द ग्रेट ट्रेन रोबरी (1903) सायलेंट शॉर्ट मुव्ही – | The Great Train Robbery (1903) Silent Short Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:27 PM
द ग्रेट ट्रेन रोबरी (1903) सायलेंट शॉर्ट मुव्ही – | The Great Train Robbery (1903) Silent Short Movie
कालावधी : – 12 मिनिटे
शैली : – ॲक्शन, साहसी “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 3.8✰ / 5✰
निर्माता : – जॉर्जेस मेलिस
कलाकार : – जुस्टस डी. बार्नेस Justus D. Barnes, जि. एम . अँडरसन G. M. Anderson, वॉल्टर कॅमेरॉन Walter Cameron
प्रदर्शित तारीख : – 190३
वेळ : – 12 मिनिटे
भाषा : – मूक चित्रपट
देश : – युनाइटेड स्टेट्स
![]() |
The Great Train Robbery (1903) |
सारांश : –
द ग्रेट ट्रेन रोबरी स्कॉट मारबल यांनी लिहिले आहे. आणि तेच नांव फिल्म ला पण देण्यात आले. रेल्वे रोड च्या लगत एक टेलिग्राफ चे ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये काही चोर येतात आणि टेलिग्राफ च्या ऑफिसर ला बांधून पळून जातात. ट्रेन येऊन थांबलेली पाहून ते चोर ट्रेन मध्ये चढतात. ट्रेन मधील एका प्रवाश्याला हि मारून तेथून निघून ट्रेन वर चढतात. टेंडर वर त्यांच्या मारामारीत एका माणसाला ट्रेन वरून खाली फेकतात. आणि ट्रेन च्या पुढच्या डब्ब्यातील ट्रेन चालकाला ट्रेन थांबवून ट्रेन चा इंजिन डबा वेगळा करायला सांगतात. त्यामागील डब्यातील सर्व प्रवासी यांना खाली बोलावून त्यांच्या जवळ असणारे पैसे दागिने गोळा करतात. ट्रेन च्या इंजिन डब्या मध्ये जाऊन बसतात. इंजिन डबा चालू करून फरार होतात. त्याच चालत्या इंजिन मधून ते सर्व खाली उतरतात आणि एका जंगलात जातात. तिथे त्यांनी अगोदर घोडे ठेवले होते. टेलिग्राफ च्या ऑफिस मध्ये एक जण येतो आणि टेलिग्राफ च्या ऑफिसरला बंधनातून मुक्त करून ती व्यक्ती पोलीस अधिकारी हॉल मध्ये डान्स करत असतात त्या अधिकाऱ्यांना सांगते. बांधून धारी अधिकारी पटकन धावत चोरांच्या दिशेनं धावतात. पुढे त्यांचे काय होते ते तुम्ही स्वतः पाहू शकता.
1903 साली अमेरिकन एडविन एस. पोर्टर (Edwin S. Porter) यांनी एडिसन कंपनीसाठी एक मुव्ही बनवला. त्या चित्रपटाचे नावं होते “द ग्रेट ट्रेन रोबरी ” (The Great Train Robbery). ह्या चित्रपटासाठी २० शॉट घेण्यात आले आणि त्याचे शूट पण वेगवेगळ्या ठिकाणी इनडोअर आणि आऊटडोअर जसे आजच्या काळात शूट होते तसे. या मुव्ही चा कालावधी १२ मिनिट पर्यंत होता. या फिल्म मध्ये शॉट कट करणे आणि ईडिटिंग पद्धत पहिल्यांदाच वापरण्यात आले.