HomeEnglishFilmsFilms NewsHistoryMarathiSouth Indian

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सात चित्रपट | Seven Movies based on the life Story of Dr. Babasaheb Ambedkar

Written by : के. बी.

Updated : मार्च 1, 2022 | 9:38 AM

डॉ बाबासाहेब यांचे जीवन बिकट परिस्थितून मार्ग काढत शिक्षण घेतले, अंधारामध्ये अडकलेल्या समाजाला प्रकाशात आणण्याचे कार्य केले. माणसाला माणूस म्हंणून जगण्याचा हक्क दिला. असे  थोर समाजसेवक, अर्थतज्ज्ञ, भारताचे पहले कायदे मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या विचारांचा उपयोग फक्त दलित समाजासाठीच नाही तर देशासाठी केला आहे. असे त्यांचे संघर्षाचे जीवन जीवनचरित्र आपण  चित्रपटांच्या माध्यमातून पाहू शकतो. ते चित्रपट खालील प्रमाणे

Dr.%20Babasaheb%20Ambedkar%20image
Dr. Babasaheb Ambedkar

1) भीम गर्जना (१९९०) मराठी चित्रपट | Bhim Garjana (1990) Marathi Movie

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील हा चित्रपट आहे. भीम गर्जना हा चित्रपट विजय पवार यांनी दिग्दर्शित केला आहे.  कृष्णानंद यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे. प्रथमा देवी यांनी रमाबाई यांची भूमिका साकारली आहे. उत्तम प्रकारे भूमिका सादर केल्या आहेत.

भीम गर्जना (१९९०) मराठी चित्रपट समीक्षा | Bhim Garjana (1990) Marathi Movie review

2) बालक आंबेडकर (१९९१) कन्नडा चित्रपट | Balak Ambedkar (1991) Kannada Movie

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लहापणीचे जीवन दाखवण्यात आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका चिरंजीवी विनय यांनी केली आहे, मास्टर अमित, मास्टर उमेश, तीर्थ प्रसाद, जगन्नाथ राव यांनी या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट कन्नड भाषेतील आहे. या चित्रपटांचे हिंदी भाषेत सुद्धा डबिंग केले आहे.

बालक आंबेडकर (१९९१) कन्नडा चित्रपट समीक्षा | Balak Ambedkar (1991) Kannada Movie Review

3) डॉ. आंबेडकर (१९९२) तेलगू चित्रपट | Dr. Ambedkar (1992) Telugu Movies

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनप्रवास दाखवण्यात आहे. हा चित्रपट तेलगू भाषेत निर्माण केला आहे. आकाश खुराणा यांनी डॉ. आंबेडकर यांची भूमिका केली आहे. नीना गुप्ता यांनी रमाबाई यांची भूमिका केली आहे. रोहिणी हट्टंगडी यांनी दुर्गाबाई देशमुख यांची भूमिका केली आहे.

डॉ. आंबेडकर (१९९२) तेलुगू चित्रपट समीक्षा | Dr. Ambedkar (1992) Telugu Movies Review

 4) युगपुरुष ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर”  (१९९३) मराठी चित्रपट | Yugpurush “Dr. Babasaheb Ambedkar” (1993) Marathi Movie

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. धनंजय किर यांनी लिहिलेल्या चरित्र ग्रंथातून, आणि इतर अनके ग्रंथांच्या माध्यमातून बाबासाहेब यांच्या जीवनावर चित्रपटबनवण्यात आला आहे.  शशिकांत नलावडे यांनी पटकथा, तयातील संवाद आणि दिग्दर्शन केले आहे.

युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९३) मराठी चित्रपट समीक्षा समीक्षा | Yugpurush Dr. Babasaheb Ambedkar (1993) Movie Review

5) डॉ. बाबासाहेब आंबेडकर द अंटोल्ड ट्रुथ (२000) इंग्लिश चित्रपट | Dr. Babasaheb Ambedkar The Untold Truth (2000) English Movie

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आहे. महान केलेली कामगिरी आणि त्यांचे वयक्तित जीवन प्रवासाची गाथा सांगणारा हा चित्रपट आहे.जब्बार पटेल यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर द अंटोल्ड ट्रुथ चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटाची मूळ भाषा इंग्लिश आहे. त्यानंतर  मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, पंजाबी, उडिया, गुजराती या भाषेतून डबिंग केलं गेले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर द अंटोल्ड ट्रुथ (२000) समीक्षा | Dr. Babasaheb Ambedkar The Untold Truth (2000) Movie Review, Best films

6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२००५) जीवन कथा… कन्नड चित्रपट | Dr. Babasaheb Ambedkar Life Story.. (2005) Kannada Movies

महामानव, भारताचे पहिले न्याय मंत्री, अर्थतज्ञ, राज्य घटनेचे शिल्पकार.यांचा जीवन प्रवास या चित्रपटांमध्ये मांडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाला कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार देण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२००५) जीवन कथा… कन्नड चित्रपट समीक्षा | Dr. Babasaheb Ambedkar Life Story.. (2005) Kannada Movies Review

7) बाळ भीमराव (२०१८) मराठी चित्रपट | Bal Bhimrao (2018) Marathi Movie

राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, महामानव डॉ बाबासाहेब आंबेकर यांचे बालपणाचे जीवन कसे घडत गेले ते या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळेल. या चित्रपटांचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले. मनीष कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची योग्यरीत्या साकारली आहे. मोहन जोशी, विक्रम गोखले, मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, प्रेमा किरण, यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.

बाळ भीमराव (२०१८) मराठी चित्रपट समीक्षा | Bal Bhimrao (2018) Marathi Movie Review
हे पण वाचा :-
वरील तुम्ही चित्रपट पाहिले असेल तर तुमचा आवडता चित्रपट आणि मालिकेचे नांव कॉमेंट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *