HomeEnglishEnglish ActionEnglish Films

एक्स्ट्रॅक्शन २ फिल्म समीक्षा | २१ मिनिट नो कट वन टेक ॲक्शन चा जलवा

Written by : के. बी.

Updated : जून 26, 2023 | 12:41 PM

extraction2
EXTRACTION 2 Image source netflix
एक्स्ट्रॅक्शन २
२०२३. ॲक्शन, रहस्य, रोमांचक. २ तास २ मिनिटे. [ आर ]
लेखकजो रुसो, अँथनी रुसो, अँडे पार्क्स
दिग्दर्शकसॅम हर्ग्रेव्ह
कलाकारक्रिस हेम्सवर्थ, गोलशिफ्टह फरहाणी, ओल्गा कुरिलेंको, इद्रिस एल्बा, तोर्निके गोग्रीचीयानी, ॲडम बेसा, डॅनियल बर्नहार्ट, टिनाटीन दलाकिशविली
निर्माताजो रुसो, पॅट्रिक नवाल, माईक लारोका, अँजेला रुसो-ऑटोस्टॅट, एरीक गिटर, पीटर श्वेरीन
संगीतहेनरी जॅकमन, ॲलेक्स ब्लेचर
प्रदर्शित तारीख१६ जुन २०२३
देशसंयुक्त राष्ट्र
भाषाइंग्लिश
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५⭐/ ५

कथा :- 

टायलर मरता मरता वाचला. त्यानंतर त्याला पुन्हा एका फॅमिलीला वाचवण्याचे मिशन दिले जाते. जे त्याच्याच रिलेशन चा भाग आहेत.

एक्स्ट्रॅक्शन २” चित्रपट समीक्षा :-

पुन्हा एकदा वादळांचा देवता थोर म्हणजे क्रिस हेम्सवर्थ यांचा एक्स्ट्रॅक्शन २ चित्रपट पाहिला. पुन्हा एकदा म्हणालो कारण २४ एप्रिल २०२० ला “एक्स्ट्रॅक्शन” चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचा हा दुसरा भाग आहे. “एक्स्ट्रॅक्शन” च्या पहिल्या भागात पंकज त्रिपाठी, रणदीप हुड्डा, रुद्राक्ष जैस्वाल, प्रियांषु पैन्युली हे इंडियन कलाकार आपल्याला बघायला मिळाले. भारतातहि शूटिंग करण्यात आले आहे, त्यामुळे बघायला तर मजा आलीच. ह्या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ९९ मिलियन दर्शकांनी पहिला. असा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा एकदा भाग २ प्रदर्शित केला. तुम्ही पहिला भाग पाहणे गरजेचे नाही कारण याची दुसऱ्या भागाशी कोणती लिंक जोडली नाही तरीपण तुमच्या माहिती साठी सांगतो. पहिल्या भाघात ड्रग डीलर च्या मुलाला वाचवण्याचे मिशन टायलर मिळाले ते मिशन पूर्ण पाहण्यासाठी तुम्ही पहिला भाग नक्की पहा एक दर्जेदार ॲक्शन बघायला मिळेल.

एक्स्ट्रॅक्शन २ आणि त्याचा पहिला भाग या दोन्हींचे उत्तम दिग्दर्शन सॅम हर्ग्रेव्ह यांनी केलं. अव्हेंजर एंडगेम चे दिग्दर्शक रुसो ब्रदर यांनी या फिल्म ची कथा लिहिली आहे. भाग २ पाहायला सुरुवात केली पहिली १५ मिनिटे तुम्ही थोडी फिल्म नाजूक वाटेल पण मिनिटा नंतर २१ मिनिटे नॉनस्टॉप कॅमेरा सीन तुम्हांला बघायला मिळेल. आपल्याला प्रश्न पडू शकतो कि २१ मिनिटे विडोओ शूट कसा केला असावा असा प्रश्न मला सुद्धा पडला. नॉर्मल विडीओ मध्ये आपण प्रत्येक सीन चे अनेक कट सीन वेगवेगळ्या अँगल ने बघत असतो. या फिल्म चे मध्ये टायलर जेल मध्ये प्रवेश केल्यापासून ॲक्शन सीन चालु होतो तो २१ मिनिटे चालतो ते बघायाल तुमचे डोळे एकटक राहतील. त्या ॲक्शन मध्ये तुम्हाला क्रिस हेम्सवर्थ ची ॲक्टिंग खूपच भारी केली आहे, उत्कृष्ट दर्जाची आहे. वन टेक शूट मधली फायटिंग, ॲक्शन रिअल वाटते. कथा तशी साधीच आहे. ॲक्शन भरभरून आहे. तोडफोड आहे, आपल्या एक्स पत्नीच्या बहिणीला वाचवण्याचे इमोशन ह्यात मांडले आहेत. शेवट ह्याचा चांगला केला गेला आहेत. जी तुम्हाला पाहण्यास भाग पाडते. क्रेडीट सीन मध्ये टायलर अजून एक मिशन मिळणार याची झलक तिसऱ्या भागात दिसून येयील.

काही न आवडणारे ते म्हणजे पहिल्या भागात टायलर ला जास्त गोळ्या लागल्या होत्या आणि तो पाण्यात पडला तरीपण तो वाचला हे काही रुचले नाही. गोळ्यांचा वर्षाव होतो त्यावेळी काही ठीकानी गोळ्यां सोडलेले लेजर जास्त डार्क वाटते ते काही रियलस्टिक वाटत नाही. बाकीचे व्ही. एफ. एक्स. चांगले दाखवले आहे. हा चित्रपट तुम्ही १८ वर्षाखाली असाल तर बघू नये.

एक्स्ट्रॅक्शन २” चित्रपट कुठे पाहू शकतो..?

हि फिल्म तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी फ्लॅटफॉर्म वर पाहू शकता पण त्यासाठी तुम्हांला पैसे देऊन मेंबरशिप घ्यावी लागेल.

लेखक स्टार रेटिंग : –

उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.5 स्टार देईन.

तुम्ही एक्स्ट्रॅक्शन २ चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *