प्लेयिंग कार्ड्स (1896) सायलेंट शॉर्ट मुव्ही | Playing Cards (1896) – Silent Short Movie
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:18 PM
प्लेयिंग कार्ड्स (1896)
कालावधी : – 67 सेकंद
शैली : – मूक फिल्म्स “जगभरून फिल्म्स” रेटिंग : – 2.3✰ / 5✰
प्रदर्शित तारीख : – 1896
वेळ : – 67 सेकंद
भाषा : – मूक चित्रपट
देश : – फ्रान्स
Playing Cards (1896) |
सारांश : –
1896 मध्ये जॉर्जेस मेलिस यांनी “प्लेयिंग कार्ड्स” (Playing Cards) हि त्यांची पहिली डॉक्युमेंटरी फिल्म निर्माण केली. प्लेयिंग कार्ड्स हि मूक, ब्लॅक अँड व्हाईट शॉर्ट फिल्म आहे. हि ६७ सेकंदाची फिल्म आहे. या फिल्म चे दिग्दर्शन जॉर्जेस मेलियस यांनी केले. यास शॉर्ट फिल्म मध्ये बागेत पत्त्यांची पार्टी आहे. तिघेजण पत्ते खेळत बसले आहेत. एकजण सिगारेट पीत धूर सोडत आहे. तर दुसऱ्याच्या हातात सिगारेट आहे आणि पत्त्यांचा डाव खेळात आहे. एक महिला वाईन ची बॉटल घेऊन त्यांना देते. सिगारेट पित असताना तो त्या महिले कडून बॉटल घेऊन प्रत्येकाच्या ग्लास मध्ये वाईन भरतो. तिघेजण एकसाथ ग्लास उचलून ग्लासला ग्लास लावून चष करतात आणि खेळत असतात. मधली व्यक्ती पत्ते खेळत असताना न्युज पेपर सुद्धा वाचत आहे. त्या न्युज पेपर मधील बातमी सगळ्यांना दाखवून सर्वजण हसत आहेत.