‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ (२०२६) समीक्षा – ‘नो वे होम’ नंतरचा टॉम हॉलंडचा सर्वोत्तम स्पायडर-मॅन चित्रपट
‘Spider-Man: Brand New Day’ (2026) Review – Tom Holland’s best Spider-Man movie since ‘Spider-Man: No Way Home’
Written by : के. बी.
Updated : जुलै 31, 2026 | 11:42 PM
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ ट्रेलर प्रदर्शित झाल्याच्या दिवशीच सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपट ट्रेलरपैकी एक ठरला. चित्रपटा बाबत प्रचंड चर्चा आणि उत्साह होता. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळे या चित्रपटाने भारतात विक्रमी आगाऊ बुकिंग (ॲडव्हान्स बुकिंग) केली आहे. टॉम हॉलंडच्या स्पायडर-मॅनचा चौथा स्वतंत्र चित्रपट ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा MCU (मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स) मधला आहे. हा चौथा चित्रपट तुम्ही पाहावा कि नाही हे ठरवण्यासाठी हा रिव्यू नक्की वाचा.

| स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे (Spider-Man: Brand New Day) |
| आधारित | स्पायडर-मॅन ((निर्मिती: स्टॅन ली, स्टीव्ह डिटको) |
| लेखक | ख्रिस मॅकेना, एरिक समर्स |
| दिग्दर्शक | डेस्टिन डॅनियल क्रेटन |
| कलाकार | टॉम हॉलंड, झेंडया, मार्क रफालो, सेडी सिंक, जेकब बॅटालॉन, जॉन बर्नथल, फ्लोरेन्स प्यू, ट्रॅमेल टिलमन, मारिसा टोमेई, |
| निर्माता | केविन फीगी, एमी पास्कल, अवी अराड, रॅचेल ओ’कॉनर |
| संगीत | मायकल जियाचिनो |
| उत्पादन कंपनी | मार्वल स्टुडिओज, कोलंबिया पिक्चर्स, पास्कल पिक्चर्स |
| वितरित | सोनी पिक्चर्स |
| रिलीज तारीख | ३० जुलै, २०२६ |
| भाषा | इंग्लिश |
| डब भाषा | हिंदी, तेलुगु, तमिळ |
| देश | अमेरिका |
कथा :-
पीटर पार्करचे अस्तित्व जगाने पूर्णपणे विसरले आहे, तेव्हा पीटर पार्करला एकाकीपणाचा सामना करावा लागतो. टेलिपॅथिक क्षमता असलेल्या एका नवीन खलनायकाचा सामना करताना आणि आपल्या विकसित होत असलेल्या शक्तींशी आत्मसात करत आहे.
“स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे” चित्रपट समीक्षा :-
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये ३१ जुलै, २०२६ रोजी प्रदर्शित झाला आणि भारतात ३० जुलै, २०२६ पासून रिलीज करण्यात आला आहे. ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला पहिले टॉम हॉलंड चे MCU मधील स्पायडर मॅन चे ३ हि चित्रपट बघितले असेल तर तुम्हाला पीटर ची खरी स्टोरी लगेच समजेल. अन्यथा पीटर प्रकारचे स्टोरी चे जाळे जास्त समजणार नाही.
कथा आणि पटकथा:
‘
ख्रिस मॅकेना, एरिक समर्स आणि जस्टिन कुरिट्झकेस यांनी लिहिलेली पटकथा एक अशी कथा सादर करते जी नाविन्यपूर्ण, वैयक्तिक आणि भावनिकदृष्ट्या मनाला भिडणारी आहे.
‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ च्या तीन स्पायडर मॅन च्या भावपूर्ण समाप्तीनंतर, पीटर पार्कर अशा जगात आहे जिथे त्याला कोणीही ओळखत नाही. जगाला त्याच्या खऱ्या ओळखीची कल्पना नसल्यामुळे, तो एकटा पडला आहे. तो पूर्णपणे एकटा असूनही, ‘स्पायडर-मॅन’ म्हणून एका नवीन व धोकादायक संकटाचाही त्याला मुकाबला करायचा आहे. तो ‘स्पायडर-मॅन’ म्हणून न्यूयॉर्कच्या रक्षणासाठी झोकून देतो. ‘मल्टिव्हर्स’च्या भव्यतेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, ही कथा अधिक वास्तववादी आणि वैयक्तिक प्रवासावर लक्ष्य केंद्रित केले आहे. पीटरला एक परिपक्व व्यक्ती म्हणून विकसित केल्याचे दिसून येते. त्याचा एकटेपणा, अपराधीपणाची भावना, जबाबदारी आणि दृढनिश्चय यांमुळे हे पात्र पूर्वीपेक्षा अधिक जवळचे वाटते. हा चित्रपट मूळ स्पायडर-मॅन कॉमिक्सच्या अधिक जवळचा वाटतो, जिथे पीटर केवळ खलनायकांशीच नव्हे, तर स्वतःच्या आयुष्यातील आव्हानांशीही झुंज देतो.
चित्रपटाची गती सर्वसाधारणपणे उत्कृष्ट आहे. पूर्वार्धात, पीटरचे नवीन वास्तव उलगडायला थोडा वेळ लागतो. ही गती सतत ॲक्शनची अपेक्षा करणाऱ्या प्रेक्षकांना संथ वाटू शकते. मल्टीव्हर्सच्या गोंधळापासून दूर जाऊन, वास्तववादी आणि सहज समजेल अशा कथाकथनाकडे परत येते. पण काही उपकथानकांमुळे थोडा गुंतागुंतीचा वाटतो. मल्टिव्हर्स’मधील पात्रांच्या केवळ ‘कॅमिओ’ (थोड्या काळापुरत्या) भूमिकांच्या पलीकडे जाऊन आणि दैनंदिन जीवनाशी निगडित वास्तववादी कथानकावर लक्ष केंद्रित केले आहे.
सुमारे २ तास २५ मिनिटांचा कालावधी असलेला हा चित्रपट सहजतेने पुढे सरकतो. गंभीर आणि नाट्यमय प्रसंगांना पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे कथानक कधीही जड किंवा अनावश्यकरीत्या लांबल्या सारखे वाटत नाही.
दिग्दर्शन:
‘शांग-ची अँड द लेजेंड ऑफ द टेन रिंग्ज’ (Shang-Chi and the Legend of the Ten Rings) ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी केले होते आणि आता त्यांनी ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ २०२६ चा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यांनी एक अधिक वास्तववादी आणि भावनिकदृष्ट्या प्रभावी स्पायडर-मॅन चित्रपट सादर केला आहे. त्याच्या पूर्वीच्या कामांच्या तुलनेत, या चित्रपटात भावनिक खोली आणि दमदार ॲक्शन यांचा सुरेख संगम साधला आहे.
अभिनय:
टॉम हॉलंड: स्पायडर-मॅनच्या भूमिकेतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. एकाकीपणा, दुःख, आशा आणि जिद्द या भावना त्याने अत्यंत प्रभावी आणि प्रौढ व्यक्तिमत्त्वाची व्यक्तिरेखा उमटवली आहे.
झेंडया: हॉलंडसोबतची तिची केमिस्ट्री जबरदस्त आहे. आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत स्क्रीन टाइम कमी असूनही, झेंडाया प्रत्येक दृश्यात भावनिक, जिवंतपणा आणि उत्कंठा निर्माण करते. पीटर तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी असतानासुद्धा ती आपली तल्लख विनोदबुद्धी टिकवून ठेवते.
सेडी सिंक: एका फरारी तरुणीच्या भूमिकेत सिंकने एक सुखद आणि प्रभावी आश्चर्यचकित करते. तिने अविस्मरणीय अभिनय साकारला आहे आणि कथानकात तिला बळजबरीने आणल्यासारखे अजिबात वाटत नाही. तिची भूमिका MCU मधील मोठ्या बदलांचे संकेत देते.
जॉन बर्नथल (पनिशर) आणि मार्क रफालो (हल्क): पनिशर आणि हलकं दोघांचे ‘कॅमिओ’ (संक्षिप्त भूमिका), या कथेतील गांभीर्य, दमदार ॲक्शन आणि महत्त्व अधिक वाढते. अविस्मरणीय पात्र निर्माण केली आहेत.
संगीत आणि पार्श्वसंगीत:
‘ब्रँड न्यू डे’ (Brand New Day) चे साउंडट्रॅक मायकल जियाचिनो (Michael Giacchino) यांनी संगीतबद्ध केलेले. चित्रपटातील संगीत भावनिक प्रसंग आणि शौर्याचे क्षण यांच्यात उत्कृष्ट संतुलन साधते.
छायाचित्रण आणि दृष्ये:
न्यूयॉर्कचे वातावरण केवळ एक पार्श्वभूमी न वाटता एखाद्या जिवंत भासते. चित्रपटातील ॲक्शन दृश्ये स्पष्ट आणि सहज समजण्याजोगी आहेत. काही दृश्यांमधील कॅमेरा-वर्कमुळे वेग आणि वेगळेपणाची तीव्र जाणीव होते. काही दृश्यांमधील वेगवान ॲक्शन, व्हीएफएक्स, उत्कृष्ट आणि अत्यंत प्रभावी आहेत. स्त्यावरील होणाऱ्या लढाई ची दृश्ये अत्यंत प्रभावी आणि तीव्र वाटतात; यामुळे २००० च्या दशकातील क्लासिक क्राईम थ्रिलर चित्रपटांची शैली आठवते.
प्रेक्षकांची प्रतिक्रिया:
२०२६ मधील MCU च्या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाला आगाऊ बुकिंगमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, सुरुवातीच्या समीक्षकांकडूनही त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडिया वर या चित्रपटाला “टॉम हॉलंडचा सर्वोत्कृष्ट स्पायडर-मॅन चित्रपट” असे म्हटले आहे. पनिशर आणि हल्क ला पाहून थक्क आहेत.
बॉक्स ऑफिस कमाई:
भारतातील पहिल्या दिवसाची एकूण ₹८०.४१ कोटी कमाई केली आहे. जागतिक स्तरावर सुरुवातीची १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक कमाई केली आहे. २०२६ मधील एखाद्या हॉलिवूड चित्रपटासाठी विक्रमी ‘ओपनिंग’ आकडेवारी नोंदवली गेली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच भारतातील ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा ₹५० कोटींच्या पुढे गेला होता.
जागतिक आणि भारतीय बॉक्स ऑफिसवरील कमाई सध्या मोजली जात आहे; आगाऊ तिकीट विक्रीवरून असे दिसून येते की, या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘ओपनिंग वीकेंड्स’पैकी एक ठरण्याची या चित्रपटाला दाट शक्यता आहे.
अंतिम निष्कर्ष:
हा चित्रपट कोणी पहावा?
MCU आणि स्पायडर-मॅनच्या चाहत्यांसाठी: हा एक आवर्जून पाहण्यासारखा सिक्वेल आहे, जो पीटर पार्करच्या प्रवासाचा समाधानकारक आणि भावपूर्ण शेवट सादर करतो. सामान्य प्रेक्षकांसाठी ज्यांना अस्सल भावनांनी नटलेला, वास्तववादी आणि पात्रांवर आधारित सुपरहिरो ॲक्शन चित्रपट पाहायचा आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सुपरहिरो चित्रपट आणि पात्रांवर आधारित कथांचे चाहते असलेल्या आणि जर तुम्हाला ‘स्पायडर-मॅन २’ किंवा ‘नो वे होम’ आवडले असतील, तर प्रत्येकाने हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.
‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’ हे स्पायडर-मॅनचे एक हृदयस्पर्शी, रोमांचक आणि भावपूर्ण साहस आहे, जे प्रेक्षकांना याची आठवण करून देते की पीटर पार्कर हा आतापर्यंत निर्माण झालेल्या महानतम सुपरहिरोंपैकी एक का आहे.
“स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे” चित्रपट कुठे पाहू शकतो..?
आपल्या जवळच्या थिएटर मध्ये बघू शकता. शक्य असेल तर 3D वर पाहावा.
लेखक रेटिंग स्टार :-
उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी ४.० स्टार देईन.
तुम्ही “स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे” चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
“स्पायडर – मॅन : नो वे होम” (2021) चित्रपट – 3 स्पायडर मॅन एकाच चित्रपटांत टॉम हॉलंड, टोबी मॅग्वायर, अँड्रयू गारफिल्ड

