होळी आणि रंगपंचमी तोंडावर आलीय पण धमाल करायला गाणीच आठवत नाहीयेत…. तर मग हा लेख तुमच्यासाठीच!
नमस्कार मंडळी… सगळ्यात आधी तर तुम्हाला होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा! होळी काय रंगपंचमी काय सगळेच सण साजरे करण्यामागचं कारण म्हणजे सगळ्यांनी एकत्र यावं हेच असतं. होळी आणि रंगपंचमी हे सण साजरे करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. पण शहरी भागात बघायला गेलं तर रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हल्ली तर रंगपंचमी साजरी करण्यासाठी सुद्धा मोठमोठ्या आवाजात गाणी लावून त्यावर नाचणं आणि रंगांनी खेळणं ही प्रथा रूढ होतेय असो, अशाचप्रकारची रंगपंचमी साजरी करण्यासाठी तुम्ही कोणती गाणी लावून एंजॉय करू शकता हेच आज आम्ही सांगणार आहोत. तर आजचा हा लेख होळी स्पेशल गाण्यांचा आहे. पहिल्यांदा मराठी मधून असलेल्या गाण्यांची माहिती घेऊया.
होळी आणि रंगपंचमी उत्सवाची मराठी गाणी
१. आला होळीचा सण लय भारी
२०१४. ३ मिनिटे २२ सेकंद
चित्रपट
लय भारी
गायक
स्वप्नील बांदोडकर, योगीता गोडबोले
संगीत
अजय-अतुल
भाषा
मराठी
२०१४ साली प्रदर्शित झालेला रितेश देशमुख याचा लय भारी हा चित्रपट विशेष गाजला होता. त्याच चित्रपटातील आला होळीचा सण लय भारी हे गाणं सुद्धा तेवढंच लोकप्रिय झालं होतं. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेलं हे गाणं स्वप्नील बांदोडकर आणि योगीता गोडबोले यांनी गायलं आहे. आणि अर्थातच अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं प्रत्येक गाणं हे लोकप्रिय होतंच त्यामुळे हे गाणं सुद्धा याला अपवाद नाही. दरवर्षी होळीच्या दिवशी या गाण्यावर लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळेच या गाण्यावर थिरकताना दिसतात.
२. खेळताना रंग बाई होळीचा
१९७१.
चित्रपट
अलौकिक गाणी अल्बम
गायक
सुलोचना चव्हाण
संगीत
विठ्ठल शिंदे
भाषा
मराठी
होळी आणि हे गाणं हे जुनं आणि पक्कं समीकरण आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं हे गाणं यादव राव रोकडे यांनी लिहिलेलं असून विठ्ठल शिंदे यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे. हल्ली रंगपंचमी साजरी करताना डिजेवर लावल्या जाणाऱ्या गाण्यांपैकी या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं. पण खरं तर हे मुळ गाणं फार सुंदर आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा जुन्या आणि मुळ गाण्याला पसंती द्याल अशी आशा आहे.
३. आमचे दाराशी हाय शिमगा
२००९. ४ मिनिटे ४ सेकंद
चित्रपट
चिकना चिकना म्हावरा माझा (अल्बम)
भाषा
मराठी
“चिकना चिकना म्हावरा माझा” या अल्बम मधील आमचे दाराशी हाय शिमगा या गाण्याचा होळीदिवशी विशेष मान असतो. रमेश नाखवा यांनी हे गाणं शब्दबद्ध केलेलं आहे. या गाण्यातील “आमचे दाराशी हाय शिमगा…सण शिमग्याचा आयलाय रे आमच्या गावा..” हे गाण्याचे बोल म्हणजे समस्त कोळी- आगरी बांधवांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. रमेश नाखवा यांनी स्वतः हे गाणं गायलं आहे. कोळी किंवा आगरी समाजात होळीचा सण म्हणजेच शिमग्याचा सण मोठ्या दणक्यात साजरा केला जातो.
४. तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक
२०१८. ३ मिनिटे ३४ सेकंद
चित्रपट
माऊली
गायक
अजय गोगावले
संगीत
अजय-अतुल
भाषा
मराठी
रितेश देशमुख याच्या “माऊली” या चित्रपटातील रितेश आणि जेनेलिया यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं असून अजय गोगावले यांनी ते गायलं आहे. होळीचा सण म्हणजेच नाच, गाणी, धमाल असं एकंदर चित्र असतं. ज़रा पिरमानं वाग, माझा लयभारी स्वॅग… तुझ्या लवर चा टॅग मला देवून टाक…. आत्ता कशाचा राग…हा तर पेरमाचा डाग… तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक… खरं तर आताच्या तरूणाईला आवडेल असं हे गाणं शब्दबद्ध केलेलं आहे क्षितीज पटवर्धन यांनी. आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हे गाणं खरचं तरूणाईला विशेष आवडतं.
५. चढला होळीच्या खेळाला रंग
२०१२. ५ मिनिटे ५ सेकंद
चित्रपट
गायक
स्वप्नील बांदोडकर, योगीता गोडबोले, विवेक नाईक
संगीत
जितेंद्र कुलकर्णी, बाल नाईक
भाषा
मराठी
मराठी चित्रपट “चष्मेबहाद्दर” या चित्रपटातील हे गाणं असून जितेंद्र कुलकर्णी आणि बाल नाईक यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेलं हे गाणं स्वप्नील बांदोडकर आणि योगीता गोडबोले यांनी गायलं आहे.
६. होळीचा डंका
२०१२. ४ मिनिटे १० सेकंद
चित्रपट
विजय असो
गायक
अश्विनी भंडारे, किर्ती किल्लेदार, अमितराज
संगीत
अमितराज
भाषा
मराठी
विजय असो या चित्रपटातील हे गाणं चिन्मय मांडलेकर याच्यावर चित्रित झालेलं असून अमितराज यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. अश्विनी भंडारे , किर्ती किल्लेदार आणि अमितराज यांनी हे गाणं अतिशय सुंदररित्या गायलं आहे. होळीचा डंका…पेटलिय लंका… रावणाच्या छातीवर रामाचा दणका…. असे या गीताचे बोल असून रूपेश यांनी ते लिहीले आहेत.
७. होळी पुनवचा
१९९४. ५ मिनिटे ३८ सेकंद
चित्रपट
वेसावची पोर चंद्राची कोर (अल्बम)
गायक
सुरेश वाडकर, श्रीकांत नारायण, संतोष नायक, अनुपमा देशपांडे
भाषा
मराठी
सुरेश वाडकर, श्रीकांत नारायण, संतोष नायक, अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं हे गाणं “वेसावची पोर चंद्राची कोर” यांच्या अल्बममधील आहे. बारके मोठ्यांचा…हौशेमौजेचा… सण हाये ह्यो वरसाचा… होली पुनवचा.. होली पुनवचा.. सण मोठा शिमग्याचा….
असे या गाण्याचे बोल आहेत.
होळी आणि रंगपंचमी उत्सवाची हिंदी गाणी
१. रंग बरसे भीगे चुनरवाली
१९८१. ६ मिनिटे ६ सेकंद
चित्रपट
सिलसिला
गायक
अमिताभ बच्चन
संगीत
हरिप्रसाद चौरसिया, शिवकुमार शर्मा
भाषा
हिंदी
रंगपंचमी साजरी करायची म्हटलं की सगळ्यात आधी कोणतं गाणं वाजत असेल तर खुद्द अमिताभ बच्चन याने स्वतः गायलेलं सिलसिला या चित्रपटातील “रंग बरसे भीगे चुनरवाली” हे गाणं. हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं हरिवंशराय बच्चन यांनी शब्दबद्ध केले आहे. १९८१ साली हा चित्रपट आला होता पण या गाण्याची लोकप्रियता आजही तेवढीच आहे.
२. बलम पिचकारी जो तुने मुझे मारी
२०१३. ४ मिनिटे ५० सेकंद
चित्रपट
ये जवानी है दिवानी
गायक
विशाल ददलानी, शाल्मली खोलगडे
संगीत
प्रीतम
भाषा
हिंदी
हल्लीच्या काळातील रंगपंचमी वर चित्रित झालेलं आणि प्रचंड लोकप्रिय झालेलं गाणं म्हणजे “ये जवानी है दिवानी” या चित्रपटातील “बलम पिचकारी…जो तुने मुझे मारी” हे गाणं. हे गाणं विशाल ददलानी आणि शाल्मली खोलगडे यांनी गायलं आहे.
३. जय जय शिवशंकर
२०१९. ३ मिनिटे ५१ सेकंद
चित्रपट
वॉर
गायक
विशाल ददलानी, बेन्नी दयाल
संगीत
विशाल-शेखर
भाषा
हिंदी
२०१९ साली हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वॉर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट फारसा चालला नसला तरी त्यातील जय जय शिवशंकर हे लोकांना विशेष आवडलं. होळीची धमाल आणि हे गाणं वाजत नाही असं होत नाही. विशाल ददलानी आणि बेन्नी दयाल यांनी गायलेल्या या गाण्यावर रंगपंचमी दिवशी आजची तरुणाई नक्कीच थिरकते.
४. होली के दिन दिल खिल जाते है
१९७५. ५ मिनिटे ४२ सेकंद
चित्रपट
शोले
गायक
किशोर कुमार, लता मंगेशकर
संगीत
आर. डी. बर्मन
भाषा
हिंदी
आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबद्दल काय बोलावं. शोले चित्रपटाने स्वतःचा असा एक इतिहास रचला हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील सगळी गाणी सुद्धा तेवढीच लोकप्रिय झाली. होळी आली आणि हे गाणं वाजलं नाही असं कधीच होणार नाही.
५. होरी खेले रघूवीरा
२००३. ५ मिनिटे ४९ सेकंद
चित्रपट
बागबान
गायक
अमिताभ बच्चन, अलका यागनिक, सुखविंदर सिंग, उदीत नारायण, आदेश श्रीवास्तव
संगीत
आदेश श्रीवास्तव
भाषा
हिंदी
२००३ साली प्रदर्शित झालेल्या बागबान या चित्रपटातील होळी स्पेशल गाणं म्हणजे होरी खेले रघूवीरा मुखड़े पे रंग लगाए.. बड़ा रंगीला सांवरिया.. चुनरी पे डाले अबीर अवध में, होरी खेरे रघुवीरा… अमिताभ बच्चन, अलका यागनिक, सुखविंदर सिंग आणि उदीत नारायण यांनी गायलेलं हे गाणं आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.
६. बद्री की दुल्हनियाँ
२०१७. ३ मिनिटे २७ सेकंद
चित्रपट
बद्री की दुल्हनियाँ
गायक
मोनाली ठाकूर, नेहा कक्कर, देव नेगी, इक्का सिंग
संगीत
तनिष्क बागची
भाषा
हिंदी
मोनाली ठाकूर, नेहा कक्कर, देव नेगी आणि इक्का सिंग यांनी गायलेलं बद्री की दुल्हनियाँ हे गाणं सुद्धा होळी खेळताना आवर्जून लावलं जातं. बद्रीनाथ की दुल्हनियाँ या चित्रपटातील हे गाणं आलिया भट्ट आणि वरून धवण यांच्यावर चित्रित झालेलं आहे.
७. होली में रंगीले
२०२०. ३ मिनिटे २२ सेकंद
चित्रपट
होली में रंगीले (अल्बम)
गायक
अभिनव शेखर, मिका सिंग, पल्लवी इश्पुनियानी
भाषा
हिंदी
अभिनव शेखर, मिका सिंग आणि पल्लवी इश्पुनियानी यांनी होली में रंगीले या चित्रपटातील हे गाणं मौनी रॉय हिच्यावर चित्रित झालेलं आहे.
८. गो पागल
२०१७. २ मिनिटे ५१ सेकंद
चित्रपट
जॉली एल. एल. बी.
गायक
निंदी कौर, रफ्तार
भाषा
हिंदी
हल्ली होळी किंवा रंगपंचमी साजरी करायची म्हणजे ठेका धरायला लावणारी गाणी हवी असतात. जॉली एल. एल. बी या चित्रपटातील गो पागल हे गाणं असंच काहीसं आहे. निंदी कौर आणि रफ्तार यांनी हे गाणं गायलं आहे.
९. होली बिरज मा
२०१८. ३ मिनिटे ३४ सेकंद
चित्रपट
जिनियस
गायक
जुबिन नौटीयाल
संगीत
हिमेश रेशमिया
भाषा
हिंदी
२०१८ साली प्रदर्शित झालेल्या जिनियस या चित्रपटातील जुबिन नौटीयाल याने गायलेलं हे गाणं मनोज मुंताशिर यांनी शब्दबद्ध केलेलं असून हिमेश रेशमिया यांनी हे गाणं संगीतबद्ध केलेलं आहे. “तुझसे है रंगोली बिरज मा, तू मेरी हमजोली बिरज मा, तुझसे है रंगोली बिरज मा…असे या गाण्याचे बोल आहेत.
मोहब्बते या चित्रपटाला लोकांनी भरभरून प्रेम दिले होते. या चित्रपटातील गाणी सुद्धा तेवढीच लोकप्रिय झाली होती. सोनी सोनी हे गाणं सुद्धा होळी स्पेशल असून आनंद बक्षी यांनी लिहिलेलं असून जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. उदीत नारायण, जसपिंदर नरूला, श्वेता पंडित, सोनाली भाटवडेकर, पृथा मुजूमदार, मनोहर शेट्टी आणि इशान इतक्या बऱ्याच गायकांनी हे गाणं गायलं आहे.
११. खडके ग्लासी
२०१९. ३ मिनिटे २० सेकंद
चित्रपट
जबरीयां जोडी
गायक
यो यो हनी सिंग, अशोक मस्ते, ज्योतिका
संगीत
तनिष्क बागची
भाषा
हिंदी
“जबरीयां जोडी” या चित्रपटातील हे गाणं यो यो हनी सिंग, अशोक मस्ते आणि ज्योतिका यांनी गायलं आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहे.
१२. अंग से अंग लगाना
१९९३. ६ मिनिटे ४९ सेकंद
चित्रपट
डर
गायक
अलका यागनिक, विनोद राठोड, सुदेश भोसले, देवकी पंडित
संगीत
शिवहरी
भाषा
हिंदी
“जुनं ते सोनं” हा वाक्प्रचार बऱ्याच ठिकाणी लागू होतो. गाण्यांच्या बाबतीत तर अगदीच. कितीही नवीन गाणी आली तरी काही गाणी ही जूनी असली तरी आजही ऐकायला गोड वाटतात. “अंग से अंग लगाना” हे “डर” या चित्रपटातील गाणही तसच आहे. शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं अलका यागनिक, विनोद राठोड, सुदेश भोसले आणि देवकी पंडित यांनी गायलं आहे. शिवहरी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं आहे.
१३. डु मी अ फेवर…लेट्स प्ले होली
२००५. ६ मिनिटे २९ सेकंद
चित्रपट
वक्त – रेस अगेन्स्ट द टाईम
गायक
अनु मलिक, सुनिधी चौहान
संगीत
अनु मलिक
भाषा
हिंदी
“वक्त – रेस अगेन्स्ट द टाईम” या चित्रपटातील हे गाणं अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित झालेलं आहे. अनु मलिक आणि सुनिधी चौहान यांनी ते गायलं आहे व अनु मलिक यांनीच संगीतबद्ध केलेलं आहे.
खरं तर मित्रांनो, अजून अशी बरीच हिंदी मराठी चित्रपटातील गाणी आहेत जी होळी/रंगपंचमी आणि त्यांचा संबंध नसताना देखील तुम्हाला रंगपंचमीच्या दिवशी ऐकायला मिळतील. पण आज आम्ही तुम्हाला जी गाणी सांगितली आहेत ती फक्त होळी किंवा रंगपंचमी यावर चित्रित करण्यात आलेली आहेत. तर मंडळी, या वर्षीची रंगपंचमी नैसर्गिक रंग वापरूनच साजरी करा. तुम्हाला पुन्हा एकदा रंगपंचमीच्या खूप शुभेच्छा!