‘धुरंधर (२०२५)’ रिव्यू : बॉक्स ऑफिस कलेक्शन, ओटीटी रीलीज डेट, सिक्वेल रिलीज माहिती आणि नवीन अपडेट्स
‘Dhurandhar (2025)’ Review | Box Office Collection, OTT Release Date, Sequel Release Information and Latest Updates
Written by : के. बी.
Updated : डिसेंबर 28, 2025 | 10:51 PM
धुरंधर ट्रेलर ची चर्चा खूपच झाली. याच चित्रपटाची आतुरता ५ डिसेंबर ला संपली कारण ५ डिसेंबर २०२५ ला धुरंधर रिलीज झाला. आदित्य धर यांनी याचे दिग्दर्शन केले. जिओ स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओज ने प्रोडक्शन केले आहे. मुख्य भूमिकेत रणवीर सिंग यांनी स्पाय एजेंटची भूमिका केली आहे. याच सोबत अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल यांची भूमिका आहेत. असे स्टारर नी समृद्ध केलेला धुरंधर चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन, अभिनय, कमकुवतपणा, एकूण प्रतिसाद कसा आहे आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन रोकॉर्ड्स, ओटीटी रीलीज डेट, धुरंधर चा सिक्वेल कधी येणार याची माहिती करून घेवू.

| धुरंधर (Dhurandhar) |
| लेखक | आदित्य धर |
| दिग्दर्शक | आदित्य धर |
| कलाकार | रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी |
| निर्माता | आदित्य धर, लोकेश धर, ज्योती देशपांडे |
| संगीत | शाश्वत सचदेव |
| उत्पादन कंपनी | जिओ स्टुडिओ, B62 स्टुडिओ |
| वितरित | जिओ स्टुडिओ |
| प्रदर्शित तारीख | ५ डिसेंबर २०२५ |
| भाषा | हिंदी |
| देश | इंडिया |
कथा :-
हा चित्रपट हमजा (रणवीर सिंग) नावाच्या एका गुप्त भारतीय एजंटची कथा सांगतो, जो दहशतवादी कारवाया आतून उद्ध्वस्त करण्यासाठी माफियामध्ये घुसखोरी करतो.
“धुरंधर” चित्रपट समीक्षा :-
‘धुरंधर (२०२५)’ या चित्रपटाला रणवीर सिंगच्या दमदार अभिनयाने सजलेला एक चित्तथरारक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ ही कथा रिअल बेस इंस्पायर्ड स्टोरी आणि सखोल राजकीय संदर्भामुळे तो मतभेद निर्माण करणारा आणि वादग्रस्त ठरला आहे. चित्रपटाचा राजकीय संदर्भ, जो भारत-पाकिस्तान तणाव चित्रपटाला आणखी महत्त्व देतो. यात पूर्ण वेळेत चर्चेत राहनारे रणवीर सिंग पेक्षा जास्त चर्चा डकैत रहमान च्या भूमिकेत दिसणारे अक्षय खन्ना यांचीच चर्चा दिसून येते. चित्रपटाची प्रभावी कथाकथन शैली आणि स्टार पॉवरमुळे ब्लॉकबस्टर ठरला. जवळ जवळ साडेतीन तासांचा कालावधी खूपच जास्त आहे. ज्यामुळे प्रेक्षकांच्या सहनशीलतेची कसोटी लागते. कथानक अधूनमधून एखाद्या ओटीटी मालिकेचे चित्रपटात रूपांतर केल्यासारखे वाटते, ज्यामुळे चित्रपटाची गती वाढली असावी. चित्रपटात ब्रूटल सीन, अति-राष्ट्रवादावर जास्त भर देण्यात आला आहे, जे काही प्रेक्षकांना कदाचित आवडणार नाही. यात आयेशा खान एका गाण्यात डान्स केला आहे.
धुरंधरने केवळ बॉक्स ऑफिसचा इतिहासच नव्हे, तर एक सर्वात मोठा ओटीटी करार सुद्धा झाला आहे. धुरंधर च्या मोठ्या यशामुळे हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वात मोठा ॲक्शन-स्पाय गाथा म्हणून ओळखला जात आहे. एकंदरीत आदित्य धरचा हेरगिरीवर आधारित थ्रिलर चित्रपट बघण्यासारखा आहे. चित्रपटातील तीव्र हिंसा, बृतल कृत्य यामुळे चित्रपटाला सीबीएफसीकडून ‘ए’ (केवळ प्रौढांसाठी) प्रमाणपत्र मिळाले, म्हणून हा चित्रपट १८ वर्षा वरील प्रेक्षक बघू शकतात.
दिग्दर्शन:
थरारक ॲक्शन सीक्वेन्स आणि दिग्दर्शक आदित्य धर यांची उत्कृष्ट चित्रपट निर्मिती शैली प्रेक्षकांना खिळवून ठेवते. धर यांनी वास्तविक घटना आणि काल्पनिक नाट्य यांचा मेळ घालून एक तणावपूर्ण, राजकीयदृष्ट्या भारलेला कथानक तयार केला आहे.
अभिनय:
रणवीर सिंगने आपल्या प्रभावी अभिनयाने पडद्यावर आपली छाप सोडली आहे आणि तीव्रतेने व शांतपणे चित्रपटाला साथ दिली आहे. रणवीर सिंगच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. अक्षय खन्नाच्या रेहमान डकैत च्या भूमिकेत करिश्माई भूमिकेचे कौतुक होत आहे, ज्यामुळे या स्पाय थ्रिलरला गांभीर्य प्राप्त झाले आहे. त्याचे कृत्य थरारक वाटते. जिकडे तिकडे त्यांच्या अभिनयाची चर्चा होताना दिसते. सहाय्यक कलाकार आर. माधवन (अजय सन्याल), संजय दत्त (एस पी चौधरी), अर्जुन रामपाल (मेजर इकबाल) आणि सारा अर्जुन यांनीही चांगले योगदान दिले आहे. अभिनेता राज अर्जुनची मुलगी सारा अर्जुन जमीलची मुलगी यालिनाची भूमिका केली आहे.
साउंडट्रॅक:
चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत शाश्वत सचदेव यांनी दिले आहे. गीत इरशाद कामिल यांनी लिहिले होते. संगीताचे हक्क सारेगामा कंपनीने विकत घेतले होते.
गाणी:
“FA9LA”: सोशल मीडियावर एक व्हायरल हिट गाणे ठरले आहे. याच गाण्यावर अक्षय खन्ना ची एन्ट्री आणि त्यांचा तो डान्स कमालीचा होता. “धुरंधर – टायटल ट्रॅक”: हनुमानकिंड आणि जास्मिन सँडला चे गाणे आहे. अरिजीत सिंग यांनी गायलेले “गेहरा हुआ” एक भावपूर्ण गाणे आहे. दिलजीत चे पंजाबी वाइब्स देणारं “तेरी नी करण” गाणे आहे. “इश्क जलकर”: चित्रपटातील एक सुंदर संगीत. जास्मिन सँडला “शरारत” हे गाणे गायले आहे. “मूव्ह (ये इश्क इश्क)”: सोनू निगम यांनी गायले आहे
धुरंधर बॉक्स ऑफिस केलेक्शन:
भारतीय कलेक्शन: २३ दिवसांत, धुरंधरने भारतात अंदाजे ₹६६८ कोटींची कमाई केली आहे, ज्यामुळे त्याने ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटाच्या एकूण कमाईला मागे टाकले आहे.
जगभरातील कलेक्शन: या चित्रपटाने २१ दिवसांत जगभरात ₹१,००० कोटीं च्या क्लबमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे तो २०२५ सालचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.
भारतातील २३ तारखेचे नेट निव्वळ कलेक्शन २०.५ कोटी रुपये होते, मागील दिवसाच्या तुलनेत ३६.६७% वाढ झालेली दिसून येते.
ओटीटी प्रदर्शनाचे तपशील:
धुरंधर कोणत्या प्लॅटफॉर्म वर पाहू शकतो?
नेटफ्लिक्सने ‘धुरंधर’ चित्रपटाचे डिजिटल हक्क रुपयांनी विकत घेतले आहेत. चित्रपटाच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे, त्याची किंमत ₹२६० कोटी रुपये पेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. धुरंधर चित्रपट नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्म वर पाहू शकता. हा चित्रपट तेलुगू आणि इतर प्रादेशिक भाषांमधील डब केलेल्या आवृत्त्या अपेक्षित आहेत.
धुरंधर ओटीटी रीलीज तारीख काय आहे?
धुरंधर चित्रपट जानेवारी महिन्याच्या एंडिंग ला ३० जानेवारी, २०२६ ला ओटीटी वर रिलीज होईल.
धुरंधर २ – सिक्वेलच्या बातम्या:
निर्मात्यांनी पुष्टी केली आहे की हा स्पाय थ्रिलर चित्रपट “धुरंधर” चा सिक्वेल नवीन ट्विस्ट आणि मोठ्या आव्हानांसह आपले विश्व दाखवणार आहेत. हा सिक्वेल हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
धुरंधर २ रीलीज तारीख:
‘धुरंधर २’ चित्रपट रिलीज ची तारीख १९ मार्च, २०२६ अशी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे, जी ईद च्या दोन दिवस अगोदर रिलीज तारीख असणार आहे.
हा सिक्वेल यश, नयनतारा, कियारा अडवाणी आणि दिग्दर्शक गीतू मोहनदास यांचा ‘टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या चित्रपटाशी स्पर्धा करणार आहे, कारण तो हि चित्रपट १९ मार्च ला रीलीज होणार आहे. ज्यामुळे ईद २०२६ मधील ही एक सर्वात मोठी बॉक्स ऑफिस लढाई ठरणार आहे हे नक्की.
Dhurandhar movie review 2025
Ranveer Singh Dhurandhar performance
Aditya Dhar Movie
Dhurandhar box office collection 2025
Dhurandhar OTT release Netflix
Dhurandhar 2 Sequel News release date

