कार्यक्रम कोणताही असला तरी त्या कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशवंदना करूनच होते. मग लग्नासारख्या शुभकार्यात तर गणपती बाप्पा हवेच. म्हणूनच या गाण्यावर डान्स करून तुम्ही संगीत कार्यक्रमाची सुरुवात करू शकता.
२. गोऱ्या गोऱ्या गालांवरी
३ मिनिटे ४५ सेकंद.
चित्रपट
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ?
गायक
योगिता गोडबोले, प्राजक्ता रानडे
भाषा
मराठी
गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजंची लाली गं पोरी नवरी आली….गाण्यातच सगळं आलं की नाही. नवरी आणि मैत्रिणींनो अजिबात विचार करू नका. या गाण्यावर एकदम झक्कास डान्स होणार यात शंकाच नाही.
३. सुन्या सुन्या मनांमध्ये
२०१५. ३ मिनिटे २४ सेकंद.
चित्रपट
टाईमपास २
गायक
आदर्श शिंदे, केतकी माटेगांवकर
संगीत
चिनार – महेश
भाषा
मराठी
सुन्या सुन्या गाणे प्रेमातील हळवे पण व्यक्त करून जात. टाईमपास २ चित्रपटातील गाणे आहे.
४. गुलाबाची कळी
२०१५ . २ मिनिटे ३५ सेकंद.
चित्रपट
तु ही रे
गायक
उर्मिला धनगर, वैशाली सामंत, अमितराज
संगीत
अमितराज
भाषा
मराठी
गुलाबाची कली बघा हल्दीनं माखली… आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली… वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमितराज यांनी हे गाणं अतिशय सुंदररित्या गायलं आहे. या गाण्याचं म्युझिक सुद्धा छान आहे. म्हणूनच एखादं मराठमोळं लग्न असेल तर हे गाणं म्हणजे शंभर टक्के फिक्स असं म्हणावं लागेल.
५. हि नवरी असली…
१९८४. ५ मिनिटे
चित्रपट
नवरी मिळे नवऱ्याला
गायक
अनुराधा पौडवाल, सचिन पिळगांवकर
संगीत
अनिल – अरुण
भाषा
मराठी
आईवडील किंवा काका काकू अशा मध्यमवयीन जोडप्यांना त्यांच्या तरूणपणाची इठवण करून देणारं हे गाणं आहे. त्यावर या जोड्यांचा उत्तम डान्स बसवता येऊ शकतो.
६. रूपेरी वाळूत माडांच्या बनात
४ मिनिटे ३ सेकंद.
गायक
जोनिता गांधी, संकेत नाईक
भाषा
मराठी
जोनीता गांधी हिने नवीन व्हर्जनमध्ये गायलेलं गाणं कपल डान्स म्हणून बेस्ट चॉईस आहे. याचे पहिले ओरिजिनल गाणे अशा भोसले यांनी गायले आहे. आणि अनिल – अरुण यांनी संगीत दिले आहे.
७. नवराई माझी लाडाची लाडाची गं!
२०१२. २ मिनिटे २३ सेकंद
चित्रपट
इंग्लिश विंग्लिश
गायक
सुनिधी चौहान
संगीत
अमित त्रिवेदी
भाषा
मराठी – हिंदी
एखाद्याचं लग्न आणि संगीत सेरेमनीत हे गाणं हे ठरलेलं समीकरण. नवरीची आई असो की आजी कोणीही या गाण्यावर थिरकू शकतं. काकी, मावशी, आत्या मिळून ग्रुप डान्ससाठी गाणं शोधत असाल तर हे बेस्ट गाणं आहे. इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातील हे गाणं श्रीदेवी या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं आहे.
८. लंडन ठुमकदा
२०१४. ३ मिनिटे ३४ सेकंद.
चित्रपट
क्वीन
गायक
लाभ जन्जुआ, सोनू कक्कर, नेहा कक्कर
संगीत
अमित त्रिवेदी
भाषा
हिंदी
नेहा कक्कर, सोनू कक्कर यांनी गायलेलं क्वीन चित्रपटातील कंगना राणावत या अभिनेत्रीवर चित्रित झालेलं हे गाणं नवरीच्या मैत्रिणींची ठरलेली चॉइस. गाण्याच्या बोलाप्रमाणेच ठुमके लावताना मैत्रिणी हे गाणं विशेष एंजॉय करतात.
९. दिलबरो
२०१८. ३ मिनिटे ४० सेकंद
चित्रपट
राजी
गायक
हर्षदीप कौर, विभा सराफ, शंकर महादेवन
संगीत
शंकर एहसान लॉय
भाषा
हिंदी
मुडके ना देखो दिलबरो…दिलबरो…डोळ्यात पाणी आणणऱ्या या गाण्यावर नवरी मुलगी जेव्हा डान्स करायला उभी राहते तेव्हा आई वडिलांसकट सगळ्यांनाच भरून येतं. स्वतःच्या लग्नात या गाण्यावर मुली आपल्या मैत्रिणींसोबत डान्स करू शकते.
१०. सवार लू
२०१३. ४ मिनिटे १२ सेकंद
चित्रपट
लूटेरा
गायक
मोनाली ठाकूर
संगीत
अमित त्रिवेदी
भाषा
हिंदी
नवरीसाठी सोलो डान्स साठी साधं आणि सोपं गाणं म्हणजे लूटेरा या चित्रपटातील मोनाली ठाकूर हीने गायलेलं सवार लू हे गाणं.
११. तेनू लेके मैं जावांगा
२०११. ४ मिनिटे १९ सेकंद
चित्रपट
सलाम ए इश्क
गायक
सोनू निगम, महालक्ष्मी अय्यर
संगीत
शंकर एहसान लॉय
भाषा
हिंदी
१२. सौदा खरा खरा
२०१९. ३ मिनिटे ४० सेकंद
चित्रपट
गुड न्यूज
गायक
दिलजित दोसांज, सुखबीर, धावणी भानुशाली
संगीत
लिजो जॉर्ज – डीजे. चेतास, सुखबीर
भाषा
हिंदी
जसं की डेस्टिनेशन वेडिंग असेल तर संगीत कार्यक्रम सुद्धा एकत्र होतो. तेव्हा ज्यांचं लग्न आहे त्या जोडीचा एकत्र डान्स तर विशेष आकर्षण असतं. अशा वेळी सौदा खरा खरा हे गाणं अगदी परफेक्ट आहे.
१३. नचदे ने सारे
२०१६. ३ मिनिटे २२ सेकंद.
चित्रपट
बार बार देखो
गायक
जसलीन रोयल, हर्षदीप कौर, सिद्धार्थ महादेवन
संगीत
जसलीन रोयल
भाषा
हिंदी
बार बार देखो या चित्रपटातील जसलीन रॉयल, सिद्धार्थ महादेवन आणि हर्षदिप कौर यांनी गायलेल्या या गाण्यावर सुद्धा सुंदर ग्रुप डान्स करू शकता.
१४. गल्ला गुडीयां
२०१५. ४ मिनिटे ३८ सेकंद.
चित्रपट
दिल धडकने दो
गायक
यशिता शर्मा, मनीष कुमार टिपू, फरहान अख्तर, शंकर महादेवन, सुखविंदर सिंग,
संगीत
शंकर एहसान लॉय
भाषा
हिंदी
प्रियांका चोप्रा, रणबीर कपूर, अनिल कपूर, शेफाली शाह, रणबीर कपूर आणि बरेच कलाकार या सगळ्यांवर चित्रित झालेलं हे गाणं प्रत्येक संगीत सेरेमनीत बघायला मिळतं. रणबीर कपूर म्हणजे एनर्जीच दुकान. तीच एनर्जी संपूर्ण गाण्यात आहे.
१५. तू लौंग मै इलायची
२०१९. ३ मिनिटे ५ सेकंद
चित्रपट
लौंग इलायची
गायक
मनात नूर ,
संगीत
अमन जय
भाषा
हिंदी
लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं माहीत नाही असे लोक फार कमी असतील. दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगेया चित्रपटातील हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे.
१६. मेहंदी लगा के रखना
१९९५. ४ मिनिटे ४० सेकंद.
चित्रपट
दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे
गायक
लता मंगेशकर, उदित नारायण
संगीत
जतीन – ललित
भाषा
हिंदी
लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं माहीत नाही असे लोक फार कमी असतील. दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगेया चित्रपटातील हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे.
१७. ऑंख मारे ये लडका ऑंख मारे
२०१८. ३ मिनिटे २२ सेकंद.
चित्रपट
सिंबा
गायक
नेहा कक्कर, मिल्खा सिंग, कुमार शानू
संगीत
तनिष्क बाघ्ची
भाषा
हिंदी
कुमार सानू, मिका सिंग आणि नेहा कक्कर यांनी गायलेलं हे गाणं म्हणजे फुल एंटरटेनमेंट या प्रकारातील आहे. मित्रांच्या ग्रुप साठी हे बेस्ट सॉंग आहे.
१८. वाह वाह रामजी
१९९४. ३ मिनिटे ५९ सेकंद.
चित्रपट
हम आपके हैं कौन.?
गायक
लता मंगेशकर, एस. पी. बालासुब्रमण्यम
संगीत
राम लक्ष्मण
भाषा
हिंदी
या गाण्याचा स्वतंत्र इतिहास आहे त्यामुळे याची ओळख करून देण्याची गरज नाही. मैत्रिणी किंवा बहीणी मिळून या गाण्यावर ग्रुप डान्स करू शकतात.
१९. बहारा बहारा
२०१०. ४ मिनिटे ८ सेकंद.
चित्रपट
आय हेट लव्ह स्टोरी
गायक
श्रेया गोशाल, सोना मोहापात्रा
संगीत
विशाल – शेखर
भाषा
हिंदी
सोनम कपूर हिच्यावर चित्रित झालेलं हे गाणं श्रेया घोषाल हीने गायलेलं आहे. नवरी आणि तिच्या मैत्रिणी मिळून या गाण्यावर डान्स करू शकतात.
२०. ये लाडका है अल्लाह
२००१. ५ मिनिटे २७ सेकंद
चित्रपट
कभी खुशी कभी गम
गायक
अलका यादनिक, उदित नारायण
संगीत
जतीन – ललित
भाषा
हिंदी
कपल डान्स किंवा ग्रुप डान्स साठी हे गाणं उत्तम आहे. काजोल आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं कभी खुशी कभी गम या चित्रपटातील आहे.
२१. दर्द करारा
२०१५. ४ मिनिटे १६ सेकंद.
चित्रपट
दम लगा के हैशा
गायक
कुमार शानू, साधना सरगम
संगीत
अनु मलिक
भाषा
हिंदी
कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायलेलन हे गाणं आपल्याला नव्वदच्या दशकात घेऊन जातं. या गाण्यावर छान असाकपल डान्स होऊ शकतो.
तर मंडळी तुमच्याकडे आता कोणाचं लग्न असेल आणि त्यात जर तुम्हाला कोणत्या गाण्यावर डान्स करायचा असेल तर ही लिस्ट तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. यापेक्षा नवीन कोणती गाणी तुम्हाला आवडत असतील तर कमेंट मध्ये जरूर सांगा.