HomeFilmsFilms NewsHindi

२०२३ ची दमदार सुरुवात करणारे “हे” धमाकेदार चित्रपट तुम्ही पाहीलेत का.? | जानेवारी २०२३ मधील प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपट

Written by : आकांक्षा कोलते

Updated : फेब्रुवारी 10, 2023 | 11:22 PM

Hindi films released in jan 2023 1
१. कुत्ते
२०२३. साहसी, विनोदी. २ तास ३३ मिनिटे. [ ए ]
लेखक आसमान भारद्वाज, विशाल भारद्वाज
दिग्दर्शकआसमान भारद्वाज
कलाकारअर्जुन कपूर, तब्बू, नसिरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन
निर्माताविशाल भारद्वाज, भुषण कुमार, क्रिष्णन कुमार, लवरंजन
प्रदर्शित तारीख१३ फेब्रुवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.४⭐/ ५

कुत्ते” चित्रपट समीक्षा :-

२०२३ च्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे “कुत्ते”. आसमान भारद्वाज दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बराच चर्चेत होता. आसमान भारद्वाज याचा दिग्दर्शित हा पहिलाच चित्रपट. जेवढी चर्चा होती त्यामानाने त्याला प्रतिसाद मिळाला नाही. भ्रष्टाचारी पोलिस अधिकाऱ्याऊच्या भोवती फिरणारी ही कथा आहे.
हे अधिकारी स्वतःला वाचवण्यासाठी एका पैशाने भरलेल्या गाडीतील पैसे चोरण्याचा प्लॅन करतात. पण ती गाडी लुटण्यासाठी अजूनही काही जण टपलेले आहेत. आता नेमकं त्या गाडीतील पैसे कोणाला मिळतात का…? भ्रष्टाचारी असणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत काय होतं? हे बघण्यासाठी चित्रपट बघायला चित्रपटगृहात जावं लागेल. तब्बू, कोंकणा सेन या अतिशय ताकदीच्या अभिनेत्री आहेत. पण या चित्रपटात अर्जुन कपूर याने सुद्धा बरा अभिनय केला आहे. फार नवीन असं काही नाही पण एकदा मनोरंजन म्हणून हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
माझ्याकडून या चित्रपटाला अडीच स्टार.


२. मिशन मजनू
२०२३. ॲक्शन, रोमांचक. २ तास ९ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक असीम अरोरा, सुमित भतेजा, परवेझ शेख
दिग्दर्शकशांतनु बागची
कलाकारसिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदाना
निर्माताअमर बुटाला, रोनी स्क्रुवाला, गरीमा मेहता
प्रदर्शित तारीख२० जानेवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

मिशन मजनू” चित्रपट समीक्षा :-

देशभक्तीवर आधारित या आधीही बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण तरीही प्रत्येक चित्रपट आपण तेवढ्याच निष्ठेने बघतो. मिशन मजनू हा चित्रपट देशासाठी पाकिस्तानमध्ये राहून स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या एका रॉ एजंट वर आधारित आहे.
१९७१ चं युद्ध हरल्यानंतर पाकिस्तान अपयशामुळे अजूनच चिडला होता, कसंही करून त्याला भारताचा बदला घ्यायचा होता. त्यामुळेच लबाडी करून तो अणुबॉम्ब बनवण्याचा घाट घालतो आणि नेमकं हेच भारताला नकोय म्हणून पाकिस्तानचं हे मिशन अयशस्वी करण्यासाठी पाकिस्तानची लबाडी जगासमोर आणणं गरजेचं आहे. पण त्यासाठी भारताला पुरावे हवे आहेत की पाकिस्तान अणुबॉम्ब बनवतोय व हे काम कुठे चालू आहे . हे सगळे पुरावे गोळा करण्याचं काम म्हणजेच हे मिशन चित्रपटाच्या हिरोचंच आहे.
पाकिस्तानमध्ये राहून पुरावे गोळा करून ते भारताला पुरवणं तेवढं पण सोपं नसतं हे आपण राझी या चित्रपटात पाहीलं आहेच. तसंच या चित्रपटात सुद्धा सिद्धार्थ मल्होत्रा पाकिस्तानमध्ये राहून तिथल्या एका अंध मुलीशी लग्न करतो. एका टेलरचा विश्वास संपादन करून त्याच्याइथेच नोकरी करतो. व जोखिम पत्करून पाकिस्तान च्या अणुबॉम्ब मिशनचे पुरावे गोळा करत असतो. आता हे सगळं पडद्यावर बघताना पोटात अक्षरशः गोळा येतो. आता आपल्या हीरोला हे पुरावे सापडतात का? ते भारतीय गुप्तचर यंत्रणेपर्यंत पोहचतात का..? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स वर पाहू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


३. छत्रीवाली
२०२३. विनोदी. १ तास ५६ मिनिटे.
लेखक संचित गुप्ता आणि प्रियदर्शी
दिग्दर्शकतेजस विजय देवस्कर
कलाकारकुल प्रीत सिंह, सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली
निर्मातारोनी स्क्रुवाला
प्रदर्शित तारीख२० जानेवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

छत्रीवाली” चित्रपट समीक्षा :-

भारताने हा कितीही प्रगती केली तरी लोकांची मानसिकता मात्र काही बदलत नाही. सेक्स किंवा संभोग या शब्दांकडे आजही एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. याबद्दल बोलताना आपला आवाज आपोआप कमी होतो. या विषयावर बोलणं म्हणजे सुद्धा पाप असं अजून समाजातील चित्र आहे.
“छत्रीवाली” हा चित्रपट गर्भपाताच्या गोळ्यांच्या वारंवार वापरामुळे होणारे दुष्परिणाम, लैंगिक शिक्षणाचा अभाव व त्याची गरज आणि शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तकातून याबद्दल कशा प्रकारे ज्ञान दिले जाऊ शकते याचं नेमके चित्रण करतो. हरयाणामधील करनाल या गावातील सान्या म्हणजेच रकुल प्रीत सिंग हिची ही कथा आहे. सान्या ही एका कंडोम बनवणाऱ्या कंपनीत काम करत असते पण ती घरच्यांसकट सगळ्यांनाच खोटं सांगते की ती एका छत्री बनवणाऱ्या कंपनीत कामाला आहे.
खरं तर सान्या ही अतिशय हुशार अशी मुलगी आहे, आणि तिला तीचं काम आवडत पण लोकांना मात्र सांगायला तिला संकोच वाटतो. पुढे जाऊन तीचं व्यास नावाच्या मुलासोबत लग्न होतं आणि इथून खरी गोष्ट सुरु होते. कारण त्यालाही तीच्या कामाबद्दल माहीत नसतं.
तीच्या सासरच्या मंडळींना कळेल का, की सान्या कंडोम बनवणाऱ्या फॅक्टरी मध्ये कामाला आहे.? त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असेल.? तीचा नवरा तिला साथ देईल का.? लैंगिक जीवनातील “कंडोम” ही एक आवश्यक बाब आहे हे ती घरच्यांना आणि समाजाला पटवून देऊ शकेल का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चित्रपटात मिळतील. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. झी फाईव्ह ॲप वर हा चित्रपट उपलब्ध आहे.


४. पठाण
२०२२. ॲक्शन, रोमांचक. २ तास २६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक श्रीधर राघवन, अब्बास टायरवाला
दिग्दर्शकसिद्धार्थ आनंद
कलाकारशाहरुख खान,दीपिका पादुकोण,जॉन अब्राहम
निर्माताआदित्य चोप्रा
प्रदर्शित तारीख२५ जानेवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : –३.४⭐/ ५

पठाण” चित्रपट समीक्षा :-

गेल्या काही महिन्यांत सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे “पठाण”. याला कारणंही बरीच आहेत. बऱ्याच काळानंतर बॉलिवूडचख किंग शाहरुख खान हा पडद्यावर आलाय आणि ते सुद्धा दमदार असा एक मसाला चित्रपट घेऊन. साहजिकच यात आपल्या सल्लू भाईंचा छोटासा रोल आहे त्यामुळे सलमान टच हा आहेच.
काश्मीर मधून ३७० कलम हटवल्यानंतर भारताविरुद्ध पेटून उठलेला पाकीस्तान देश आता भारताविरुद्ध काहीतरी करायचा प्रयत्न करत आहे. आणि यात त्याची मदत करतोय एके काळी भारतीय गुप्तचर संघटनेत काम केलेला जॉन अब्राहम. अर्थात त्याच्यासोबत झालेल्या एका अपघातामुळे तो सुडाने पेटलेला आहे. त्याच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठीच पठाण या एजंटची नेमणूक करण्यात आली आहे. आणि मदतीला आहेत आपल्या दिपिका.
आता या चित्रपटाबद्दल बऱ्याच उलटसुलट चर्चा, कॉन्ट्रोवर्सी, ट्रोलींग हे सगळंच झालंय. त्यामुळे बऱ्याच जणांना तो बघावा की नाही हे कळत नाहीय. चित्रपट बघताना अशा धाटणीच्या सगळ्या चित्रपटांची तुम्हाला आठवण होऊ शकते. पण शाहरुख, दिपिका आणि जॉन साठी हा चित्रपट एकदा बघायला हरकत नाही. बऱ्याच गोष्टी पटत नाही, कुठे कुठे मसाला जरा जास्तच झाल्याचं जाणवतं पण एकंदर चित्रपट चांगला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. सध्या तरी हा चित्रपट तुम्हाला चित्रपटगृहातच जाऊन बघावा लागेल.


५. गांधी गोडसे – एक युद्ध
२०२३. इतिहास, नाटक. २ तास १० मिनिटे. [ यु ]
लेखक राजकुमार संतोषी, असगर वजाहत
दिग्दर्शकराजकुमार संतोषी
कलाकारदीपक अंतानी, चिन्मय मंडलेकर, पवन चोपडा, आरिफ जकारिया, तनिषा संतोषी, अनुज सैनी
निर्मातामनिला संतोषी
प्रदर्शित तारीख२६ जानेवारी २०२३
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

गांधी गोडसे – एक युद्ध” चित्रपट समीक्षा :-

३० जानेवारी, १९४८ , गांधी हत्या हा दिवस आणि त्यानंतर भारतीय इतिहासात बरीच मोठी उलथापालथ झाली. जर तसं झालं नसतं आणि गांधी जिवंत असते तल काय चित्र असतं हे दाखवणारा हा चित्रपट आहे. असगर वजाहत यांच्या ‘गोडसे ॲट गांधी डॉट कॉम’ या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे.
अर्थात चित्रपटात भारत पाकिस्तानची फाळणी ही सुरूवातीला दाखवलेली महत्वाची घटना आहे. इथून पुढे चित्रपट सुरू होतो. गांधीजींच्या हट्टीपणामुळे पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावे लागले, ते उपोषणाची भीती दाखवून देशाला वेठीस धरतात अशी धारणा नथुराम गोडसे यांची झालेली असते. नथुराम गोडसे हे एका वृत्तपत्रासाठी काम करत असतात. आणि भारताच्या या सगळ्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या अवस्थेला गांधीजी जबाबदार आहेत हा राग मनात ठेवून ते प्रार्थनास्थळी तो गांधी वर तीन गोळ्या झाडतात. इथपर्यंत सगळा इतिहास आहे पण इथून पुढे सुरू होते काल्पनिक कथा.
त्या गोळीबारात गांधी वाचले आणि नंतर ते नथुरामला भेटायला गेले आणि त्यांनी त्याला माफ सुद्धा केलं. या इथे भगवद्गीतेचा संदर्भ घेतला आहे. यानंतरचे गांधी आणि गोडसे यांचे संवाद म्हणजेच हा चित्रपट. जरूर बघावा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.

हे पण वाचा –

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – १ | जानेवारी २०२२ – मार्च २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – २ | एप्रिल २०२२ – जून २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – 3 | जुलै २०२२ – सप्टेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मध्ये प्रदर्शित झालेले हिंदी चित्रपटांची यादी | भाग – 4 |ऑक्टोंबर २०२२ – डिसेंबर २०२२ पर्यंत चे हिंदी चित्रपट

२०२२ मधील सुपर हिट दाक्षिणात्य चित्रपट ज्यांच्यासमोर बॉलिवूडची जादू सुद्धा फिकी पडली असे दमदार कंटेंट असलेले हे दाक्षिणात्य चित्रपट तुम्ही पाहीलेत का?

*    तर मंडळी यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहीलेत आणि कोणते आवडलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
Content Writer
Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *