जॉर्जेस मेलिस ग्रॅन्डफादर ऑफ स्पेशल इफेक्ट | Georges Melies Grandfather of Special Effect
Written by : के. बी.
Updated : फेब्रुवारी 4, 2022 | 6:17 PM
जॉर्जेस मेलिस ( Georges Melies )
जन्म दिवस : – 8 डिसेंबर 1861
निधन दिवस : – 21 जानेवारी 1938
जन्म स्थान : – पॅरिस, फ्रान्स
राष्ट्रीयत्त्व : – फ्रेंच
व्यवसाय : – जादूगार, सेट डिझायनर, अभिनेता, वेशभूषा डिझायनर, दिग्दर्शक, निर्माता
Georges Melies |
ग्रॅन्डफादर ऑफ स्पेशल इफेक्ट
जॉर्जेस मेलिस ( Georges Melies ) एक फेंच जादूगार होते. जादू करून दाखवत असत. जॉर्जेस मेलिस यांनी ल्युमिअर चे फिल्म पहिल्या नंतर त्यांच्या डोक्यात कप्लना सुचू लागल्या. ल्युमिअर बंधूनी त्यांचे उपकरण मागितले तेव्हा त्यांनी देण्यास नकार दिल्यावर जॉर्जेस मेलियस लंडनला गेले. त्यांनी एक सिनेमॅटोग्राफ खरीदी केला त्याच्यात त्यांनी आपल्या पद्धतीने शोध करून एक नवीन कॅमेरा तयार केला. त्या उपकरनामध्ये आवाज येत असल्याने त्यांनी त्याचे “मशीन गन” असे नांव ठेवले.
1896 मध्ये जॉर्जेस मेलिस यांनी “प्लेयिंग कार्ड्स” (Playing Cards) हि त्यांची पहिली डॉक्युमेंटरी फिल्म निर्माण केली. त्यांनी फिल्म बनवण्यासाठी एक सेट उभारला. त्यांच्या हे लक्ष्यात आले कि कॅमेरा एकदा थांबला आणि परत चालू केला असता दर्शकांना ते समजून येत नाही कि कॅमेरा थांबला आहे. फिल्म बनवण्यासाठी स्टोरीबोर्ड चा उपयोग करू लागले. आणि सेट अप तयार केला. तसे स्टुडिओज निर्माण होऊ लागले. चित्रपटांचा वेळ वाढवला. 1896 साली “द व्हॅनिशींग लेडी” (The Vanishing Lady), 1898 साली द फोर ट्रबलसम हेडस (The Four Troublesome Heads), 1900 “साली जोन ऑफ आर्क” (Joan of Arc), १९०२ साली “अ ट्रिप टू द मून” (A Rrip to the Moon) ह्या शॉर्ट फिल्म तयार केल्या. त्यांनी ५०० हुन अधिक चित्रपट तयार केले. त्यांच्या प्रत्येक फिल्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेडी, साहसी कथा , विज्ञान कथा, असत. त्यांनी आपल्या फिल्म मध्ये काही रंगाचे तर वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट देऊन त्यांनी फिल्म जगात नवीन कल्पना आणली. म्हणून जॉर्जेस मेलिस यांना ग्रॅन्डफादर ऑफ स्पेशल इफेक्ट म्हणतात.