HomeBiographyHistoryMarathiTV Series

डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा मराठी टीव्ही मालिका | Dr. Babasaheb Ambedkar – Mahamanvachi Gauravgatha Marathi TV Show

Written by : के. बी.

Updated : मार्च 1, 2022 | 5:58 PM

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा मराठी  टीव्ही मालिका | Dr. Babasaheb Ambedkar – Mahamanvachi Gauravgatha Marathi TV Show

2019/20   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – २ तास १० मिनिटे   
शैली : – जीवनचरित्र, नाटक, इतिहास                              जगभरून फिल्म्स रेटिंग : – 4.5 
 
पथकथा                  :- शिल्पा कांबळे, चिन्मय केळकर (सवांद लेखन)
लेखक                    :- अपर्णा पाडगांवकर, शिल्पा कांबळे 
दिग्दर्शक                :- गणेश रसाने     
कलाकार                :- सागर देशमुख, चिन्मयी सुमीत, अमृत गायकवाड, संकेत कोर्लेकर, शिवानी रंगोले, मृण्मयी सुपल, पूजा नायक 
 
Dr.%20Babasaheb%20Ambedkar%20 %20Mahamanvachi%20Gauravgatha%20Marathi%20TV%20Show
 
निर्माता                   :- निनाद वैद्य, नितीन वैद्य     
संगीत                     :- आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे   
प्रदर्शित तारीख      :-  १८ मे २०१९ – १७ ऑक्टोबर २०२०
वेळ                        :- २२ मिनिटे ( एक एपिसोड) 
भाषा                      :- मराठी 
डबिंग भाषा            :- हिंदी  
देश                         :-  भारत  
 
 
कथा :- 
 
            डॉ बाबासाहबे आंबेडकर यांचे जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंत चा जीवन प्रवास दाखवला आहे.  
 
समीक्षा :- 
 
दलित समाजाला गुलामगिरीतुन,अन्यायातून, मुक्त करण्यासाठी, कायद्याचा सहारा घेऊन संघर्ष केला. आणि त्यांना माणूस म्हणून जगायला प्रेरणा दिली. समाजसेवा करत असताना त्यांचे वैयक्तीत जीवनातील चढ उतार. आर्थिक परिस्थिती नसताना हि रात्र दिवस अभ्यास करून अनेक घेतलेल्या पदव्या ते पण कमी वेळामध्ये. पदोपदी झालेले  अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, विविध विषयात निपुणता असलेले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ बाबासाहबे आंबेडकर यांचे जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंत चा जीवन प्रवास दाखवला आहे. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा मधून तुम्हाला शिक्षणाची आवड, चिकाटी, जिद्द निर्माण होईल, त्यांची अनेक केलेली महान कार्य आपल्याला माहित नाहीत त्यामुळे.आपण त्यांना एका जातीपुरतेच मानतो आहे. पण हि मालिका पाहिल्यावर तुम्हाला आंबेडकर फक्त एका दलित समाजाचे नसून ते पूर्ण देशाचे आहेत असे तुम्हाला वाटू लागेल, उच्च वर्णीयांकडून मिळालेले अपमान, स्पर्श करून न घेणं, पाणी पिण्यास मनाई करणे हे जे अत्याचार करणे असे जीवन त्यांनी कसे जगले हे पाहिल्यावर तुम्ही अचंबित व्हाल. 
 
इतिहासकार चांगदेव भावानराव खैरमोडे यांनी लिहिलेले जीवन चारित्र  “डॉ. भीमराव रामजी आंबेडकर” (खंड १ ते १२) या ग्रंथातून व मराठी, हिंदी, इंग्लिश,अनेक पुस्तकांतुन हि टीव्ही मालिका बनवण्यात आली आहे. याचे दिग्दर्शन गणेश रसाने यांनी केले त्याच बरोबर सागर केयूर, अजय मयेकर, अक्षय पाटील यांनी सुद्धा दिग्दर्शन केले आहे. 
 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाची भूमिका अमृत गायकवाड व तरुण वयातील आंबेकर संकेत कोर्लेकर आणि प्रौढ भूमिकेत सागर देशमुख  ने अप्रतिम भूमिका केली. अमृत गायकवाड ने केलेली भूमिका अविश्वसनीय आहे. सागर देशमुख यांनी साकारलेली आंबेडकरांची भूमिका योग्यरीत्या केली आहे. त्यांचे हसणे, रागावणे, बोलणे, हालचाली त्या पद्धतीने हुबेहूब दिसणारे होते. रामजी सकपाळ (वडील) – मिलिंद अधिकारी, भीमाबाई (आई) – चिन्मयी सुमीत, रमाबाई (तरुण वयातील) – मृण्मयी सुपल, रमाबाई (आंबेडकर पत्नी) – शिवानी रंगोले, मीराबाई सकपाळ (आत्या) – पूजा नायक, छत्रपती शाहू महाराज – राहुल सोलापूरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
 
आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे या दोन्ही भावांनी याला संगीत दिले आहे. आदर्श शिंदे यांनी गायलेले शीर्षक गीत माझा भीमराया प्रचंड गाजले. 
 
स्टार प्रवाह या मराठी चॅनेल वर १८ मी २०१९ बुद्ध पोर्णिमेच्या मंगल दिवशी सूर करण्यात आली. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता हि टीव्ही मालिका सुरु व्हायची. हिंदी भाषेतून १४ एप्रिल २०२० रोजी बाबासाहेब यांची जयंती दिवशी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर – एक महामानव कि महागाथा” हि टीव्ही मालिका सुरु करण्यात आली. 
 
कुठे बघायचे ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महामानवाची गौरवगाथा हि मालिका डिस्ने प्लस हॉटस्टार वर पाहू शकता. 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *