिनेमाची कथा सुद्धा पडद्यावर निक्कमाचं ठरली आहे. अगदीच वेळ जात नसेल तर हा चित्रपट बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला दीड स्टार.


३८. शेरदिल- द पीलीभीत सागा
२०२२. विनोदी, नाटक. २ तास. [ यु / ए ]
दिग्दर्शकश्रीजीत मुखर्जी
कलाकारपंकज त्रिपाठी, निरज काबी, सायनी गुप्ता
प्रदर्शित तारीख२४ जून २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – १.८⭐/ ५

शेरदिल- द पीलीभीत सागा” चित्रपट समीक्षा :-

उत्तर प्रदेशमधील “पीलीभीत” व्याघ्र प्रकल्प हा या चित्रपटातील कथेच्या केंद्रस्थानी आहे. अनेकदा गावाला लागूनच जंगल असतं आणि मग तेथील प्राण्यांचा गावात होणारा त्रास, वावर हे काही नवीन नसतं. पण यामुळे रोज गावकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे या चित्रपटात पहायला मिळतं. कथानक कमकुवत असल्यामुळे चित्रपट फार जादू करत नाही. पण पंकज त्रिपाठी यांच्यासाठी एकदा हा चित्रपट बघायला हरकत नाही. यात त्यांच्या पत्नीने सुद्धा भुमिका साकारली आहे. माझ्याकडून या चित्रपटाला दीड स्टार. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


३९. जुग जुग जियो
२०२२. नाटक. प्रणय. २ तास ३० मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकराज मेहता
कलाकारअनिल कपूर, नीतू सिंह, वरुण धवन, कियारा आडवाणी, प्राजक्ता कोळी, मनीष पॉल
प्रदर्शित तारीख२४ जून २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

जुग जुग जियो” चित्रपट समीक्षा :-

हल्ली घटस्फोट घेणं हे काही नवीन किंवा विशेष नाही. एकमेकांवर संशय, दुरावा, स्पर्धा, विवाहबाह्य संबंध, संपलेला संवाद या सगळ्या कारणांमुळे आजकाल घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. याच सगळ्यावर आधारित हा चित्रपट आहे. खरं तर या विषयावर चित्रपट बरेच येऊन गेले. फक्त मुलगा आणि वडील एकाच वेळी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत आहेत हेच थोडं वेगळं. अनिल कपूर वरूण धवन पेक्षा भाव खाऊन जातो. एका गंभीर विषयावर विनोदी शैलीत भाष्य करणारा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. ॲमेझॉन प्राईम वर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.


४०. फारेन्सिक
२०२२. गुन्हेगारी, रोमांचक. २ तास १४ मिनिटे. [ यु / ए ]
दिग्दर्शकविशाल फुरिया
कलाकारविक्रांत मेस्सी, राधिका आपटे
प्रदर्शित तारीख२४ जून २०२२
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.९⭐/ ५

फारेन्सिक” चित्रपट समीक्षा :-

मल्याळम चित्रपट ‘फॅारेन्सिक’चा हा हिंदी रिमेक आहे. न्याय व्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारी विज्ञानाची एक शाखा म्हणजे “फॉरेन्सिक”. काही मुलींच्या खुनांचा तपास करण्यासाठी अधिकारी म्हणून आलेल्या राधिका आपटे सोबत जॉनी खन्ना (विक्रांत मेस्सी) म्हणून असलेला फॉरेन्सिक एक्स्पर्ट हे दोघं मिळून कसे खुन्याचा शोध लावतात हे या चित्रपटात पहायला मिळतं. सस्पेन्स आणि थ्रिलर सिनेमे बघायला आवडत असतील तर मग हा चित्रपट जरूर बघा. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.

हे पण वाचा –

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – १ | जानेवारी २०२२ – मार्च २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – 3 | जुलै २०२२ – सप्टेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – 4 |ऑक्टोंबर २०२२ – डिसेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

मित्रांनो, शतक पार केलेल्या हिंदी चित्रपटांची नावं आणि रिव्ह्यू एका लेखामध्ये सांगणं केवळ अशक्य! म्हणूनच राहीलेले चित्रपट पुढिल लेखात. तोपर्यंत वरीलपैकी कोणते चित्रपट बघायचे राहिले असतील तर बघून घ्या. आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा ते तुम्हाला कसे वाटले.

Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *