FilmsDramaHindiHome

“रक्षाबंधन” ४ बहीण आणि त्यांचा एकुलता एक भाऊ ची गोष्ट | “Raksha Bandhan” is the story of 4 sisters and their only one brother

Written by : के. बी.

Updated : ऑगस्ट 13, 2022 | 07:04 PM

रक्षाबंधन

२०२२  सीबीएफसी :- यू     कालावधी : – १ तास ४८ मिनिटे 
शैली : – नाटक / विनोदी / परिवार                                             
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – 2.7  / 
लेखक                       : – कनिका ढिल्लन, हिमांशू शर्मा 
दिग्दर्शक                   : –  आनंद एल. राय
कलाकार                   : – अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, सादिया खातीब
 
Rakshabandhan

Raksha Bandhan Image source :@anandlrai

निर्माता                      : – आनंद एल. राय, हिमांशू शर्मा, अलका हिरानंदानी झी स्टुडिओ 
प्रदर्शित तारीख         : – ११ ऑगस्ट २०२२  
भाषा                         : – हिंदी  
देश                           : – इंडिया 

रक्षाबंधन समीक्षा :-

४ बहिणीचा एकुलता एक भाऊ लाला केदारनाथ याने आपल्या आईला मरण्यापूर्वी वचन दिले कि मी बहिणीचे चांगरक्षा ल्या ठिकाण लग्न करून देईन. आणि मगच मी स्वतः लग्न करेल. बिकट परिस्थिती शी सामना करत आपल्या बहिणीचे लग्न कसे जमावणार…? यासाठी हा सिनेमा पहावा लागले. 

लाला केदारनाथ याची भूमिका अक्षय कुमार यांनी केली आहे. भूमी पेडणेकर यांनी लाला याची लाला ची प्रियसीची भूमिका केली आहे. आधी अक्षयकुमार आणि भूमी पेडणेकर या दोघांनी टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटांत काम केले. दोघांची नवरा बायकोची जोडी खूप गाजली. आणि आता दुसऱ्यांदा रक्षाबंधन या चित्रपटांतून एकत्र काम केले. त्याच्यामधील त्यांची जी केमिस्ट्री बघायला मिळाली तशी यात दिसून नाही आली.  या चित्रपटांत तुम्हाला कॉमेडी पण पाहायला मिळेल. बहिणीचे लग्न जमवतांना येणाऱ्या अडचणी तुम्हाला पुढे बगण्याची उत्सुकता निर्माण होईल. बहीण भावाचे नाते या चित्रपटांतून तुम्हाला आपल्या जीवनातील काही क्षण निर्माण करतील. तुम्ही जर आपल्या बहिणी पेक्षा मोठे असाल आणि तुमच्या लहान बहिणेचे लग्न झाले नसेल तर तुम्हाला हा चित्रपट भावुक वाटेल. या चित्रपटांतील “धागो से बांधा” हे गाणे खूपच गाजले आहे. अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. हा चित्रपट तुम्ही परिवारा सोबत पाहू शकता. 

शांतीलाल सोनी यांनी १९७७ मध्ये “रक्षा बंधन” नावाचा चित्रपट बनवला.  ललिता पवार, सारिका ठाकूर, नासिर हुसेन, सचिन पिळगांवकर यांनी “रक्षा बंधन” या चित्रपटांत भूमिका केल्या. या चित्रपटाचे कथानक वेगळे होते. आणि आता २०२२ ला आलेला “रक्षा बंधन” कथानक वेगळे आहे. 

रक्षाबंधन चित्रपट कुठे पाहू शकतो..?

रक्षाबंधन चित्रपट थिएटरला जाऊन बघू शकता. 

लेखक रेटिंग स्टार :-

माझ्या कडून या चितंत्रपटासाठी ५ स्टार पैकी २.६ स्टार देईन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *