गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्युम – ३ | दिग्दर्शक जेम्स गन यांची गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी सिरीज मधील शेवटची फिल्म
Written by : के. बी.
Updated : ऑगस्ट 13, 2023 | 09:07 PM

गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्युम – ३ |
लेखक | जेम्स गन |
दिग्दर्शक | जेम्स गन |
कलाकार | क्रिस प्रॅट, जोइ सलढाणा, डेव्ह बौटिस्टा, कॅरेन गिलन, पॉम क्लिमेनटिफ, सिन गन, ब्रॅडली कूपर, विन डिजल, चकवूडी इवजी |
निर्माता | केविन फाइगी |
संगीत | जॉन मर्फी |
प्रदर्शित तारीख | ५ मे २०२३ |
देश | युनाइटेड स्टेटस |
भाषा | इंग्लिश |
कथा :-
द हाय इवॉल्युशनरी नावाचा खलनायक जो प्राण्यांवर प्रयोग करून त्यांना पृथ्वी सारख्या असणाऱ्या ग्रहांवर “काउंटर अर्थ” पाठवत असतो. त्यात प्रयोग मध्ये रॉकेट ला सुद्धा परीक्षण करण्यास आणले जाते. त्याच्यावर व त्याच्यासोबत असणाऱ्या अनेक प्राण्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असतो. रॉकेट खूप चतुर असल्याने तो त्याच्या सापळ्यातून पळून जातो. रॉकेट एक जास्त बुद्धिमत्ता असलेला प्राणी आहे हे द हाय इवॉल्युशनरी ला त्याच्या बुद्धीचा वापर करायचा होता त्यासाठी त्याला पकडण्यासाठी गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी वर ऍडम वॉरलॉक हल्ला करतो त्यात रॉकेट मरण्याच्या स्थिथीत जातो. रॉकेट ला वाचवण्यासाठी एक पासवर्ड ची गरज आहे. गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी टीम रॉकेट ला वाचवण्यासाठी पासवर्ड मिळवतील? रॉकेट ला वाचवू शकतील का ? हे नक्की पहा.
“गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्युम – ३” चित्रपट समीक्षा :-
जेम्स गन दिग्दर्शित गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी चा पहिला चित्रपट २०१४ ला रिलीज झाला. आणि दुसरा पार्ट “गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्युम – २” चित्रपट २०१७ ला प्रदर्शित झाला. हे दोनही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आले. आता तिसरा पार्ट “गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्युम – ३” चित्रपट ५ मे २०२३ ला प्रदर्शित झाला. हि मार्वल युनिव्हर्स ची ३२ वि फिल्म आहे. पहिल्या दोन चितपटांच्या तुलनेत याचा तिसरा नंबर वर ठेवता येईल. जर तुम्ही याचे पहिले दोनही पार्ट पहिले नसले तरी तुम्ही हे पाहू शकता तुम्हाला स्टोरी समजेल पण. प्रत्येक पात्रेचे विविधता तुम्हाला समजणार नाही. पण त्यांची एव्हडा काही फरक पडणार नाही. फक्त गमॉरो चा पात्र ह्यात तुम्हाला थोडं गोंधळ करू शकतं कारण गमोरा तर मेली आहे तर परत कशी आली. रॉकेट आला कि आपल्या चेहऱ्यावर हसू उमटणारच. त्याच्या तोंडून जास्त विनोदी भाष्य एकायला मिळणार पण व्हॉल्युम – ३ रॉकेट मरण्याच्या दारात उभा आहे. जेम्स गन च्या चित्रपट म्हंटल्यावर ॲक्शन अधून मधून विनोद तर होणारच. स्टोरी तशी साधीच आहे. रॉकेट ची स्टोरी दाखवली आहे जी रॉकेट ची पहिली जीवनी वर आधारित आहे. रॉकेट कसा निर्माण झाला हे दाखवले आहे. ब्रह्मांड चे रक्षक ब्रह्मांड वाचण्याचे मिशन असते पण ह्यावेळी ते आपल्या मित्राला वाचवण्याचे मिशन आहे. त्यातूनच बाकीचे टीम मेंबर ची कमाल आणि धमाल आपल्याला पाहायला मिळते. रॉकेट चे गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी शी जुडलेलं नातं आणि इतर टीम ला त्याचं वेदनादायक जीवन पाहिल्यावर होणारे इमोशन या दोन गोष्टी चित्रपटाला बांधून ठेवतात.
क्वील चे थीम म्युजिक ऐकल्यावर भारी वाटते. म्युजिक आणि व्ही. एफ. एक्स. चांगले आहेत. हा चित्रपट तुम्ही फॅमिली सोबत पाहू शकता.
“गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्युम – ३” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.४ स्टार देईन.
तुम्ही गार्डियंस ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्युम – ३ चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.