FilmsBiographyHindiHomeSPORTS

झुंड चित्रपट समीक्षा | Jhund Film Review in Marathi

Written by : के. बी.

Updated : मे 1, 2022 | 3:37 PM

 झुंड  चित्रपट समीक्षा  | Jhund Film Review

झुंड

२०२२   सीबीएफसी :- यू / ए   कालावधी : – २ तास ५६ मिनिटे
शैली : – खेळ, नाटक                                               जगभरून फिल्म्स रेटिंग : – 3.७ / 5
लेखक                       : –  नागराज मंजुळे
दिग्दर्शक                   : –  नागराज मंजुळे
कलाकार                   : – अमिताभ बच्चन, अंकुश गेडाम, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, किशोर कदम, भारत                                            गणेशपुरे, सायली पाटील
 
 
Jhund
Jhund
निर्माता                      : –   भूषण कुमार, क्रिशन कुमार, संदीप सिंग
संगीत                        : –  अजय – अतुल
प्रदर्शित तारीख         : –  ४ मार्च २०२२
वेळ                          : –  २ तास ५६ मिनिटे
भाषा                        : – हिंदी
देश                          : –  भारत

कथा :-

विजय बारसे यांनी स्लॅम सॉकर हि फ़ुटबाँल संस्था सुरु केली. जुगार खेळणे, मारामारी करणे, चोरी करणे, अश्या वाईट मार्गाला लागलेल्या मुलांना एकत्र करून त्यांच्या मनात फ़ुटबाँल विषयी प्रेम जागृत करून योग्यरीत्या प्रशिक्षण देऊन त्यांना चांगले जीवन जगण्यास प्रेरणा दिली.

समीक्षा : – 

भिंतीच्या अलीकडे एक वर्ग म्हणजे ते जे उंच उंच इमारती मध्ये राहतात, आणि भिंतीच्या पलीकडे दुसरा वर्ग म्हणजे झोपडपट्टी राहतात. अलीकडेच लोग भिंतीच्या वरून पलीकडे च्या भागात कचरा, वगैरे टाकतात.यातच झोपडपट्टीतील लोक जगत असतात. या दोन्ही वर्गाचे वास्तविकता  तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

“झुंड नही टीम कहीऐ ” हि जी टॅग लाईन मध्येच चित्रपटाचा सार समजेल. झोपडपट्टीतील मुले गुंड गिरी, मारामारी करणे, नशा करणे अशा वाईट सवयी लागल्या आहेत. “भारत मतलब” असा डायलॉग ऐकतो तेव्हा आपण हासतो पण तेव्हा हेही ध्यानात येईल कि शिक्षण किती महत्त्वाचे आहे. यातून हसण्यातून आपल्याला एक चांगला संदेश देऊन जाईल असे काही काम नागराज मंजुळे यांनी केले आहे. चित्रपटातील नायक विजय (अमिताभ बच्चन) यांनी अश्या पलीकडच्या झोपडपट्टीतील मुलांना फ़ुटबाँल खेळाचे मार्गदर्शन करून त्यांना नवीन दिशा दाखवतात. हि दिशा दाखवणे काही सोपे काम नव्हते. झुंड ची टीम कशी झाली  हे काम त्यांनी कसे केलं हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. हा एक खेळातील खेळ चित्रपट जरी असला तरी या खेळातून बरेच काही राजकीय घटक, सामाजिक घटक मांडण्यात आले आहेत. या चित्रपटातून फ़ुटबाँल खेळण्याची प्रेरणा काहींना देऊन जाईन.

फॅण्ड्री, सैराट…. लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या यशानंतर हिंदी चित्रपट सृष्टीत नागराज मंजुळे पाऊल टाकले. त्यांच्या चित्रपटांची नावे खूपच भन्नाट असतात ती मनात घर करून बसतात. चटकन लक्षात राहतील आणि  पटकन बोलून जातील असे ते शब्द असतात. दोन मराठी  चित्रपटातून त्यांनी गावाकडची प्रेम कहाणी दाखवली होती. आता ते नवीन विषय फ़ुटबॉल खेळ बद्दल आहे. याचे हि अतिउत्तम दिग्दर्शन केले आहे.  पहिल्याच हिंदी चित्रपटांत  त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम केले. त्यांच्या कथेला साजेल असा कलाकार ते शोधून काढतात. येणाऱ्या प्रत्येक चित्रपटांत  नवीन कलाकार घेऊन येतात ज्यांना काहीच येत नाही तरी ते त्यांच्याकडून अप्रतिम अभिनय  करवून  घेतात.

महानायक अमिताभ यांच्या सोबत काम करण्याची इच्छा फिल्म मधील सर्वच कलाकार असते. झुंड मध्ये सर्व बरेच नवीन कलाकार आहेत यांना पहिल्याच चित्रपटांतून अमिताभ बच्चन सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्याच बरोबर परश्या आरची हे कोण तुम्हाला ठाऊकच आहे. आकाश आणि रिंकू यांनी हि सैराट सारखा अभिनय केला आहे. सर्वानीच अप्रतिम अभिनय केला आहे.

नागराज मंजुळे यांचा  चित्रपट म्हंटल्यावर एक तरी गाणे अजय अतुल असणारच. याही चित्रपटाला अजय – अतुल यांनी संगीत दिले. यांनी स्वतः ही गाणी गायली आहेत. झुंड मध्ये ४ गाणी आहेत. “आया ये झुंड  है” हे गाणे मला खूप आवडले.

यातील अभिनय, दमदार दिग्दर्शन, संगीत, स्टार देऊन मी झुंड चित्रपटाला ५ स्टार पैकी ३. ६ स्टार दर्जा देतो.

 झुंड हिंदी चित्रपट कुठे बघायचे..?

झी फाइव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म वर बघू शकता.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *