“इटर्नल्स” चित्रपट समीक्षा | “Eternals” Films Review :Marvel’s 10 New Superheroes
Written by : के. बी.
Updated : जुलै 17, 2022 | 8:29 PM
“इटर्नल्स” चित्रपट समीक्षा : मारवेल चे १० नवीन सुपरहिरोज | “Eternals” Films Review : Marvel’s 10 New Superheroes
Written by : के. बी.
Updated : जुलै 17, 2022 | 08:29 PM
इंटर्नल्स
२०२१ सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास ३७ मिनिटे
शैली : – ॲक्शन / कल्पनारम्य / साहसी / सुपरहिरो “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 2. 8 ✰ / 5✰
पथकथा : – क्लोई झाओ, पॅट्रिक बर्ली, रायन फिरपो
कथा : – रायन फिरपो, काझ फिरपो
दिग्दर्शक : – क्लोई झाओ
कलाकार : – अँजेलिनो जोली, रिचर्ड माडेन, जेम्मा चॅन, कुमेल नानजियानी, लॉरेन रिडलॉफ, ब्रायन टायरी हेन्री, सलमा हायेक, लिया मॅकहग, डॉन ली, किट हॅरिंग्टन
|
निर्माता : – केविन फिगे, नाटे, मुर
संगीत : – रामीन जावडी
प्रदर्शित तारीख : – ५ नोव्हेंबर २०२१
भाषा : – इंग्लिश
देश : – संयुक्त अमेरिका
कथा :-
पृथ्वी वर पुन्हा एकदा डेव्हीएंट्स येतात. डेव्हीएंट्स पासून पृथ्वी वरील सर्वाना जीवांना वाचवण्यासाठी इटर्नल्स पृथ्वी वर येतात. १० सुपरहिरोज आहेत जे अमर आहेत. डेव्हीएंट्स पेक्षा इंटर्नल्स टीम मध्ये लढाई निर्माण होते.
समीक्षा : –
“अव्हेंजर्स : एंडगेम” नंतर या चित्रपटाची सुरवात होते. पृथ्वी वर पुन्हा एकदा डेव्हीएंट्स येतात. या डेव्हीएंट्स नाश करण्यासाठी इटर्नल्स पृथ्वीवर येतात. मारवेल कॉमिक्स आधारित क्लोई झाओ यांनी इटर्नल्स चे दिग्दर्शन केले. मारवेल स्टुडिओ चा सर्वात जास्त लांबीचे २ चित्रपट पहिला म्हणजे “अव्हेंजर्स : एंडगेम” ३ तास ३ मिनिटे आणि दुसरा “इटर्नल्स” म्हणावा लागेल जो २ तास ३७ मिनिटे आहे. या चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी खूपच छान आहे. प्रत्येक सीन तुम्हाला बांधून ठेवतो कारण प्रत्येक सीन मध्ये वेगळे वेगळे व्ही एफ एक्स बघायला दिसते. त्याचसोबत बॅग्राऊंड म्युजिक चांगले आहे. यातील मॉन्स्टर डेव्हीएंट्स भयानक होते. यामध्ये आपापल्या मध्ये लढाई होताना दिसते जे बघायला आवडेल. १० सुपरहिरोज असून सुद्धा ॲक्शन जास्त प्रमाणात नव्हते. खलनायकाची बाजू मजबूत व्हायला हवी होती.
दहा इटर्नल्स ( सुपरहेरोज ) चे नांवे व त्यांची थोडक्यात माहिती.
- थेना : ची प्रत्येक फायटिंग स्टाईल खूपच अलग आहे. कॉस्मिक एनर्जी तुन नवीन शास्त्रे निर्माण करून शत्रू वर हल्ला करणे थेना कडे आहे जी खूप पटाईत आहे, याची उत्तम भूमिका अँजेलिनो जोली यांनी केली आहे.
- इकारीस : जो सर्वांत शक्तिशाली आहे जो डोळ्यातून सुपरमॅन सारखी लेजर बीम सोडतो. पण तो सुपरमॅन नव्हे, सुपरमॅनसारखी पॉवर पण नाही. याची भूमिका रिचर्ड माडेन यांनी केली आहे.
- एजॅक : इटर्नल्स मेन लीडर आहे याची भूमिका सलमा हायेक यांनी केली.
- सेरसी : इकारीस बरोबर प्रेम करते तिची भूमिका जेम्मा चॅन यांनी केली आहे.
- किंगो : कुमेल नानजियानी पाकिस्तानी ऍक्टर आहे यांनी किंगो ची भूमिका केली आहे.
- मक्करी : हि एक फास्ट धावू शकते म्हणजे सुपरमॅन सारखी धावू शकते. याची भूमिका लॉरेन रिडलॉफ यांनी केली आहे.
- फास्टोस : मारवेल मध्ये फास्टोस हा एक पहिला समलिंगी सुपरहिरो बनला. तो एक बुद्धिमान आहे जो नवनवीन तंत्र विकिसित करतो. नवीन रचनात्मक तंत्र विसकसित करतो याची भूमिका ब्रायन टायरी हेन्री यांनी केली आहे.
- स्प्राईट : एक छोटी मुलगी आहे पण ती भ्रम निर्माण करू शकते याची भूमिका लिया मॅकहग यांनी केली आहे.
- गिल्गमेश : मजबूत आहे जो थेना शी मैत्री आहे यानची भूमिका डॉन ली यांनी केली आहे.
- ड्रुइग : मानवाचे माईंड कंटोल करू शकतो. स्वतःच्या म्हणण्या नुसार आज्ञा देऊ शकतो. याची भूमिका बॅरी केओघन यांनी केली आहे.
करून : किंगो चा मानवी सेवक म्हूणन कांगो चे लाईव्ह शूटिंग करत असतो. याची भूमिका हरीश पटेल यांनी केली आहे ते एक इंडियन ऍक्टर आहेत.
डेन व्हिटमन : लंडन मध्ये प्राध्यापक आहे जो सेरसीला डेट करत आहे. याची भूमिका किट हॅरिंग्टन यांनी केली आहे. किट हॅरिंग्टन म्हंटल्यावर तुम्हाला गेम्स ऑफ थ्रोन्स सिरीज आठवल्या शिवाय राहणार नाही. ज्यात एका योद्धा ची भूमिका केली होती. आणि इंटर्नल्स मध्ये डेन व्हिटमन लंडन मध्ये प्राध्यापक ची भूमिका केली आहे.
इटर्नल्स मध्ये समलैंगिक किस आणि थोडेसे लैंगिक प्रेमसंबंध दाखवण्यात आले आहेत जे आतापर्यंत मारवेल स्टुडिओ च्या कोणत्याच चित्रपटांत दिसले नाही. तर तुम्ही फॅमिली सोबत बघत असाल तर त्यावेळी काही क्षणासाठी डोळे बंद करावे लागतील. हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ भाषांमध्ये रिलीज केला आहे.
इटर्नल्स चित्रपट कुठे पाहू शकतो..?
यू ट्यूब, ऍमेझॉन प्राईम विडिओ, नेटफ्लिक्स. डिजनी प्लस हॉटस्टार, झी फाईव्ह, गुगल प्ले मुव्ही, ॲपल टी. व्ही. या ओ. टी. टी. प्लॅटफॉर्म वरती इटर्नल्स पाहू शकता. तुम्हाला हा चित्रपट पाहण्यासाठी भाडे द्यावे लागेल. प्रत्येक ओ. टी. टी प्लॅटफॉर्म चे रेंट ची अमाऊंट वेगवेगळी आहे. रेंट ची किमंत बदलत राहते. काही टी. टी. प्लॅटफॉर्म चे तुम्हाला सद्यस्यता घ्यावी लागेल.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफ, व्ही. एफ. एक्स. यासाठी माझ्याकडून “२.8 ” ला ५ स्टार पैकी स्टार देईन.