अँटमॅन अँड द वास्प : क्वांटमेनिया समीक्षा मराठी मध्ये |मार्वल सिनेमाटिक युनिव्हर्स मधील अँटमॅन चित्रपटाचा तिसरा भाग
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 21, 2023 | 02:02 AM
अँटमॅन अँड द वास्प : क्वांटमेनिया |
लेखक | जेफ लवनेस |
दिग्दर्शक | पेटन रीड |
कलाकार | पॉल रीड, ईव्हँजेलीन लिली, जॉनाथन मेजर्स, कॅथरीन न्यूटन, मायकेल डग्लस, मिशेल फिफर |
निर्माता | केविन फाइगी, स्टीफन ब्रॉसार्ड |
संगीत | ख्रिसस्टोफ बेक |
प्रदर्शित तारीख | १७ फेब्रुवारी २०२३ |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
कॅसी लँग क्वांटम रिल्म मध्ये जाण्यासाठी एक मशीन चा अविष्कार करते. त्या मशीन मधून क्वांटम रिल्म मध्ये ती संदेश पाठवते. हे जेनेट ला समजताच ती मशीन बंद करण्याचा प्रयत्न करते. जेनेट क्वांटम रिल्म मध्ये ३० वर्षे अडकली होती. तिला तेथील घडलेलं रहस्य माहीत आहे. मशीन मधून कॅसी, अँटमॅन, होप, जेनेट आणि हँक पिम हे सर्व बनवलेल्या मशीन मधून क्वांटम रिल्म खेचले जातात. जमिनी खालील दुनियेत वेगवेगळ्या ठिकाणी पोहचले जातात. क्वांटम रिल्म मध्ये अडकलेला कँग द काँकेरर याला बाहेर पडण्यासाठी स्कॉट लँग ची गरज आहे. त्यासाठी त्याने त्याच्या मुलीला कैद केले आहे. तर काय अँटमॅन कँग ची मदत करेल का? जमिनी खालील दुनियेतील लोकांना वाचवू शकेल का?
“अँटमॅन अँड द वास्प : क्वांटमेनिया” चित्रपट समीक्षा :-
मार्वल सिनेमाटीक युनिव्हर्स मधील मार्वल कॉमिक्स आधारित सुपरहिरो चित्रपट आहे. अँटमॅन चा पहिला चित्रपट १७ जुलै २०१५ ला [प्रदर्शित झाला होता. आणि त्याचा दुसरा पार्ट “अँटमॅन अँड द वास्प” चित्रपट ६ जुलै २०१८ ला प्रदर्शित झाला. आणि आता अँटमॅन चा तिसरा भाग “अँटमॅन अँड द वास्प : क्वांटमेनिया” १७ फेब्रुवारी ला प्रदर्शित झाला. पेटन रीड यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागाची स्टोरी खूप चांगली होती. तशी याची स्टोरी थोडी कमकुवत वाटते. सिम्पल मार्गाची स्टोरी आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला कथा समजण्यासाठी याचे पहले दोन भाग आणि लोकी सिरीज बघावी लागेल तेव्हा तुम्हाला बघायला सोपी जाईल. लोकी सिरीज मध्ये मेन खलनायक म्हणून कँग द काँकेरर दाखवलेला आहे. ज्याच्या हातात वेळ आहे. आणि आता त्याचाच व्हेरींयंट दिसत आहे. थॅनॉस नंतर कँग द काँकेरर खलनायक दिसून येत आहे. चित्रपटातील दाखवलेली जमिनी खालील जीवन आहे कि असे वाटणारे जीवन दाखवण्यात आले आहे. नेहमी प्रामाने यातही व्ही एफ. एक्स. किमया दिसून येते. वेगवेगळ्या विचित्र पात्रे जी आपण कधी स्वप्नात सुद्धा पाहत नसू असे अनेक विचित्र पत्रे पाहून पुढे पाहण्याची इच्छा निर्माण होते.
अँटमॅन जास्त फॅन नसतील तरीही मार्वल फॅन हा चित्रपट नक्कीच बघतील आणि इतर हि हा चित्रपट एकदा बघायला नक्कीच आवडेल. तुम्हाला मनोरंजन नक्कीच होईल. ह्यात पोस्ट क्रेडीट सीन पण बघायला मिळेल. हा चित्रपट परिवारासोबत पाहू शकता.
“अँटमॅन अँड द वास्प : क्वांटमेनिया” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.