HomeFilmsSouth Indian

२०२३ मधील ११ सुपरहिट हिंदी डब साउथ इंडियन चित्रपट

२०२३ मधील हे सुपरहिट हिंदी डब साउथ इंडियन चित्रपट तुम्ही पाहीलेत का.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : जानेवारी 21, 2024 | 9:13 PM

आजकाल बरेच दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित हे हिंदी भाषेत सुद्धा प्रदर्शित होतात. आणि हल्ली या साऊथ इंडियन चित्रपटांना सगळ्यांचीच पसंती मिळतेय. ओटीटी प्लॅटफॉर्म मुळे प्रदर्शित झाल्यानंतर काहीच दिवसांत हे चित्रपट बघण्यासाठी उपलब्ध असतात.
खरं तर आता वेबसिरीज चा जमाना असल्यामुळे प्रेक्षकांच्या चित्रपटांच्या बाबतीत अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही नवीन आलेल्या चित्रपटांमध्ये ओरिजनल कंटेट कमीच असतो. बरेच चित्रपट हे रिमेक असतात. आणि हे रिमेक अर्थातच साऊथ इंडियन चित्रपटांचे असतात.
असेच २०२३ या वर्षात प्रदर्शित झालेले आणि प्रेक्षकांची पसंती मिळवलेले हिंदी मध्ये बघता येतील असे काही सुपरहिट साऊथ इंडियन चित्रपट आज सांगणार आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडतील.

2023 Superhit Hindi Dubbed South Indian Movie list review and information

१. २०१८ : एव्हरीवन इज अ हिरो
२०२३. रोमांचक, नाटक. [ यु / ए ]
लेखक जूड एंथनी जोसेफ, अखिल पी धर्मजन
दिग्दर्शकजूड एंथनी जोसेफ
कलाकारटोविनो थॉमस, इंद्रन्स, कुंचाको बोबन, अपर्णा बालमुरली, विनीत श्रीनिवासन, आसिफ अली, तन्वी राम, कलैयारसन, अजु वर्गीज, शशीवाडा
निर्मातावेणू कुन्नापिली, सि. के. पद्मकुमार, एंटो जोसेफ
प्रदर्शित तारीख५ मे २०२३
भाषामल्याळम
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ४.१⭐/ ५

२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो” चित्रपट समीक्षा :-

२०१८ मध्ये केरळ मधे झालेली ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे काय हाहाकार माजला होता हे आठवलं तरी अंगावर काटा उभा राहतो. लहान मुलाबाळांसकट म्हातारे कोतारे कोणिकोणाची म्हणून या निसर्गाने गय केली नव्हती. आणि या अशा अचानक आलेल्या नैसर्गिक संकटाच्या वेळी माणसासाठी माणूसच धावून आला. त्यावेळी जात धर्म बाजूला ठेवून फक्त माणुसकी दिसली. याच माणुसकीचं दर्शन घडवणारा आणि केरळमधील महापुरावर आधारित “२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो” हा मल्याळम भाषेतील चित्रपट दिग्दर्शक जूड एंथनी जोसेफ
यांनी दिग्दर्शित केला आहे.
मल्याळम इंडस्ट्रीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. इतकंच नव्हे तर २०२३ मध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी जाणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात केरळमधील महापुर सदृश्य परिस्थिती दाखवण्यासाठी कमालीचे इफेक्ट दिले आहेत. महापुर आल्यानंतर प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी कसा धडपडत होता हे दाखवतानाच चित्रपटात काही इतर पटकथा पात्रांभोवती फिरतात. या चित्रपटाचा आत्मा काय असेल तर यातील भावनिक दृश्यं, इमोशन्स. ज्या प्रकारे प्रत्येक कलाकाराने अभिनय केला आहे आणि चेहऱ्यावर हावभाव आणले आहेत ते चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. प्रत्येकाने हा चित्रपट जरूर बघावा असा आहे. सोनी लिव्ह वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेचार स्टार.


२. इरट्टा
२०२३. रोमांचक, नाटक. १ तास ५१ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक रोहीत एम.जी कृष्णण
दिग्दर्शकरोहीत एम.जी कृष्णण
कलाकारजोजू जॉर्ज, सुनील सूर्या, सबुमोन अब्दुस्समद, अभिराम राधाकृष्णन,अंजली
निर्माताजोजू जॉर्ज
प्रदर्शित तारीख३ फेब्रुवारी २०२३
भाषामल्याळम
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६⭐/ ५

इरट्टा” चित्रपट समीक्षा :-

क्राईम, थ्रिलर किंवा सस्पेन्स चित्रपटांच्या बाबतीत मल्याळम भाषेतील चित्रपट हे नक्कीच जास्त असतील. या इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सरस असे क्राईम थ्रिलर चित्रपट येतच राहतात. असाच तुमच्या बुद्धीला आव्हान देणारा आणि शेवटी चक्रावून टाकणारा क्राईम थ्रिलर चित्रपट म्हणजे इरट्टा. रोहीत एम.जी कृष्णण यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा सुद्धा त्यांनीच लिहिली आहे.
वागामोन पोलिस स्टेशनमध्ये ड्युटी वर असणाऱ्या पोलिस अधिकारी विनोद यांची हत्या होते. हि हत्या कोणी केली आहे याच्या तपासासोबतच ,विनोद आणि या हत्येचा शोध लावणारा त्यांचा भाऊ प्रमोद जो पोलिस अधिकारी आहे. या दोन भावांच्या नात्याभोवती सुद्धा ही कथा फिरते. पहिला ट्विस्ट हा येतो की हत्या झालेला विनोद आणि दुसरा भाऊ प्रमोद हे जुळे असतात.
विनोद हा एक करप्ट पोलिस अधिकारी असून त्याची बऱ्याच जणांसोबत दुश्मनी असते. तो गरीब लोकांना त्रास देणं, महीलांची छेड काढणं हे सगळे धंदे करणारा असतो तर या उलट प्रमोद असतो. कथेमध्ये फ्लॅशबॅक चा वापर चांगल्या प्रकारे करण्यात आला आहे. विनोद आणि प्रमोद यांचा एक भुतकाळ आहे, ज्याचा अर्थातच परिणाम त्यांच्या आताच्या आयुष्यावर झालेला बघायला मिळतो.
जेव्हा ही हत्या होते तेव्हा पोलिस ठाण्यात फक्त तीन अधिकारी हजर असतात त्यामुळे अर्थातच संशय तिघांवर जातो. आता ही हत्या कोणी केली आहे.? विनोद आणि प्रमोद यांचा भुतकाळ काय हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट तुम्ही बघा. मुख्य अभिनेता जोजू जॉर्ज
याने इतका कमालीचा अभिनय केला आहे की तोड नाही. बघताना हे लक्षात सुद्धा राहत नाही की दोन पात्रं साकारणारा हा एकच अभिनेता आहे. कथा ज्या पद्धतीने पुढे सरकते, जे ट्विस्ट समोर येतात ते खूप रोमांचक आहे. दिग्दर्शन अर्थातच उत्तम आहे. इतर कलाकारांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका सुंदर झाल्या आहेत. एकंदर तुमच्या मेंदूचा ताबा घेणारा हा चित्रपट अजिबात चुकवू नका. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार. हि चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स वर बघू शकता.


३. रोमांचम
२०२३. भयपट, विनोदी. २ तास ९ मिनिटे. [ यु ]
लेखक जीतू माधवन
दिग्दर्शकजीतू माधवन
कलाकारसौबीन शाहीर, चेंबन विनोद जोस, अर्जुन अशोकन, साजिन गोपू
निर्मातागिरिश गंगाधरन
प्रदर्शित तारीख३ फेब्रुवारी २०२३
भाषामल्याळम
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.६⭐/ ५

रोमांचम” चित्रपट समीक्षा :-

३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेला रोमांचम हा एक मल्याळम भाषेतील चित्रपट असून तो हिंदी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.जीतू माधवन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.
बेंगलोर शहरात राहणाऱ्या काही मित्रांसोबत घडणारी हि कथा आहे. नोकरीनिमित्त शहरात आलेले हे सात मित्र एका खोलीत राहत असतात. प्रत्येक जण वेगळं काहीतरी करत असतो. परंतु संध्याकाळी खोलीवर परतल्यानंतर एकत्र जेवण बनवणे, व्हॉलीबॉल खेळणे हे त्यांचं ठरलेलं रूटीन असतं. परंतु त्यांचा एक मित्र जिबी म्हणजेच सौबीन शाहीर याला कॅरम सोडून दुसरा कोणता खेळ आवडत नसतो. म्हणून एक दिवस तो असाच शेजारच्या मित्रांच्या खोलीवर जातो आणि तिथं ओइजा बोर्ड च्या माध्यमातून मृत व्यक्तींच्या आत्म्याला बोलावलं जाऊ शकतं हे बघतो. व आपल्या खोलीवर परत येऊन तो आपल्या मित्रांना देखील असं करूया असं सांगतो.
त्यासाठी तो ओइजा बोर्ड बनवण्यासाठी कॅरमचा वापर करतो. सलग काही वेळा प्रयत्न केल्यानंतर तिथं खरंच आत्मा आला आहे याचा त्यांना प्रत्यय येतो व तो आत्मा एका स्त्रीचा असून तो सगळ्या प्रश्नांची उत्तरे खरीखुरी द्यायला सुरुवात करतो. पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा त्यांना शेजारचा मित्र सांगतो की हा आत्मा या सगळ्यांना संपवून टाकणार.
आता खरंच तिथं आत्मा येतो का.? तो त्यांना का संपवणार असतो.? पुढे काय होतं.? हे सगळं बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. सगळ्याच कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे. दिग्दर्शन सुद्धा उत्तम आहे. चित्रपटाला साजेस बॅकग्राऊंड म्युझिक आहे. हॉरर चित्रपट असेल तर हे म्युझिक खूप महत्त्वाचं असतं. तर धमाल कॉमेडी करत आणि त्याच वेळी तुम्हाला घाबरवत तुमचं मनोरंजन करणारा हा चित्रपट तुम्ही जरूर बघावा. डिस्नी हॉटस्टार हा चित्रपट वर उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला चार स्टार.


४. पोर थोझिल
२०२३. ॲक्शन, रोमांचक. २ तास २७ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक अल्र्फेड प्रकाश
दिग्दर्शकविघ्नेश राजा
कलाकारआर सरथ कुमार, अशोक सेल्वन, निखिला विमल, निझलगल रवी, सरथबाबू, संतोष किझहत्तूर
निर्मातासमीर नायर, दिपक सेहगल, मुकेश मेहता, सि. व्ही. सारथी, पूनम मेहरा, संदीप मेहरा
प्रदर्शित तारीख९ जून २०२३
भाषातमिळ
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५⭐/ ५

पोर थोझिल” चित्रपट समीक्षा :-

पोर थोझिल हा एक तमिळ भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून जर तुम्हाला थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट अजिबात चुकवू नका. हल्ली बरेच सस्पेन्स थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होत असतात परंतु हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा आहे असं म्हणू शकतो. आता ते का हे मात्र तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
एक सिरियल किलर एका पाठोपाठ एक असे एका विशिष्ट पद्धतीने मुलींचे खून करत असतो. आणि हे खून कोण करतंय याचा तपास करण्यासाठी लोगानाथन या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत काम करण्यासाठी नव्याने भरती झालेल्या प्रकाश या पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. परंतु प्रकाश हा हुशार असला तरीही घाबरट असतो आणि त्याच्या कारकीर्दीतील ही पहिलीच केस सिरियल किलर ची मिळते. आता प्रकाश या केसमध्ये कशाप्रकारे काम करतो यावर चित्रपट आधारित आहे.
चित्रपटाची मांडणी इतकी आकर्षक आणि रोमांचक पद्धतीने मांडण्यात आली आहे की शेवटपर्यंत आपला इंटरेस्ट टिकून राहतो. कथा आणि स्क्रीन प्ले इतका उत्तम आहे की प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यासाठी हा चित्रपट यशस्वी झाला आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार. सोनी लिव्ह वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.


५. सलार : भाग १ – सीजफायर
२०२३. ॲक्शन, रोमांचक. २ तास ५२ मिनिटे. [ ए ]
लेखकप्रशांत नील
दिग्दर्शकप्रशांत नील
कलाकार प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हसन, जगपती बाबू
निर्माताविजय किरागंदूर
संगीतरवी बसरूर
प्रदर्शित तारीख२२ डिसेंबर २०२३
देशभारत
भाषातेलुगु, हिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.४⭐/ ५

सलार : भाग १ – सीजफायर” चित्रपट समीक्षा :-

साहो आणि आदी पुरूष सारख्या फ्लॉप चित्रपटानंतर बाहुबलीचा इफेक्ट कमी होत प्रभास ची क्रेझ सुद्धा कमी होत असतानाच प्रभासने नव्या रूपात नव्या ढंगात आणि दणक्यात पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. यावेळी तो बाहुबलीच्या तोडीस तोड असा सुपरहिट चित्रपट सालार घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
मुळ तेलगू भाषेतील हा चित्रपट हिंदी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. खानसार नावाच्या गावातील हि कथा आहे. जे गाव नकाशावर तर नाही परंतु अस्तित्वात आहे. तिथे राजामनार नावाच्या राजाची एकहाती सत्ता असून दहशत सुद्धा आहे. याचा मुलगा वर्धा सुद्धा या गादी वर बसण्याची स्वप्न बघत असतो.
देवा म्हणजेच कथेचा नायक सलार हा वर्धा चा मित्र असतो. त्यामुळे स्वतःच्या वडिलांपासून वर्धा ने देवा आणि त्याच्या आईचं रक्षण केलेलं असतं. तेव्हाचं देवाने त्याला कधीही मदतीला येऊन जीव देईन सुद्धा आणि घेईन सुद्धा असं वचन दिलेलं असतं. इथून कथा पुढे सरकते. देवाची आई देवाला मारहाण, खून, दंगा या सगळ्यापासून दूर ठेवण्याघा प्रयत्न करते. परंतु अशी एक वेळ येते जेव्हा ती स्वतःचं देवाला अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी हत्यार हातात घ्यायला सांगते. आता असं काय होतं हे मात्र तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल.
हिंसा, मारामारीची दृश्यं, माणसांची कत्तल हे सगळं बघताना तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो. या बाबतीत सलारने रणवीर च्या “ॲनिमल” ला सुद्धा मागे टाकलं आहे. परंतु इथे या मारामारी साठी सबळ कारण आहे. तुम्हाला मारामारी, हिंसक, मन विचलित करणारी दृश्यं आवडत नसतील तर हा चित्रपट तुम्ही बघू नका. परंतु ॲक्शन सीन्स चे तुम्ही फॅन असाल तर मात्र चुकवू नका. मुळात साऊथ इंडियन चित्रपट म्हटल्यावर हि मारामारी गृहीत धरून हा चित्रपट बघावा. प्रभास ने तर अभिनय उत्तम केला आहेच परंतु तोडीस तोड असा अभिनय पृथ्वीराज सुकुमारन याने सुद्धा केला आहे. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट येण्याची शक्यता आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.

६. विरूपक्ष
२०२३. रहस्य, रोमांचक. २ तास २६ मिनिटे. [ यु ]
लेखक कार्तिक वर्मा दंडू
दिग्दर्शककार्तिक वर्मा दंडू
कलाकारसाई धर्म तेज,संयुक्त मेनन,अजय,साई चंद,ब्रह्माजी, सुनील, राजीव कानाकला,सोनिया सिंह
निर्माताबि वी एस एन प्रसाद
प्रदर्शित तारीख५ मे २०२३
भाषातेलुगु
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.३⭐/ ५

“विरूपक्ष” चित्रपट समीक्षा :-

तुम्हाला हॉरर सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. सुरूवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या मेंदूसोबत खेळ करणारा आणि तुमचा प्रत्येक अंदाज चुकीचा ठरवण्यात यशस्वी ठरणारा हा एक भयपट आहे.
तेलगू इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कार्तिक वर्मा दंडू यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. एका गावात घडणारी ही एक रहस्यमय भयकथा असून कथेच्या सुरूवातीला प्रेमकथा बघायला मिळते.
कथेचा नायक सूर्या आपल्या आईसोबत रूद्रवनम या गावात येतो. हे गाव कमी आणि जंगल जास्त असं वाटतं. या गावात आल्यावर सूर्याला एक मुलगी आवडते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. परंतु जसजशी ही प्रेमकथा पुढे सरकते तसतशी त्या गावात रहस्यमयी मृत्युंची मालिका सुरू होते. गावातील लोकांचे हे खून इतक्या निघृणपणे होत असतात की ते बघून अंगावर काटा येतो. हे खून अशा रहस्यमय पद्धतीने होतात की प्रेक्षक म्हणून आपण सगळ्या पात्रांवर आळीपाळीने संशय घेतो. आता गावाला वाचवणं ही आपली जबाबदारी आहे हे समजून सूर्या गावातच थांबतो व सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो.
या गावाला एक इतिहास आहे. काही वर्षांपूर्वी एक अघोरी मांत्रिक होता जो लहान मुलांचा बळी द्यायचा आणि आता त्या गावकऱ्यांना संशय येतो की त्या मांत्रिकाचा आत्मा परत आला आहे. त्या गावातील एकमेव मंदिरातील एक पुजारी यावर एक उपाय सांगतात. आता हा उपाय काय.? हे सगळे खून कोण करत असतं.? हे बघण्यासाठी हा चित्रपट बघावा लागेल. आणि मला खात्री आहे की सत्य कळल्यावर तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. आता हा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


७. दसरा
२०२३. ॲक्शन, रोमांचक. २ तास ३६ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक श्रीकांत ओडेला,जे ला श्रीनाथ,अर्जुन पाटुरी और वामसी कृष्णा पी.
दिग्दर्शकश्रीकांत ओडेला
कलाकारनानी, कीर्ति सुरेश,दीक्षित शेट्टी, साई कुमार
निर्मातासुधाकर चेरुकुरी
प्रदर्शित तारीख३० मार्च २०२३
भाषातेलुगु
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.२⭐/ ५

दसरा” चित्रपट समीक्षा :-

बाहुबली, पुष्पा, कांतारा सारख्या चित्रपटांमुळे साऊथ इंडियन चित्रपट हे प्रेक्षकांना विशेष आवडायला लागले आहेत. हिंदी चित्रपटांपेक्षा सुद्धा जास्त क्रेझ या चित्रपटांच्या बाबतीत बघायला मिळाली.
असाच एक तेलगू भाषेतील ३० मार्च रोजी प्रदर्शित झालेला दसरा हा चित्रपट तुम्हाला पुष्पा ची आठवण करून देतो. श्रीकांत ओडेला यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात नानी या तेलगू सुपरस्टार याने प्रमुख भूमिका केली आहे. आणि तेलगू इंडस्ट्रीमध्ये अभिनयाच्या बाबतीत एकापेक्षा एक सरस कलाकार आहेत हे सिद्ध केले आहे.
चित्रपटाची कथा काही विशेष किंवा वेगळी नाही. परंतु ज्या प्रकारे ती मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे, सादर करण्यात आली आहे ते प्रभावशाली आहे.
गोदावरी खाणी जवळील विरापल्ली नावाच्या गावातील ही गोष्ट आहे. येथील लोकं हि दिवसभर कोळशाच्या खाणीत काम करून उदरनिर्वाह कलत असतात आणि मग शरीराचा थकवा दूर करण्यासाठी दारू पितात. हे त्यांचं रोजचं ठरलेलं जगणं. याच गावातील धरनी म्हणजेच नानी, सूरी आणि वेनेला या तिघांची मैत्री असते. धरनी आणि सूरी दोघांनाही वेनेला आवडत असते पण मैत्री खातर सूरी आपल्या प्रेमाचा त्याग करतो. वरवर साधी सरळ दिसणारी ही प्रेमकथा, गावातील राजकारण, जातीपातीच्या भिंती या सगळ्याच मुद्द्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.
कथा नेहमीची असली तरी चित्रपटातील कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. विशेष करून नानी याने उत्कृष्ट अभिनय केला आहे. कलियुगातील रावण आणि सीता यांच्यातील युद्ध दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांनी केला आहे. आता कलियुगातील या युद्धात कोण जिंकतं.? नक्की रावण कोण.? हे सगळे ट्विस्ट बघण्यासाठी हा चित्रपट जरूर बघा. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट उपलब्ध आहे. माझ्याकडून या चित्रपटाला साडेतीन स्टार.


८. लियो
२०२३. ॲक्शन, गुन्हेगारी. २ तास ४४ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक लोकेश कनगराज,रत्न कुमार, धीरज वैद्य
दिग्दर्शकलोकेश कनगराज
कलाकारविजय चंद्रशेखर, संजय दत्त, तृषा, प्रिया आनंद, अर्जुन , मैडोना सेबस्टियन, गौतम वासुदेव मेनन
निर्माताएसएस ललित कुमार, जगदीश पलानीसामी
प्रदर्शित तारीख१९ ऑक्टोबर २०२३
भाषातमिळ
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

लियो” चित्रपट समीक्षा :-

क्राईम, ड्रामा किंवा ॲक्शन चित्रपटांच्या बाबतीत तमिळ भाषेतील चित्रपट हे नक्कीच जास्त असतील. लोकेश कनगराज दिग्दर्शित लियो हा चित्रपट सुद्धा एक मास ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून विजय चंद्रशेखर आणि संजय यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा हिमाचल प्रदेशातील एका वस्तीत घडते. कथेचा नायक पार्थिबन अर्थात विजय आपल्या कुटुंबासोबत छान आयुष्य जगत असतो. मुलगा, मुलगी आणि बायको असं हे चौकोनी सुखी कुटुंब असतं.
एक दिवस अचानक एक हिंस्र तरस या वस्तीत घुसतो त्याला सुद्धा पार्थिबन मारून टाकून वनविभागाची मदत करतो. त्यामुळे त्याचे फोटो वर्तमान छापून येतात. आणि ते फोटो बघून हारोल्ड या एका गॅंगस्टरला आपल्या हरवलेल्या भाच्याचा लियोचा शोध पूर्ण झाला असं वाटतं. तो लियोचा बाप एंथनीला(संजय दत्त) घेऊन लियोला भेटण्यासाठी जातो परंतु तिथे काहीतरी वेगळं घडलेलं असतं.
सगळं सुरळीत चालू असताना अचानक एक दिवस पाच गुंड या पार्थिबनच्या कॉफी शॉप मध्ये घुसतात व त्याच्या मुलीला आणि काम करणाऱ्या एका महिलेला ठार मारण्याची धमकी देतात परंतु तेव्हा पार्थिबन त्यांना वाचवण्यासाठी त्या गुंडांना मारून टाकतो आणि इथुनच कथा सुरू होते.
पार्थिबन विरूद्ध केस उभी राहते. आता पार्थिबन या केसमधून बाहेर पडतो का.? पार्थिबन म्हणजेच लियो असतो का.? लियो का गायब झालेला असतो .? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा चित्रपट बघितल्यावर मिळतील. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट उपलब्ध आहे. लोकेश कनगराज याने उत्कृष्ट दिग्दर्शन केले आहे. चित्रपट थोडा लांबल्यासारखा वाटतो परंतु मनोरंजन करणारा नक्कीच आहे. पार्श्वसंगीत अतिशय सुंदररित्या वापरलं गेलं आहे. कथेची मांडणी सुंदर आहे. एकंदर एकदा बघायला हवा असा हा चित्रपट आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


९. जेलर
२०२३. ॲक्शन, विनोदी, २ तास ४८ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक नेल्सन दिलीप कुमार
दिग्दर्शकनेल्सन दिलीप कुमार
कलाकाररजनीकांत, मोहनलाल,जैकी श्रॉफ, शिव राजकुमार, राम्या कृष्णा, तमन्ना भाटिया, सुनील , विनायकन, मिरना मेनन, वसंत रवि,नागा बाबू, योगी बाबू
निर्माताकलानिधि मारन
प्रदर्शित तारीख१० ऑगस्ट २०२३
भाषातमिळ
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.०⭐/ ५

जेलर” चित्रपट समीक्षा :-

दोन वर्षांचा ब्रेक घेऊन नव्या दमाने रजनीकांत यांनी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला तो जेलर या चित्रपटात. त्यांचा जेलर हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. रजनीकांत यांच्याबद्दल सांगण्याची खरं तर काही गरज नाही. त्यांनी स्वतःचं असं एक साम्राज्य निर्माण केलं आहे.
चित्रपटाची कथा फार काही नवीन नाही पण आपल्या रजनीकांत मुळे हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. निव्वळ मनोरंजन करणे या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आलाय त्यामुळे तुमचं लॉजिक वैगरे फार काही वापरू नका.
मुथुवेल पांडियन म्हणजेच मुथु हा एक सेवानिवृत्त “जेलर” असतो. सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या मुथूला आपल्या मुलाने ,अर्जुन ने (रवी वसंत)पण तसंच वागावं असं वाटत असतं आणि तो तशी शिकवण देत असतो. परंतु जेव्हा त्याच्या मुलाची वर्मा या गुंडासोबत दुश्मनी वाढून आणि त्यातूनच अर्जुन ची हत्या होते तेव्हा मात्र कथेचा नायक मुथू हाच खलनायक होतो. आणि आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना संपवतो. परंतु कथा इतकी पण साधी सरळ नाही, क्लायमॅक्स मध्ये संपूर्ण चित्रपट एका सेकंदात बदलतो.
खरं तर अर्जुन हा जिवंत असल्याचं जेव्हा मुथू ला कळतं तेव्हा सगळं चित्रचं बदलतं. आता तो जिवंत कसा असतो.? किंवा नक्की काय झालेलं असतं.? हे बघण्यासाठी हा चित्रपट नक्कीच बघा.
कथा, विषय नवीन नसला तरी रजनीकांत यांचे ॲक्शन सीन्स, बॅकग्राऊंड म्युझिक आणि एकंदरच साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये जो मसाला असतो त्याचा आस्वाद घेण्यासाठी तरी हा चित्रपट बघायला हवा. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार.


१०. कन्नूर स्क्वाड
२०२३. रोमांचक, नाटक. २ तास ४१ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक मोहम्मद शफी, रॉनी डेव्हिड
दिग्दर्शकरॉबी वर्गीज राज
कलाकारमामूट्टी, किशोर,विजयराघवन,रॉनी डेविड राज, अजीज नेदुमंगाड़, शरत सबा
निर्मातामामूट्टी
प्रदर्शित तारीख२८ सप्टेंबर २०२३
भाषा
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.८⭐/ ५

कन्नूर स्क्वाड” चित्रपट समीक्षा :-

क्राईम थ्रिलर चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटांपेक्षा नक्कीच दाक्षिणात्य चित्रपटांची संख्या ही जास्त असेल. किंबहुना तमगळ, तेलगू किंवा मल्याळम भाषेतील चित्रपट हे क्राईम थ्रिलर जॉनर चे जास्त असतात. असाच माम्मूटी यांची निर्मिती असलेला आणि रॉबी वर्गीज राज यांनी दिग्दर्शित केलेला कन्नूर स्क्वाड हा चित्रपट एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे.
एक पोलिस अधिकाऱ्यांचं पथक एका गावातील गुंडांना पकडायला गेलेलं असताना तिथं त्यांची त्या गुंडांसोबत चकमक होते. एका जंगलात ते त्या गुंडांना पकडतात सुद्धा परंतु या सगळ्या चकमकीत पथकातील मुख्य अधिकाऱ्याला जवळच एका झाडाला लटकलेला एक मृतदेह आढळतो. परंतु स्थानिक पोलीस त्या मृतदेहाबद्दल फारशी माहिती देत नाही. एखादा आदिवासी गळफास लावून मेला असेल असं सांगून वेळ मारून नेतखत परंतु त्या अधिकाऱ्याला संशय येतो आणि त्याचा शोध सुरू होतो. हिच चित्रपटाची सुरुवात आणि कथा आहे.
हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. आता तो मृतदेह कोणाचा असतो.? तो खून असतो की आत्महत्या.? पथक या गोष्टींचा शोध लावू शकेल का.? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चित्रपटातच मिळतील. चित्रपट थोडा मोठा आहे त्यामुळे पुर्वार्ध थोडा संथ वाटतो परंतु नंतर चित्रपट चांगली पकड घेतो. चित्रपटाची कथा, पटकथा, ॲक्शन सीन्स, दिग्दर्शन, लोकेशन्स सगळ्या गोष्टी उत्तम आहेत.
तुम्हाला सस्पेन्स असलेले ॲक्शन थ्रिलर चित्रपट बघायला आवडत असतील तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. डिस्नी हॉटस्टार वर हा चित्रपट उपलब्ध आहे.

११. टोबी
२०२३. रोमांचक, गुन्हेगारी, नाटक. २ तास ३५ मिनिटे. [ यु / ए ]
लेखक राज बी शेट्टी, टि के दयानंद
दिग्दर्शकबेसील अलचलक्क्ल
कलाकारराज बी शेट्टी, चैत्रा आचार, संयुक्ता होर्नाड,राज दिपक शेट्टी
निर्मातारवी राय कलसा
प्रदर्शित तारीख२५ ऑगस्ट २०२३
भाषाकन्नड
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – २.५⭐/ ५

टोबी” चित्रपट समीक्षा :-

टोबी हा एक कन्नड भाषेतील चित्रपट असून त्याची कथा एका सायको सिरीयल किलर भोवती फिरणारी आहे. ज्या पद्धतीने हा किलर अतिशय शांत आणि थंडपणे खून करतो ते बघून नक्कीच भीती वाटेल.
कोणताही गुन्हेगार हा जन्मतः खूनी किंवा गुन्हेगार नसतो. त्याचा एक भुतकाळ किंवा एक पार्श्वभूमी असते जी त्याला गुन्हा करायला भाग पाडते. अशीच पार्श्वभूमी असलेला टोबी हा एक थंड डोक्याचा सिरीयल किलर आहे परंतु त्याच्या प्रत्येक खुनामागे एक कारण आहे. खरं तर बेवारस स्थितीत सापडलेल्या एका तान्ह्या मुलीचा सांभखळ करत करत टोबी साधं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु परिस्थिती त्याला गुन्ह्यांचा ढिग रचण्यस भाग पाडते. इतके गुन्हे की पोलिस स्टेशनमध्ये फाईल कमी पडाव्यात.
जर तुम्हाला कोणी सांगितलं की ज्या यंत्रामध्ये ऊसाचा रस काढला जातो तसं माणसाला मारून तशा प्रकारच्या यंत्रामध्ये टाकलं गेलं तर काय होईल.? नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा उभा राहतो. परंतु हे सगळं टोबी खरं करत असतो. तो आनंद नावाच्या एका बिझनेसमन आणि मोठ्या गुंडासाठी हे काम करत असतो.
परंतु हाच टोबी शेवटी आनंदला सगळ्या गावासमोर देवीचं रूप घेऊन ठार मारतो, आता तो असं का करतो हे बघण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. संपूर्ण चित्रपट हा अतिशय नैसर्गिकरीत्या दाखवण्यात आला आहे. इतर दाक्षिणात्य चित्रपटांसारखा ॲक्शन सीन्स चा भरणा असलेला हा चित्रपट नक्कीच नाही. परंतु एक थ्रिलर सायको किलर अशा प्रकारचे चित्रपट जर आवडत असतील तर हा चित्रपट नक्कीच आवडेल. माझ्याकडून या चित्रपटाला तीन स्टार. सोनी लिव्ह वर हा चित्रपट तुम्ही बघू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *