गदर २ : द कथा कंटिन्यूज चित्रपट समीक्षा | परत एकदा सनी देओल गदर करताना
Written by : के. बी.
Updated : ऑगस्ट 16, 2023 | 01:00 AM
गदर २ : द कथा कंटिन्यूज |
लेखक | शक्तिमान तलवार |
दिग्दर्शक | अनिल शर्मा |
कलाकार | सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर, मनीष वाधवा, गौरव चोप्रा, |
निर्माता | अनिल शर्मा |
संगीत | मिथुन, माँटी शर्मा |
प्रदर्शित तारीख | ११ ऑगस्ट २०२३ |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
कथा :-
पहिली गदर फिल्म देश विभाजन मधील प्रेम कथा दाखवली होती. आणि आता दुसऱ्या भागात तारा सिंग – सकीना आणि त्यांचा मुलगा जिते पंजाब मध्ये खुशीने राहत आहेत. तारा सिंग एक ट्रक ड्रायव्हर आहे. त्याचावर त्याचे घर चालते. पण मुलाच्या डोक्यात राजेश खन्ना आणि देवानंद हिरो सारखे फिल्म ॲक्टर बनायचे स्वप्न आहे. आपला मुलाने चांगले शिकावे आणि ऑफिसर बनावे असे त्यांना वाटत असते. म्हणून ते त्याला हॉस्टेल ला टाकतात. भारत पाक चकमकीत तारा सिंग चा कुठे हि पत्ता लागत नाही. जिते आपल्या पापे ला शोधण्यासाठी वेश बदलून पाकिस्तानात जातो. जीतेला पापे भेटेल का?. जिते पाकिस्तान मध्येच अडकून राहिला आहे. तारा सिंग आपल्याला मुलाला वाचवण्यासाठी येईल कि नाही. त्यासाठी नक्की चित्रपट बघा.
“गदर २” चित्रपट समीक्षा :-
१९४७ ला भारत च्या विभाजन मधील एक विलक्षण तारा – सकीना ची प्रेम कथा आहे. दोन्ही बाजूंची दंगल आणि त्यात प्रेमाच बीज निर्माण झाले. ज्यात तारा सिंग सनी देओल आणि सकीना अमिषा पटेल यांची जोडी खुप गाजली होती. आणि गदर चे मेन विलन अशरफ अली ची भूमिका अमरीश पुरी यांनी केली. त्यांनी त्या विलन ची भूमिका एक दर्जेदार, आणि तडफदार, हुकुमदार अशी करून दाखवली आहे. नायक – खलनायक यांची आमने सामने असणारी फटकेबाजी अफलातून होती. शक्तिमान तलवार लिखित आणि अनिल शर्मा यांनी दिग्दर्शन केलेला “गदर : एक प्रेम कथा” चित्रपट २००१ साली प्रदर्शित केला आणि तो चित्रपट प्रचंड गाजला.
२२ वर्षांनी ‘गदर’ चा सीक्वल “गदर २ : द कथा कंटिन्यूज” ११ ऑगस्ट २०२३ ला प्रदर्शित करण्यात आला. खूप वर्षांनी चित्रपट बनवला त्यासाठी गदर : एक प्रेम कथा परत एकदा थिएटर मध्ये रिलीज करण्यात आला होता. बघितलेला चित्रपट लोकांनी परत एकदा थिएटर मध्ये जाऊन बघितला. प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद हि दिला. गदर २ चित्रपट शक्तिमान तलवार यांनी लिहिला आणि अनिल शर्मा यांनीच दिग्दर्शित केला. गदर २ ची कथा भारत – पाक युद्ध होण्याच्या अगोदर ची कथा आहे. चित्रपट सुरु होताच तुम्हांला कथा वाचक म्हणून नाना पाटेकर यांचा आवाज ऐकायला मिळेल. यात गदर ची पहिली कथा थोडक्यात सांगून खलनायकाबद्द्ल सांगतात. मग हळू हळू तारा सिंग – सकीना ची एन्ट्री येते. त्या एन्ट्री वर म्युजिक कानावर पडले कि मन कान तृप्त होतात. तारा सिंग – सकीना ची जोडी बघायला हि आवडते. तारा चा मुलगा जिते च्या स्टोरी वर फोकस केला आहे. जिते – मुस्कान ची प्रेम कथा फास्ट मोड मध्ये दाखवली अशी त्याने तिला बघितलं आणि प्रेम झालं. प्रेमात कठीण असे काही दाखवले नाही. अशी स्टोरी आता फारशी चालत नाही. मध्यांतर पर्यंत चित्रपट थोडा बोर वाटतो. कारण यात सनी देओल जास्त नाही दिसत. मध्यांतर नंतर सनी देओल ची परत एन्ट्री होते. तेव्हा बघायला मजा येते. पहिल्या चित्रपटांत संवादबाजी जशी होती तशी फारसी संवादबाजी यात ऐकायला नाही मिळणार. आत तुम्ही म्हणाल पंप वैगरे काही उखाडले आहे का. पंप उखड्ण्याची वेळ येते तो सीन खूपच मस्त दाखवला आहे. मला त्या सीन ला प्रेक्षकांच्या शिट्या ऐकू येत होत्या. ह्याच सीन ला नाही सनी देओल च्या बऱ्याच सीन ला शिट्या वाजल्या आहेत.
सनी देओल यांनी २२ वर्षांनी आपल्याला त्याच अंदाज मध्ये मनोरंजन केलं. त्यांची ती संवादबाजी. त्यांचा तो ओरडलेला आवाज अजून सुद्धा शत्रूला फक्त आवाजांनी गप्प बसायला लावणारी अशी क्षमता असणारा आवाज. अमिषा पटेल यांनी तीच भूमिका जे रडणे, प्रेम करणे, एक कोमल आवाजात त्यांचे संवाद बोलणे उत्तम केले आहे. खलनायक ची संवाद बाजी थोडी ओवर भूमिका होती असे वाटत. जिते ची भूमिका दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा यांनी साकरली आहे. सिमरत कौर यांनी मुस्कान ची भूमिका केली आहे.
पहिल्या गदर ची काही गाणी जशी आहे तशीच वापरण्यात आली आहेत. गाण्याचे बोल आहे तेच आहेत बदल काहीच केला नाही. त्यामुळे पहिल्या फिल्म ची अनुभिती निर्माण होते. सात पैकी चार गाणी नवीन आहेत. बॅकग्राऊंड म्युजिक चे काम उत्तम आहे. बंदुकीच्या गोळ्या असो या बॉम्ब गोळे उडवणारे व्ही. एफ. एक्स. असो बऱ्यापैकी आहेत. काही ठिकाणी फायटिंग अतिशयोक्ती आहे. पण समोर सनी देओल त्यांना दिसल्यावर वर असे होवू शकते. त्यात कोण लॉजिक बघणार नाही.
हा चित्रपट तुम्ही परिवारासोबत सोबत बघू शकता. एकदातरी बघू शकता असा चित्रपट आहेच.
“गदर २” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी २.९ स्टार देईन.
तुम्ही गदर २ चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.