पावनखिंड : मराठी चित्रपट समीक्षा | Pawankhind : Marathi Film Review
Written by : के. बी.
Updated : एप्रिल 5, 2022 | 5:46 PM
पावनखिंड : मराठी चित्रपट समीक्षा | Pawankhind : Marathi Film Review
संगीत : – देवदत्त बाजी
पार्श्वगायक : – अवधूत गुप्ते, बेला शेंडे, अवधूत गांधी, हरिदास शिंदे
प्रदर्शित तारीख : – १८ फेब्रुवारी २०२२
वेळ : – २ तास ३३ मिनिटे
भाषा : – मराठी
देश : – भारत
सारांश :-
शिवाजी महाराज जोपर्यंत गडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत घोडखिंडीतुन एकाही शत्रूच्या सैनाला आत येऊ देत नाहीत. मराठा मावळ्यांनी दिलेला लढा दाखवण्यात आला आहे.
समीक्षा : –
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव काशीद, बाजीप्रभू देशपांडे आणि इतर मावळ्यांनी आपल्या राजासाठी दिलेले बलिदान, प्रत्येक मावळ्यांमध्ये आपल्या राज्याबद्दल प्रेम किती अफाट आहे हे दिसून येते. घोडखिंडी चे पावनखिंड कसे झाले ते एकदा बघाच.
पहिल्यांदा फर्जंद आणि फत्तेशिकस्त बनवल्यानंतर दिलेले जीवदान पावनखिंड हा चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी बनवला. या चित्रपटांचे लेखन हि त्यांनीच केले.
१९५६ साली भालजी पेंढारकर यांनी पावनखिंड ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट बनवला होता. यात बाजींनी कट्यार घेण्याचे चा सीन आहे याचा संदर्भ २०२२ पावनखिंड यात घेतला आहे. आणि आता २०२२ ला पावनखिंड हा चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी बनवला. या चित्रपटांचे लेखन हि त्यांनीच केले.
चौथी च्या पुस्तकात पावनखिंड नावाचा धडा होता. त्यावेळी ते वाचून आपल्याला त्यांनी केलेली पराक्रम आणि त्यांची देहयष्टी डोळ्यावर यायची आता तशीच ती शत्रूंनी बाजींना पाहल्यावर दहा पाऊल लांबच घेतील अशी देहयेष्टी, देहबोली, आपापल्या पडद्यावर दिसते. अजय पुरकर ( बाजीप्रभू देशपांडे) यांनी केलेली भूमिका जिवंत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका चिन्मय मांडलेकर यांनी केली, नेहमी प्रमाणे मालिके मध्ये पण त्यांनी माता जिजाऊ यांची भूमिका केली यांनी यात हि त्यांनी राजमाता जिजाऊ यांची भूमिका उत्तम केली. खलनायक सिद्दी जोहर ची भूमिका समीर धर्माधिकारी यांनी पार पाडली. अंकित मोहन (श्रीमंत रायाजीराव बांदल), आस्ताद काळे (सिद्धी मसूद ), अक्षय वाघमारे (कोयाजी बांदल) व इतर कलाकारांनी उत्तम भूमिका बजावली आहे. सवांद लेखन आपल्या पटकन लक्षात राहतात.
वेशभूषा, यद्धातील सामग्री, रणांगण, लढाई, व्हीएफएक्स चे काम थोडे भावले असले तरी, लढाईतील लढतीची बाजू सुद्दा उत्तम प्रकारे दर्शवण्यात यश आले आहे.
देवदत्त बाजी यांची संगीत प्रत्येक सीन पाहताना खेळात ठेवतात. यात चार गाणे आहेत. अवधूत गुप्ते, बेला शेंडे, अवधूत गांधी, हरिदास शिंदे यांनी गायली आहेत.
दर्जेदार अभिनय १, संगीत २, सवांद ३, आणि इतर साठी अर्धा स्टार मिळून माझ्याकडून ५ ✰ स्टार पैकी ३.५ ✰ स्टार रेटिंग देईन.
कुठे बघायचे ?
थिएटर आणि ऍमेझॉन प्राईम वर पाहू शकता.