“आरआरआर” फिल्म रिव्ह्यू : एसएस राजामौली दिग्दर्शित आणि स्टारर एनटीआर रामाराव ज्युनियर रामा चरण तेजा अजय देवगण | “RRR” Film review : Directed by S S Rajamouli and starr NTR Ramarao Jr. Rama Charan Teja Ajay Devgan
Written by : के. बी.
Updated : ऑगस्ट 15, 2022 | 06:06 PM
आर. आर. आर (RRR)
शैली : – ॲक्शन, नाटक
लेखक : – विजेंद्र प्रसाद (कथा), एस. एस. राजामौली (पथकथा), साई माधव बुर्रा (संवाद)
दिग्दर्शक : – एस. एस. राजामौली
कलाकार : – एन. टी. आर, रामा राव जुनियर. राम चरण तेजा, अजय देवगण, आलिया भट्ट, ऑलिव्हीया मॉरीस
|
संगीत : – एम. एम. किरवानी
प्रदर्शित तारीख : – २५ मार्च २०२२
भाषा : – तेलुगू
देश : – भारत
कथा :-
कोमाराम भीम (एन. टी. आर. जुनियर) आपल्या छोट्या बहिणीचे ब्रिटिशा कडून सोडूवून आणण्याचे शपत घेतो आणि अल्लुरी सीताराम राजू (राम चरण) आपल्या गावाला ब्रिटिश गन्स पेट्या घेऊन येणार याचे दिलेलं वचन. १९२० दशकातील कथा आहे.
“आर. आर. आर.” (RRR) चित्रपट समीक्षा : –
राजामौली “आर. आर. आर.” हा चित्रपट एन. टी. आर. जुनियर सोबत पहिल्यांदाच काम करत आहेत. पण राम चरण सोबत त्यांनी दुसऱ्यांदा काम केले आहे. राजामौली यांनी “मगधीरा” मध्ये राम चरण यांनी नायकाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खूपच गाजला होता. एस एस राजामौली यांचा चित्रपट म्हणजे “बाहुबली” हा शब्द नव्हे तर पूर्ण चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. भव्य सेट उभारेले असते. व्ही. एफ. एक्स. तर अप्रतिम असते. त्यांच्या चित्रपटांनी कमाई च्या बाबतीत केलेले रेकॉर्डस् त्यांच्याच येणारी दुसरी फिल्म् पहिल्या फिल्म् चे रेकॉर्डस् तोडत नवीन रेकॉर्स बनवत असतात. आणि आता त्यातच दुसऱ्या एक चित्रपटांची भर पडली आणि तो चित्रपट म्हणजे “आर. आर. आर. “RISE” “ROAR” “REVOLT” “उठ” “गर्जना” “बंड” या तीन शब्दावर चित्रपट दिसून येतो. एक “आर” शब्द कोमाराम भीम (एन. टी. आर. जुनियर) पाण्याचे प्रतीक दाखवले आहे. एक “आर” शब्द अल्लुरी सीताराम राजू (राम चरण) आगीचे प्रतीक दाखवले आहे. ज्यावेळी भीम आणि सीताराम यांची पहिली भेट होते. प्रतीक दाखवण्याची थीम चित्रपटाला तेज निर्माण करते. आग आणि पाणी जी विरुद्ध भावना प्रस्तापित करते. आग आणि पाणी एकत्र राहतील कि नाही याची उत्सुकता निर्माण होते.
एन. टी. आर. जुनियर व राम चरण तेजा यांनी बॉडी बिल्डिंग वर पण चांगले काम केल्याचे दिसून येते. दोघांचे ॲक्शन बघायला मजा येईल. पण काही ठिकाणी खूपच अतिशयुक्ती झाल्यासारखे वाटते. ते सीन सांगायची गरज नाही तुम्ही पहिल्या वर तुम्हाला समजेल. अजय देवगन याना जे काही स्क्रीन भेटली त्यांनी त्याचे सोने केले. एक क्रांतिकारक छाप राहते. एन. टी. आर. जुनियर. यांच्या सोबत दाखवलेली इंग्लिश लेडी बरोबर प्रेम कथा एक तडका मारल्या सारखे आहे. ऑलिव्हीया मॉरीस यांनी इंग्लिश लेडी जेनिफर ची भूमिका उत्तम पार पडली आहे. ब्रिटिश व्हाईट बिल्डिंग असो या इतर बाजार पेठ, भव्य सेट, जंगली प्राणी जे जिवंत असल्यासारखे वाटते. काही बारीक सारीक गोष्टी सोडल्या तर व्ही. एफ. एक्स. अप्रतिम आहे.
चित्रपटांत देशी नाच ज्या प्रकारे भीम आणि सीताराम नाचत असल्यावर बाकीचे इंग्रज सुद्धा नाचायला लागतात. “नाटु नाटु” (हिंदी मध्ये “नाचों नाचों”) गाणे लागले कि आपले पाय सुद्धा नाचायला भाग पडतात.असे त्या गाण्याचे म्युजिक आहे. या गाण्याचे नाचण्याची स्टेप खूपच प्रसिद्ध झाली. इतर बॅकग्राऊंड म्युजिक सुद्धा छान आहे.
चित्रपटाची स्टोरी लास्ट पर्यंत थांबून ठेवते जे काही आपल्याला काही पात्रांचे नाते आणि त्यांनी केलेली कामे यांचे रहस्य उलघडत जाते. यातून सीतारामाचे देशावरचे प्रेम तुम्हाला दिसून येईल. आणि भीमाचे आपल्या बहिणी वरचे प्रेम दिसून येईल. हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता. हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ भाषांमध्ये रिलीज केला आहे.
“आर. आर. आर.” (RRR) चित्रपट कुठे पाहू शकतो..?
यू ट्यूब, ऍमेझॉन प्राईम विडिओ, नेटफ्लिक्स. डिजनी प्लस हॉटस्टार, झी फाईव्ह, गुगल प्ले मुव्ही, ॲपल टी. व्ही. या ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वरती “आर. आर. आर.” (RRR) पाहू शकता. तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी भाडे द्यावे लागेल. प्रत्येक ओ. टी. टी प्लॅटफॉर्म चे रेंट ची अमाऊंट वेगवेगळी आहे. रेंट ची किमंत बदलत राहते. काही टी. टी. प्लॅटफॉर्म चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक रेटिंग स्टार :-
माझ्या कडून या चित्रपटासाठी ५ स्टार पैकी ३.8 स्टार देईन.
तुम्ही हा चित्रपट पहिला असेल तर तुम्हाला “आर. आर. आर.” चित्रपट कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका.