HomeAwardsFilmsMarathi

५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा कसा पार पडला.? कोण आहेत या पुरस्काराचे मानकरी.?

५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा कसा पार पडला.? कोण आहेत या पुरस्काराचे मानकरी.?

Written by : आकांक्षा कोलते

Updated : मार्च 03, 2024 | 12:22 AM

57th Maharashtra State films Awards 2024 information

मराठी सिने सृष्टीतील कलाकारांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिला जाणारा नामांकित पुरस्कार म्हणजे “महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार”. हा एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिले जाणारे इतर पुरस्कार सुद्धा या पुरस्कार सोहळ्यात प्रदान केले जातात.

१९६२ साली पहिल्यांदा हा पुरस्कार सोहळा पार पडला होता. आणि या अविरत प्रवासातील ५७ वा पुरस्कार सोहळा नुकताच २२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतील वरळी येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळातर्फे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि अभिनेता अमेय वाघ यांनी या कार्यक्रमाच्या सुत्रसंचलनाची धुरा सांभाळली. अनेक दिग्गज कलाकार मंडळी या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होती.

    काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आलेला “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” सुद्धा आपल्या लाडक्या अशोक मामांना या पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार मा. अशोक सराफ यांना मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

    तसेच गानसम्राज्ञी “लता मंगेशकर पुरस्कार-२०२२” हा पुरस्कार देऊन सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री 'हेलन' यांना २०२२ सालचा  'स्व.राज कपूर जीवन गौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

   यावर्षी ट्वेल्थ फेल या चित्रपटामुळे विशेष चर्चेत असलेल्या दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार- २०२२ प्रदान करण्यात आला. तर हा स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार-२०२१ हा पुरस्कार सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे २०२१ चा चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार हा गजेंद्र अहिरे यांना प्रदान करण्यात आला तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान २०२२ हा पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. 

    हे झाले महाराष्ट्र राज्य शासनाकडून दिले जाणारे इतर पुरस्कार. आता आपण “महाराष्ट्र राज्य चित्रपट” पुरस्काराचे मानकरी कोण ते बघूया. 

पुरस्कार पुरस्कार मानकरी कशासाठी मिळाला
सर्वोत्कृष्ट कथास्व. बा. भ. बोरकर“पांघरुण” या चित्रपटाची कथा लेखन साठी
सर्वोत्कृष्ट पटकथाविक्रम फडणीस“स्माईल प्लिज” या चित्रपटातील पटकथा लेखन साठी
सर्वोत्कृष्ट संवादइरावती कर्णीक“आनंदी गोपाळ” या चित्रपटातील संवाद लेखन साठी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीमृण्मयी देशपांडे“मिस यू मिस्टर” या चित्रपटातील कावेरी पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट अभिनेतादीपक डोबरियाल“बाबा” या चित्रपटातील माधव या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीनंदिता पाटकर“बाबा” या चित्रपटातील आनंदी या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतारोहित फाळके“पांघरुण” या चित्रपटातील माधव या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्रीअंकिता लांडे“गर्ल्स” या चित्रपटातील मती देसाई या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेतापार्थ भालेराव“बस्ता” या चित्रपटातील नंद्या या पात्रा साठी
सर्वोत्कृष्ट गीतसंजय कृष्णाजी पाटील“हिरकणी” या चित्रपटातील “जगनं हे न्यारं झालं जी” या गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतप्रफुल्ल-स्वप्निल“स्माईल प्लिज” या चित्रपटातील पार्श्व संगीत साठी
सर्वोत्कृष्ट संगीतअमित राज“हिरकणी” या चित्रपटातील संगीत साठी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकसोनू निगम“मिस यू मिस्टर” या चित्रपटातील “येशील तू” या गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकामधुरा कुंभार“हिरकणी” या चित्रपटातील “आभाळसंग मातीचं नांदन” या गाण्यासाठी
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकसुभाष नकाशे“हिरकणी” या चित्रपटातील “शिवराज्यभिषेक गीत” मधील नृत्य साठी
प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीविशबेरी फिल्म्स“झॉलिवूड” या चित्रपटाच्या निर्मिती साठी.
या पुरस्काराचे स्वरूप हे १ लाख रुपये पारितोषिक व मानचिन्ह असे होते.
प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शकअच्युत नारायण“वेगळी वाट” या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी.
पुरस्काराचे स्वरूप हे १ लाख रुपये पारितोषिक व मानचिन्ह.
सामाजिक प्रश्न हताळणारा दिग्दर्शकसमीर विध्वंस“आनंदी गोपाळ” सामाजिक विषय मांडण्यासाठी.
१ लाख रुपये पारितोषिक व मानचिन्ह.
सर्वोत्कृष्ट बाल अभिनेता आर्यन मेंघजी “बाबा” या चित्रपटातील शंकर या पात्रासाठी
सर्वोत्कृष्ट मेकअप सानिका गाडगीळ“फत्तेशिकस्त” या चित्रपटातील मेकअप साठी
सर्वोत्कृष्ट पोशाख विक्रम फडणीस“स्माईल प्लिज” या चित्रपटातील पोशाख साठी
सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाईनमंदार कमलापूरकर “त्रिज्या” या चित्रपटातील ध्वनी साठी
सर्वोत्कृष्ट ध्वनी रेकॉर्डिस्टअनुप देव“माई घाट” रेकॉर्डिस्ट
सर्वोत्कृष्ट संपादक आशिष म्हात्रे
अपूर्वा मोतीवाले
“बस्ता” या चित्रपटातील संपादक साठी
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीकरण बी. रावत “पांघरूण” या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी साठी
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक सुनील निगवेकर
निलेश वाघ
“आनंदी गोपाळ” या चित्रपटातील कला दिग्दर्शन साठी.
दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट नं १अजित वाडीकरवाय या चित्रपटासाठी

वरळी येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आणि मराठी सिने सृष्टीतील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचं जगभरून फिल्म्स तर्फे मनःपूर्वक अभिनंदन..! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *