आगामी मराठी चित्रपट – बाल शिवाजी | Upcoming Marathi Movie – Bal Shivaji
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 20, 2022 | 6:10 PM
गेली ८ वर्षे मी एक स्वप्न पहिले ते सत्यात उतरणार आहे … असे रवी जाधव यांनी सांगून “बाल शिवाजी” चित्रपटांचा टिजर पोस्ट केला आहे.
Bal Shivaji |
इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडित मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे “बाल शिवाजी” चित्रपट निर्माण करणार आहेत.
छत्रीपती शिवाजी महाराज यांचे बालपण १२ ते १६ वर्षाचे असताना केलेले पराक्रम. एका महान राज्याचे बालपण कसे असावे. हे ह्या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. जून २०२२ पासून चित्रपटाचे काम सुरु होईल.
“बाल शिवाजी” टीजर – मोशन ग्राफिक च्या माध्यमातून टीजर निर्माण केला आहे. त्या डरकाळी आवाज , स्क्रीन वरून शिवाजी नावाचे अक्षर जाताना उभे दिसणारे बाल शिवाजी अपार शक्ती असलेला वाटतो. अप्रतिम टीजर बनवला आहे. हा टीजर सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
याच्या अगोदर १९८२ साली “बाल शिवाजी” नावाचा चित्रपट बाल चित्र समिती यांनी सादर केला होता. बाल शिवाजी १९८२ चित्रपटांची भाषा हिंदी होती. या चित्रपटात माता जिजाऊ यांचे पुत्र शिवाजी यांनी लहानपणी केलेल्या पराक्रमाचा इतिहास दाखवला आहे.