HomeFilmsHindi

ॲनिमल चित्रपट समीक्षा | रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा ॲक्शन चित्रपट

Animal Movie review and information in marathi
ॲनिमल
२०२३. ॲक्शन, गुन्हेगारी, नाटक. ३ तास २१ मिनिटे. [ ए ]
लेखकसंदीप रेड्डी वंगा, प्रणय रेड्डी वंगा, सौरभ गुप्ता
दिग्दर्शकसंदीप रेड्डी वंगा
तारांकितरणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, राश्मिका मंदाना,
निर्माताभूषण कुमार, क्रिशन कुमार, मुराद खेतानी, प्रणय रेड्डी वंगा
प्रदर्शित तारीख१ डिसेंबर २०२३
देशभारत
भाषाहिंदी
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.१⭐/ ५

कथा :- 

देशातील श्रीमंत बिजिनेस व्यक्ती पैकी एक रणविजयचे वडील आहेत. बिजिनेस मुळे त्यांनी आपल्या मुलाला दुर्लक्षित केले. रणविजय ला आपल्या बापाचे प्रेम मिळत नसले तरी तो आपल्या वडिलावर खूप प्रेम करतो. आपल्या वडिलांना हिरो मानतो. त्यामुळे त्याच्यात बदल होत जातो. पिता पुत्र यांच्यात वाद होत असतात. आपल्या वडिलावर हल्ला झाल्यावर तो आपल्या वडिलांना कसे वाचवतो ते नक्की पहा.

“ॲनिमल” चित्रपट समीक्षा :-

“कबीर सिंघ” नावाचा चित्रपट शाहीद कपूर सोबत संदीप यांनी दिग्दर्शित केला होता. आणि तो चित्रपट लोकांना पसंतीस आला होता. आणि आता “ॲनिमल” नावाचा दुसरा चित्रपट बनवला आहे. यात रणबीर कपूर, अनिल कपूर, राश्मिका मंदाना यांनी मुख्य भूमिका केली आहे. चित्रपटाची कथा चांगली आहे. श्रीमंत बाप आणि त्यांचा मुलगा यांच्यातील मतभेद दिसून येतील. भाऊ – बहिण, नवरा – बायको, पिता – पुत्र या नात्यावर भर दिली आहे. काही ठिकाणी हसायला मिळेल. मध्यांतरा पर्यंत चित्रपट तुम्हाला बोरिंग वाटणार नाही. त्यानंतर चित्रपट खूप लांबला गेला आहे असे वाटते. थोडे कट असता तरी चालला असता पण असो तुम्हाला साडे तीन तास हा चित्रपट एकदातरी बघू शकता. उपेंद्र लिमये चा सीन बघताच त्यांचा सवांदबाजी पाहून प्रेक्षक शिट्यांचा वर्षाव करताना दिसले. ट्रेलर बघून तुम्हाला यात खूप ॲक्शन आहे असे वाटते पण तसे जास्त ॲक्शन काही दिसत नाही. पण जे आहे ते थोडे त्या स्टोरी शी निगडीत आहे. जास्त अतिशयोक्ती दाखवण्यात आलेली नाही. फक्त मशीन फायरिंग चा सीन तसा ज्वलनशील वाटला नाही. कारण त्यात गोळ्या झाडल्यावर लोक उडताना दाखवण्यात आली ते लॉजीक काय समजला नाही. ज्यावेळी बॉबी देओल ची एन्ट्री होते. त्यांची ती मास एन्ट्री खतरनाक वाटते. भले हि त्यांना कमी स्क्रीन मिळाली असेल पण त्यांना कमी भूमिकेत पूर्ण चित्रपटाची दिशा आपल्याकडे वळवून घेतली आहे. शेवट चा काही क्षण उत्तम आहेत त्यात बॉबी देओल आणि रणबीर कपूर यांची फायटिंग चांगली दाखवण्यात आली आहे. शेवट संपला कि लगेच उठू नका पुढे तुम्हाला पोस्ट क्रेडीट सीन पाहायला मिळेल. त्यात तुम्ही जे पाहाल त्यांना तुम्ही पुढच्या भागाची वाट नक्की पाहाल.

रणबीर कपूर यांनी केलेली रणविजय ची भूमिका अति उत्तम केली आहे. त्यांची ती वेशभूषा, केशभूषा, देहयष्टी उत्तम करण्यात आली आहे. कधी पोट मोठे आहे तर कधी सिक्स पॅक ऍब्स आहेत. बोडी वर जास्त मेहनत केलेली दिसते. लास्ट चा जो पापा, पापा,पापा…… चा सीन आहे तो मला खूप आवडला. अंगावर शहारे आणणारा आहे. तो सीन परत परत बघण्याचा मोह निर्माण होईल असा तो पापा सीन आहे. अनिल कपूर यांनी एक श्रीमंत बीजी बिजिनेस मॅन वडिलांची भूमिका उत्तम रेखाटली आहे. बॉबी देओल यांनी खलनायकाची भूमिका उत्तम साकारली आहे. यात त्यांची बनवलेली बॉडी तुम्हाला नक्की आवडेल. राश्मिका यांनी पत्नीची भूमिका उत्तम केली आहे. मराठी ॲक्टर उपेंद्र लिमये यांनी केलीली फ्रेडी पाटील ची भूमिका अति उत्तम होती. त्यांचा तो मराठी सवांद, मोठ्या आवाजात समोरच्या माणसाला गप्प बसवण्याची भूमिका अतिउत्तम केली आहे. त्या क्षणी हाच विलन आहे का असे वाटेल. जबरदस्त भूमिका केली आहे. सौरव सचदेवा यांनी अबीद हक ची भुमिका उत्तम रित्या केली आहे.

चित्रपटाचे बॅकग्राऊंड म्युजिक योग्य आहे. यातील फायटिंग मधील गाणे खूप प्रसिद्ध झाले. ते गाणे ब प्राक यांनी गायले आहे. व्ही एफ एक्स काही ठिकाणी करण्यात आलेले आहे. पण ते एव्हढे उठाव दिसत नाही.

या चित्रपटात तुम्हाला अधून मधून काही ठिकाणी हार्ड लीप किसिंग सीन दिसतील. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही परिवार सोबत बघताना तुम्हाला लाज वाटू शकेल. जास्त खूनखराब दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट अठरा वर्षाच्या वरती वय असणारे पाहू शकतील.

“ॲनिमल” चित्रपट कुठे पाहू शकतो..?

आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.

लेखक स्टार रेटिंग : –

उत्तम दिग्दर्शन, भूमिका, ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.० स्टार देईन.

तुम्ही “ॲनिमल” चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *