राष्ट्रवीर शिवाजी (1962) हिंदी चित्रपट समीक्षा | Rashtraveer Shivaji (1962) Hindi Movie Review
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 20, 2022 | 9:35 AM
राष्ट्रवीर शिवाजी (1962)
सीबीएफसी :- यू / ए कालावधी : – २ तास १० मिनिटे
शैली : – नाटक, जीवन चरित्र, इतिहास “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.1✰ / 5✰
दिग्दर्शक : – सुलतान
कलाकार : – श्याम कुमार, रत्नमाला, अंजुम,
संगीत : – सुरेश आणि तलवार
गायक : – अशा भोसले, मान्ना डे , सुमन कल्याणपूर
प्रदर्शित तारीख : – १९६२
वेळ : – २ तास १० मिनिटे
भाषा : – हिंदी
देश : – इंडिया
कथा :-
शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले माता जिजाऊ यांचे पुत्र शिवाजी यांनी केलेले पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून राज्याभिषेक पर्यंत घडलेला जीवन प्रवासाचा इतिहास दाखवला आहे.
समीक्षा : –
राष्ट्रवीर शिवाजी हा छत्रपती ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे. १९६२ च्या अगोदर १९५२ मध्ये “छत्रपती शिवाजी” हा चित्रपट भालजी पेंढारकर यांनी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बनवला होता. त्या चित्रपटाचे बोल मराठी भाषेत आहेत. त्यानंतर १९६२ मध्ये सुलतान यांनी राष्ट्रवीर शिवाजी या नावाचा चित्रपट हिंदी भाषेतून बनवला. श्याम कुमार – शिवाजी महाराज, रत्नमाला – राजमाता जिजाबाई, अंजुम – औरंगजेब या मुख्य भूमिका आहेत. रंगभूषा, वेशभूषा, युद्धातील दृश्ये, त्याकाळा नुसार दाखवण्यात आले आहे. स्पेशल इफेक्ट चा वापर सुद्धा केला आहे. या चित्रपटामध्ये अशा भोसले, मान्ना डे , सुमन कल्याणपूर , यांनी गाणी गायली आहेत.
कुठे बघायचे : – राष्ट्रवीर शिवाजी (1962) हा चित्रपट यु ट्यूब वर पाहू शकता.