‘द ओडिसी’ चित्रपट परीक्षण: बॉक्स ऑफिस कलेक्शन, ख्रिस्तोफर नोलन यांचे दिग्दर्शन, कथा आणि अभिनय यांचा सखोल आढावा.
‘The Odyssey’ Movie Review: An in-depth look at box office Collection, Christopher Nolan’s direction, the story, and the performances.
Written by : के. बी.
Updated : जुलै 17, 2026 | 12:04 AM
ऑस्कर पुरस्कारांवर वर्चस्व गाजवणाऱ्या ‘ओपेनहायमर’ नंतर ख्रिस्तोफर नोलनचे पुनरागमन, ख्रिस्तोफर नोलन यांचा द ओडिसी (२०२६) हा या दशकातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक उत्सुकतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. यात मॅट डॅमन (ओडिसियस), ॲन हॅथवे (पेनेलोप), टॉम हॉलंड (टेलेमाकस) आणि रॉबर्ट पॅटिन्सन (अँटिनस) यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटात झेंडाया, लुपिता न्योंगो, चार्लीझ थेरॉन, समंथा मॉर्टन या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचे बजेट मूल्य २५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे इंडिया नुसार यांची किंमत २५०० करोड रुपये होतात. हा पौराणिक महाकाव्य चित्रपट तुमच्या जवळच्या सर्वात मोठ्या चित्रपटगृहात जाऊन पाहावा की नाही ते खालील रिव्यू वाचून ठरवू शकता.

| द ओडिसी |
| आधारित | होमरचे ‘ओडिसी’ (Odyssey) |
| लेखक | ख्रिस्तोफर नोलन |
| दिग्दर्शक | ख्रिस्तोफर नोलन |
| कलाकार | मॅट डेमन, ॲन हॅथवे, टॉम हॉलंड, रॉबर्ट पॅटिन्सन, झेंडया, लुपिता न्योंगो, सामंथा मॉर्टन, शार्लीझ थेरॉन |
| निर्माता | एम्मा थॉमस, ख्रिस्तोफर नोलन |
| संगीत | लुडविग गोरानसन |
| उत्पादन कंपनी | युनिव्हर्सल पिक्चर्स, सिन्कोपी |
| वितरित | युनिव्हर्सल पिक्चर्स |
| प्रदर्शित तारीख | १७ जुलै २०२६ |
| भाषा | इंग्लिश |
| डब भाषा | हिंदी, तेलुगु, तमिळ |
| देश | युनायटेड किंगडम |
कथा :-
ट्रोजन युद्धानंतर ओडिसियला घरी जायचे आहे पण घरी परतण्यासाठी दहा वर्षे लागतात हा प्रवास यात चित्रित केला आहे. या प्रवासात त्याला अनेक वेगवेगळया प्रसंगाचा संघर्ष करावा लागतो.
“द ओडिसी” चित्रपट समीक्षा :-
होमरचे महान आणि मूळ महाकाव्य पहिल्यांदाच आयमॅक्स पडद्यावर आणणारा ‘द ओडिसी’ (The Odyssey) चित्रपट १७ जुलै २०२६ रोजी मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित झाला आहे. हा एक भव्य पौराणिक उत्कृष्ट कलाकृती ॲक्शनपट असून, तो अत्याधुनिक आयमॅक्स (IMAX) तंत्रज्ञानाचा वापर करून जगभरातील विविध ठिकाणी चित्रित करण्यात आला आहे. द ओडिसी चित्रपट पूर्णपणे ‘आयमॅक्स ७० मिमी’ (IMAX 70mm) फिल्म कॅमेऱ्यांवर चित्रित झालेला जगातील पहिला चित्रपट आहे. याची मूळ रेकॉर्डिंग पाहण्यासाठी जगभरात फक्त ४० -५० थिएटर उपलब्ध आहेत. भारतात अहमदाबाद मधील गुजरात सायन्स सिटी येथे एकमेव आयमॅक्स (IMAX 70mm) मिमी थिएटर आहे पण ते म्यूजियम म्हणून वापरले जाते. एक मुंबई स्तिथ वडाला येथे आयमॅक्स स्क्रीन ७२ फूट बाय ४१ फूट आहे. बाकीचे स्क्रीन सर्व रेगुलर स्क्रीन मध्ये दिसतात. जे पूर्ण ७०mm च्या रिजोल्यूशन मध्ये दिसत नाहीत. पण तरीही तुम्ही रेगुलर स्क्रीन वर पाहून आनंद घेऊ शकता. जिथे जास्त मोठी स्क्रिन उपलब्ध आहे तिथे जाऊन भव्य दिव्य जास्त आनंद घेऊ शकाल.
कथा पथकथा:
होमर यांच्या प्राचीन ग्रीक महाकाव्य ‘ओडिसी’ वर आधारित असलेला चित्रपट बनवला आहे. मॅट डेमनने इथाकाचा ग्रीक राजा ओडिसियसची भूमिका साकारली आहे. ट्रोजन युद्धानंतर घरी परतण्याचा त्याचा लांब १० वर्षाचा पौराणिक जीवां सारख्या अनेक संघर्षमय प्रवास करत आपल्या पत्नी-मुलाशी पुन्हा एकत्र भेटण्याचे वर्णन केले आहे. हे पाहून तुम्हाला कदाचित “रामायण” या महाकाव्याची आठवण होईल. पटकथा पौराणिक कथा आणि मानवी भावना यांच्यात संतुलन साधले आहे. चित्रपटाची कथा सरळ रेषेत (linear) पुढे जात नाही, तर ती एका गुंतागुंतीच्या पद्धतीने उलगडते. सर्व पात्रे समजून घेण्यासाठी, यात ‘फ्लॅशबॅक-मध्ये-फ्लॅशबॅक’ दिसून येतात. भव्य व्यक्तिरेखा निर्माण कथा खिळवून ठेवणारी राहते. काही प्रेक्षकांना कथानकाची रचना थोडी जड वाटू शकते, परंतु नोलनच्या कथाकथन शैली नक्कीच आवडेल. गुंतागुंतीची रचना करणे हे नोलन यांची वैशिष्ट्यपूर्ण शैली सर्वानाच ठाऊक आहे. ख्रिस्तोफर नोलन यांनी पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे.
तीन तासांचा कालावधी असलेला चित्रपटांत इंटरव्हल नाही आहे. तीन तास पूर्ण बसावे लागणार आहे याची दक्षता घावी.
दिग्दर्शन:
नोलान यांची दूरदृष्टी चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रत्येक पैलू मध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी सिनेमॅटोग्राफर होयटे व्हॅन होयटेमा यांच्यासोबत मिळून एक नवीन कॅमेरा विकसित केला, जो भव्य, महाकाव्यीय दृश्ये आणि जवळचे क्लोज-अप्स दोन्ही प्रभावीपणे टिपण्यास सक्षम आहे. त्यांच्या चित्रपटांत CGI, VFX याची गरज जास्त भासत नाही. त्यांचा सर्व चित्रीकरण प्रॅक्टिकल करण्यात जास्त भर असतो. यामुळे चित्रपटाला अस्सलपणा, वास्तववादी आणि गांभार्य पण प्राप्त होतो. लार्ज-फॉर्मेट सिनेमॅटोग्राफी आणि तल्लीन करणारी ध्वनी रचना प्रत्येक दृश्याला भव्यता प्रदान करते. म्हणून क्रिस्टोफर नोलन यांना सिनेमाच्या सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक मानले जाते.
अभिनय: मुख्य आणि सहाय्यक कलाकार
मॅट डेमन: महान ग्रीक ‘ओडिसियस’ राजाची डेमनने साकारलेली भूमिका केली आहे. त्याने या भूमिकेत प्रभावी शारीरिक उपस्थिती आणि ओडिसियसची बुद्धिमत्ता, चातुर्य आणि भावनिक भावना उत्तमरीत्या टिपली आहे. प्रेक्षकांचे अशा नायकाशी भावनिक नाते जुळते, जो अत्यंत हुशार आणि सक्षम असतो.
ॲन हॅथवे: ‘पेनेलोप’ ओडिसियस राजाची पत्नी ची भूमिका केली आहे. पेनेलोपच्या भूमिकेत ॲन हॅथवेने आपल्या अभिनयातून जिव्हाळा आणि भावनिक खोली आणली आहे. राज्यकारभार आणि भावनिक ओढाताण, या दोन्ही गोष्टी तिने अत्यंत प्रभावीपणे साकारल्या आहेत.
टॉम हॉलंड: ‘सुपरहिरो’ म्हनुन प्रसिद्ध असलेला टॉम ने ओडिसियस राजाच्या मुलाची ‘टेलेमाकस’ ची भूमिका केली आहे. त्यामुळे कदाचित लोकांनी राजाच्या मुलाची भूमिकेत बघू शकणार नाहीत. पित्याची ओढ लागलेली भूमिका आणि भावपूर्ण अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले असून
रॉबर्ट पॅटिन्सन: अँटिनसच्या भूमिकेत हक्क गाजवण्यासाठी तयार असलेली भावना उत्तम केली आहे.
झेंडायाची एथेना – जरी तिला पडद्यावर कमी वेळ मिळाला असला तरी – एक अशी उपस्थिती दर्शवते जी मनाला भावणारी आहे आणि कदाचीत काहींना भावणारी नसेल.
जॉन लेगुइझामो यांनी साकारलेली ‘युमेअस’ची (Eumaeus) भूमिका हा या चित्रपटाचा भावनिक गाभा आहे. त्यांनी एक उत्तम दर्जाची भूमिका केली आहे. जी प्रेक्षकांच्या मनाला भावून गेली.
सहाय्यक कलाकार: उर्वरित कलाकारांचा अभिनयही तितकाच प्रभावी आहे. चार्लीझ थेरॉनची कॅलिप्सो मोहक आणि अस्वस्थ करणारी आहे. तर समंथा मॉर्टनची सर्सी चित्रपटातील सर्वात रोमांचक दृश्यांपैकी एक सादर करते. लुपिता न्योंगो ‘हेलन ऑफ ट्रॉय’ आणि ‘क्लिटेम्नेस्ट्रा’ या दुहेरी भूमिकांमध्ये चमकली असून, तिने दोन्ही पात्रांना खोली आणि गुंतागुंत प्रदान केली आहे. जॉन लेगुइझामो, हिमेश पटेल, इलियट पेज आणि इतर कलाकारांनी मिळून या चित्रपटात काही खरोखरच अविस्मरणीय क्षण साकारले आहेत.
संगीत आणि पार्श्वसंगीत:
अकादमी पुरस्कार विजेते लुडविग गोरानसन यांनी पुन्हा एकदा एक अद्वितीय आणि प्रयोगशील पार्श्वसंगीत (स्कोर) तयार केले आहे. गोरानसन यांनी त्या काळाला साजेसी वाद्ये आणि आधुनिक, वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी यांचा सुरेख मेळ घातला आहे. ध्वनी-रचनेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि चित्रपटातील शांत क्षणही तितकेच प्रभावी ठरले, जितके त्यातील भीषण युद्धप्रसंग होते. “व्हेन आय एम होम” (When I’m Home) हे शेवटचे गाणे चित्रपटाच्या समाप्तीच्या वेळी (end credits) ऐकायला मिळते.
ऑर्केस्ट्रल पार्श्वसंगीत धोका, एकांत आणि विजय यांसारख्या क्षणांचा प्रभाव वाढवते, ज्यामुळे अनेक दृश्ये अविस्मरणीय बनतात.
छायाचित्रण आणि दृश्ये:
आयमॅक्समध्ये चित्रित केलेला आणि चित्तथरारक वास्तववादी ठिकाणांसोबतच अप्रतिम छायाचित्रण असलेला, चित्रपटाचा प्रत्येक फ्रेम मोठ्या पडद्यावर पाहण्यायोग्य वाटतो. सीजीआयवर (CGI) जास्त अवलंबून न राहता, प्राचीन जीव, महासागर, वादळे आणि प्राचीन राज्ये हे सर्व अस्सल वाटतात. होयटे व्हॅन होयटेमा यांचे छायाचित्रण त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट छायाचित्रणांपैकी एक मानले जाते. हॉइट व्हॅन हॉइटेमा यांचे छायांकन उत्कृष्ट आहे; त्यांनी महासागराचे अफाट व भव्य सौंदर्य आणि जहाजाच्या आतील अरुंद जागा, या दोन्ही गोष्टी तितक्याच प्रभावीपणे टिपल्या आहेत. ‘ग्रीन स्क्रीन’वर अवलंबून राहण्याऐवजी प्रत्यक्ष ठिकाणी (actual locations) चित्रीकरण करण्यावर भर देण्यात आला. ‘ट्रोजन हॉर्स’ची (Trojan Horse) निर्मिती ३५ फूट उंच आणि ८,००० पौंड वजनाची रचना म्हणून करण्यात आली होती
चित्रपट काही ठिकाणी संथ गतीत वाटतो कदाचित काही प्रेक्षकाला आवडणार नाही.
प्रेक्षकांची प्रतिक्रिया:
समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. प्रेक्षक चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक करत आहेत, आणि समुद्रातील विशिष्ट, भयानक दृश्यांमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाला ‘मास्टरपीस’ म्हटले. याउलट, काहींनी चित्रपटाचा वेग, संवाद आणि कलाकारांची निवड यांवर टीका केली आहे. या चित्रपटाचे दृश्य आणि ध्वनी-नियोजन (साउंड डिझाइन) विशेषतः मोठ्या पडद्यासाठी तयार करण्यात आले आहे. हा चित्रपट प्रीमियम थिएटरमध्ये पाहणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे पूर्ण चित्रपटाचं आनंद घेऊ शकता.
अंतिम निष्कर्ष:
हे कोणी पहावे?
ख्रिस्तोफर नोलन यांचे चाहते असाल तर नक्की पहा. भव्य साहसी चित्रपटांचे, ग्रीक पौराणिक कथांचे चाहते असाल तर बघा. IMAX आणि मोठ्या पडद्यावरील अनुभव घायचे असेल तर शकता. दृश्यदृष्ट्या नेत्रदीपक आणि भावनिकदृष्ट्या मनाला भिडणाऱ्या चित्रपटांचे चाहते बघू शकता.
तुम्ही हा चित्रपट पहावा का?
नक्कीच. ‘द ओडिसी’ (The Odyssey) हा केवळ एक काल्पनिक साहसी चित्रपट आहेच आणि तो एक भव्य सिनेमॅटिक अनुभव आहे, ज्यामध्ये नेत्रदीपक दृश्ये, उत्कृष्ट अभिनय, भावनिक कथा आणि ख्रिस्तोफर नोलन यांची महत्त्वाकांक्षी चित्रपटनिर्मिती यांचा समावेश आहे. जरी याचा कालावधी आणि गुंतागुंतीची कथा कदाचित प्रत्येकाला आवडणार नाही, तरीही प्रगल्भ प्रेक्षकांसाठी हा या वर्षातील सर्वात अविस्मरणीय सिनेमॅटिक अनुभवांपैकी एक ठरतो.

