“वेड” फिल्म – रितेश देशमुख यांनी दिग्दर्शन केलेला पहिला मराठी चित्रपट
Written by : के. बी.
Updated : जानेवारी 2, 2022 | 12:20 AM
वेड |
लेखक | ऋषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख |
दिग्दर्शक | रितेश देशमुख |
कलाकार | रितेश देशमुख, जेनेलिया डिसुजा, जिया शंकर, अशोक सराफ |
निर्माता | जेनेलिया डिसुजा |
संगीत | अजय – अतुल |
प्रदर्शित तारीख | ३० डिसेंबर २०२२ |
भाषा | मराठी |
कथा :-
एका मुलीच्या प्रेमात वेड लागलेला सत्या आणि दुसरीकडे सत्याच्या प्रेमात वेड लागलेली श्रावणी यांच्यातील हि प्रेमाची कथा.
“वेड” चित्रपट समीक्षा :-
“लय भारी” या या चित्रपटांत त्यांनी डबल पात्रांची भूमिका केली होती. आणि “माऊली” दुसऱ्या चित्रपटांत एक इन्स्पेक्टर माऊली आणि माऊली देशमुख ची भूमिका केली होती. आणि आता चित्रपट दिग्दर्शक म्हणून पहिल्यादांच रितेश देशमुख यांनी “वेड” चित्रपट दिग्दर्शित केला. पण तो पाहिल्यावर हा त्यांच्या एक दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे असा वाटणार आहे. एक उत्तम प्रकारचे दिग्दर्शन केले आहे. पण हा ओरीजनल तर नाही, वेड चित्रपट हा तमिळ मधला “मजीली” चित्रपटाचा रेमेक आहे . जो पहिल्या शिवा नार्वाना यांनी दिग्दर्शित केला होता. तमिळ मध्ये नाग चैतन्य, समंथा यांनी भूमिका केल्या आहेत.
चित्रपटांची स्टोरी तशी साधी सरळ आहे. चांगल्या प्रकारे दाखवण्यात आली आहे. क्रिकेटर लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. अधून मधून बरेच विनोड होतात त्या त्या वेळेनुसार तेव्हा प्रत्येक जण हसू लागतो. त्यामुळे मनोरंजन टिकून राहते. पहिला सीन चालू होतो तेव्हा थोडीशी सैराट सीन डोक्यात येवून जातो. फायटिंग चे सीन बघायला खूपच भारी वाटतात. डायलॉग बाजी पण ठीक आहे. क्लायमॅक्स मध्ये काय होणार ते आपण अंदाज बंधू शकतो. शेवट असा धक्कादायक नव्हतो. पण “वेड लावलाय” हे गाणे खूप प्रसिध्द होत आहे. या गाण्यात सलमान खान हे पाहुणे कलाकार म्हणून दिसत आहेत. या गाण्याने तरुणाईला नक्की वेड लावलाय.
पात्रांचे केलेले कास्टिंग ठीक आहे. सर्वानी भूमिका उत्तम केली आहे. जेनेलिया यांनी केलेला मराठी बोलण्याचा प्रयत्न थोडासा फसला आहे असे वाटतो. तुम्ही पहिला मजीली पहिला असेल तर तुम्ही फरक काढत बसाल. एकदा चित्रपट नक्कीच बघू शकता. लास्ट सीन मध्ये सत्या आणि श्रावणी चा एक छोटासा कीस दाखवण्यात आला आहे. तुम्ही फमिली सोबत पाहू शकता.
“वेड” चित्रपट कुठे पाहू शकता.?
“वेड” चित्रपट तुमच्या जवळच्या थिएटर मध्ये पाहू शकता.