सुभेदार : गड आला पण… चित्रपट समीक्षा | सुभेदार तानाजी मालुसरे यांची शौर्य गाथा
Written by : के. बी.
Updated : ऑगस्ट 27, 2023 | 04:58 PM
🙏जय शिवराय🙏
सुभेदार : गड आला पण… |
लेखक | दिग्पाल लांजेकर |
दिग्दर्शक | दिग्पाल लांजेकर |
कलाकार | अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अभिजित श्वेतचंद्र, दिग्विजय रोहिदास |
निर्माता | प्रद्योत पेंढारकर, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, अनिल वरखाडे, श्रमिक गोजमगुडे , श्रुती दौंड, निषिद, अनिकेत, विनोद जावळकर |
संगीत | देवदत्त मनीषा बाजी |
प्रदर्शित तारीख | २५ ऑगस्ट २०२३ |
देश | भारत |
भाषा | मराठी |
कथा :-
आगोदर कोंढाणा किल्ला फत्ते करायचा मगच माझ्या रायबाचे लग्न करायचे असे बोलून विडा उचलणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांची शौर्य गाथा यात माडंली आहे.
“सुभेदार : गड आला पण…” चित्रपट समीक्षा :-
दिग्दर्शक व लेखक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित फर्जंद (२०१८), फत्तेशिकस्त (२०१९), पावनखिंड (२०२२), शेर शिवराज (२०२२) हे शिवराज अष्टक मधील चार चित्रपट प्रदर्शित केले होते आणि आता शिवराज अष्टकातील पाचवा चित्रपट “सुभेदार” २५ ऑगस्ट २०२३ ला रिलीज करण्यात आला. सुभेदार तानाजी मालुसरे यांची हि शौर्य गाथा सांगणारा सुभेदार चित्रपट दिग्पाळ लांजेकर यांनीच दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. त्याचसोबत त्यांनी बहिर्जी नाईक यांची भूमिका केली आहे. शेर शिवराज या चित्रपटात पण त्यांनी बहिर्जी नाईक यांची भूमिका केली होती. चित्रपटाची सुरुवात दोन मावळ्या पासून होते. सुरुवातीच्या गाण्यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घडते. त्यांची एन्ट्री छान दाखवली आहे. त्यानंतर हळू हळू सुभेदार कसे झाले पहावयास मिळते. काही मावळ्यांची थोडक्यात माहिती संगितली आहे. जर का आपल्याला इतिहास माहित असेल तर अनेक मावळ्यांचे नावे आहेत जी नावे ऐकताच तुम्हाला समजेल. यात भरपूर इमोशन आहेत, काही ठिकाणी तुमच्या डोळ्यात अश्रू सुद्धा येतील. मध्यांतर पर्यंत चित्रपटाची गती कमी कमी होत आहे त्यामुळे चित्रपट थोडा लांब वाटतो आणि मध्यांतर नंतर कोंढाणा किल्ला कसा जिंकला जाईल याची उत्सुकता वाटेल. कथा, सवांद लेखन उत्तम आहे. त्यामुळे तुम्हाला चित्रपट बघायला बांधून ठेवतो. पण यात का जर पाठीमागचे बॅकग्राऊंड म्हणजे गडांच्या भिंती काही खास दिसत नाहीत. उदयभान हे पात्र आणखीन त्याच्या बद्दल दाखवायला हवं होत. जेणे करून त्याची चाल काय आहे. तो इथे कसा आला असा काही इतिहास दाखवला असत तर आणखीन चित्रपटात भर पडली असती. असो पण शेवटच्या लढाई तशी चांगली आहे. म्हणजे त्यात कुठे अतिशयोक्ती दाखवली नाही आहे. इतिहासाची पाने चाळून आपल्याला जस घडलं तसा खरा इतिहास दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ते आपल्याला नक्की आवडेल. नाहीतर असा एक चित्रपट तुम्ही पहिलाच असेल ओम राऊत यांचा “तानाजी अन्संग वॉरियर” यात आपल्याला शेवट काही बरोबर दाखवण्यात आलं नव्हते. भलेही तो चित्रपट हिट होता. पण तो चित्रपट एक मनोरंजन बेस होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी केली आहे. त्यांनी ती भूमिका उज्वल केली आहे. माता जिजाऊ यांची भूमिका मृणाल कुलकर्णी यांनी उत्तम प्रकारे साकार केली आहे. यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणाला जिजाऊ भूमिकेत पाहू शकत नाही अशी ती भूमिका त्यांनी केली आहे. सुभेदार तानाजी यांची भूमिका अजय पुरकर यांनी दर्जेदार पणे केली. जसा आहे तसा सुभेदार यांची भूमिका साकार करून दाखवून दिली आहे. त्यांची ती देहबोली, भाषा, शरीर यष्टी त्यांच्याकडे पाहिले कि तुम्ही म्हणाल असेच सुभेदार असतील. तानाजी यांचे बंधू सूर्याजी यांची भूमिका अभिजित श्वेतचंद्र यांनी उत्तम केली. समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अलका कुबल यांनीही छोटीशी पण मनात राहणारी भूमिका केली आहे.
यात चार गाणी आहेत चार हि गाणी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनीच लिहिली आहेत. देवदत्त बाजी यांनी चांगले म्युजिक प्रधान केले आहे. काही ठिकाणी सोडले असता बॅकग्राऊंड म्युजिक चांगले आहे. वेश भूषा पण अप्रतिम आहेत फक्त एकाच गोष्टीत भर पडायला हवी होती ती म्हणजे गडांचे बॅकग्राऊंड एकसारखे वाटत असतात. इतर चित्रपट हा नक्कीच बघा यात तुम्हांला राम-लक्ष्मण भावासारखी असते तशीच तानाजी-सूर्याजी या भावांची जोडी वाटू लागते. त्यसाठी
“सुभेदार : गड आला पण…” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन पाहू शकता.
लेखक स्टार रेटिंग : –
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ३.० स्टार देईन.
तुम्ही सुभेदार : गड आला पण… चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.