Monday, May 4, 2026
Latest:
HomeFilmsMarathi

राजा शिवाजी (२०२६) रिव्यू: कलाकार, कथा, दिग्दर्शन, संगीत बद्दल संपूर्ण माहिती.

Raja Shivaji (2026) Review: Complete Information on Cast, Story, Direction, and Music.

Written by : के. बी.

Updated : मे 03, 2026 | 09:04 PM

फेब्रुवारी २०२४ मध्ये याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. मुंबई, सातारा, वाई, महाबळेश्वर आणि पश्चिम घाट या भागांत याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. मुंबई फिल्म कंपनी’ आणि ‘जिओ स्टुडिओज’ यांच्या अंतर्गत जेनेलिया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर वाचूया बहुचर्चित “राजा शिवाजी” मराठी चित्रपट समीक्षा.

Raja Shivaji (2026) Review: Complete Information on Cast, Story, Direction, and Music.
राजा शिवाजी (Raja Shivaji)
२०२२, जीवनचरित्र, ॲक्शन, ड्रामा, हिस्टरी. ३ तास ७ मिनिटे. [UA १६+]
लेखकअजित वाडेकर, संदीप पाटील, रितेश देशमुख
दिग्दर्शकरितेश देशमुख
कलाकाररितेश देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, भाग्यश्री, विद्या बालन, जेनेलिया डिसोझा, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, फरदीन खान, बोमन इराणी, मोहित टाकळकर
निर्माताज्योती देशपांडे, जेनेलिया डिसोझा
संगीत अजय-अतुल
उत्पादन कंपनीमुंबई फिल्म कंपनी, जिओ स्टुडिओ
वितरितजिओ स्टुडिओ
प्रदर्शित तारीख१ मे २०२६
भाषामराठी
डबिंग भाषाहिंदी
देशभारत
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – ३.५⭐/ ५

कथा :- 

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून एक निर्भय योद्धा उभा राहतो, जो आपल्या प्रजेला एकत्र करतो, बलाढ्य साम्राज्यांना (आदिल शाही, निजाम शीही, मुघल) आव्हान देतो. असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणादायी शौर्य गाथा. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून एक निर्भय योद्धा उभा राहतो, जो आपल्या प्रजेला एकत्र करतो, बलाढ्य साम्राज्यांना (आदिल शाही, निजाम शीही, मुघल) आव्हान देतो. असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणादायी शौर्य गाथा. लाकुकजी लखुजी जाधव यांच्या मृत्यू पासून ते अफजल खानाचा वध पर्यंत चा इतिहास.

क्रांतीज्योती विद्यालय” चित्रपट समीक्षा :-

आज पर्यंत बनवलेला सर्वात महागडा मराठी चित्रपटांपैकी एक मानला जातोय. आणि १०० कोटी रुपयांच्या बजेटवर निर्मित असलेला हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेला “राजा शिवाजी” (२०२६) हा चित्रपट रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला एक भव्य मराठी – हिंदी ऐतिहासिक महाकाव्यपट निर्माण केला आहे. यांत अजय-अतुल यांचे संगीत, प्रसिध्द कलाकारानी नटलेला हा चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशास वाहिलेली एक सिनेमॅटिक आदरांजली ठरतो. ‘राजा शिवाजी’ भव्यता, संगीत आणि चित्तथरारक दृश्यांच्या माध्यमातून इतिहासाला जिवंत करतो. आपल्या भव्य व्याप्तीमुळे, अप्रतिम अभिनयामुळे आणि अजय-अतुल यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या संगीतामुळे, हा चित्रपट केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातीत वारशाला आदरांजलीच अर्पण करत नाही, तर प्रादेशिक चित्रपटसृष्टीसाठी एक नवा मापदंडही प्रस्थापित करतो.

लेखन: पटकथा अजित वाडकर, संदीप पाटील आणि रितेश देशमुख यांनी सह-लेखन केली आहे, तर संवाद प्राजक्ता देशमुख यांनी लिहिले आहेत.
दिग्दर्शन: ‘लाई भारी’, ‘माऊली’ आणि ‘वेड’ या चित्रपटांनंतर, रितेश यांची निर्मिती असलेला हा चौथा मराठी चित्रपट आहे. रितेश देशमुख यांनी भव्यता आणि भावनिक खोली यांचा सुंदर समतोल साधला आहे. त्या काळातील पॉलिटिकल विचार, मक्तेदारी यांची सांगड योग्य पद्धतीने मांडण्यात आली आहे.

भूमिका:
रितेश देशमुख – छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका योग्यरीत्या केली आहे. पण काहींना ती रुचणारी नाही.
राहिल देशमुख – तरुण शिवाजी भूमिका केली जे रितेश देशमुख यांचे पुत्र आहेत.
संजय दत्त – अफजल खानाची भूमिका उत्तम निभावणारे संजय दत्त हुबहुबे अफजल दिसतात तसाच दिसत असावा. त्यांची देहयष्टी आणि बोली सुद्धा.
अभिषेक बच्चन – संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका उत्तम केली आहे, फक्त हिंदी बोलत असताना त्यांचा आवाज रेगुलर चा असतो आणि मराठीत बोलताना त्यांचा आवाज थोडा वेगळा आणि मोठ्या भरदार आवाजात वाटतो. तिथे थोडेसे कानाला रुचत नाही.
विद्या बालन – बडी बेगम ची भूमिका त्या बडी बेगमच दिसतात. त्यांची बोलण्याची, इशाऱ्याची नजर मनात घर करून जाते.
जेनेलिया देशमुख – सईबाई ची भूमिका उत्तम केली आहे. मराठी चांगल्या प्रकारे बोलले जाणवते.
भाग्यश्री – जिजाबाई ची भूमिका उत्तम केली आहे.
सचिन खेडेकर – शहाजी भोसले यांची भूमिका अस्सल वाटते. जणू काय शहाजी बोलतात.
अमोल गुप्ते – आदिल शहा
महेश मांजरेकर – लखुजी जाधव चित्रपटाची सुरुवात यांच्या पासूनच होते.
फरदीन खान – शाहजहान
बोमन इराणी, जितेंद्र जोशी – सहाय्यक भूमिका
सलमान खान – जीवा महालाच्या भूमिकेत विशेष भूमिका ची एन्ट्री टॉप लेवल ची वाटते. त्यांनी केलेली सवांद बाजी खूप भारी वाटते. तो डायलॉग पुन्हा पुन्हा ऐकावसा वाटतो.

संगीत आणि पार्श्वसंगीत: अजय-अतुल यांचे पार्श्वसंगीत प्रभावी आहे जे सुरुवाती पासून ते शेवट च्या क्षणापर्यंत संगीत मोहून टाकते. प्रत्येक मेन भूमिकेला साजेल अशी नवीन धून तयार केलीली ऐकायला फार मोहून जाते. अजय-अतुल यांच्या रचनांमध्ये पारंपरिक मराठी लोकसंगीत आणि वाद्यवृंदाचा भव्य डौल यांचा एक सुंदर मिलाफ नेहमी ऐकायला मिळतो.
छत्रपती’: अजय गोगवले यांनी गायलेले ‘छत्रपती’ गाणे खरोखरच मंत्रमुग्ध करणारे आहे जी एक उत्साहपूर्ण छत्रपती ऊर्जा निर्माण करते.

नृत्य दिग्दर्शन रेमो डिसूजा यांनी केले आहे. त्यात सिद्धार्थ जाधव सुद्धा नृत्य करताना दिसतात.

व्ही. एफ. एक्स. : भव्य युद्धदृश्ये आणि किल्ल्यांची पुनर्रचना हे अत्याधुनिक विशेष प्रभाव सादर करतात. पण काही ठिकाणी व्ही. एफ. एक्स कमकुवत दिसते. जसे कि २ हत्तीचे लढाई दृश्य म्हणावे तसे जिवंत वाटत नाही. रात्रीचा पाण्यातील सीन थोडा डार्क आणि आगीचा प्रकाश हवा होता.

छायाचित्रण: संतोष सिवन यांनी पश्चिम घाटातील किल्ले, युद्धाचे प्रसंग आणि विस्तीर्ण दृश्ये उल्लेखनीय कौशल्याने चित्रित केली आहेत.

संपादन: तीन तासांपेक्षा जास्त कालावधी असूनही, उर्वशी सक्सेनाने चित्रपटाची गती यशस्वीपणे कायम ठेवली आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद:
प्रेक्षक: थरारक युद्धप्रसंग, हृदयस्पर्शी संवाद आणि शिवाजी महाराजांच्या वारशाबद्दल वाटणारा नितांत अभिमान.

अंतिम निष्कर्ष:
इतिहासप्रेमी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांसाठी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा आहे. अजय-अतुल यांचे संगीत आणि संतोष सिवन यांचे दृश्यदिग्दर्शन ‘राजा शिवाजी’ला एक ‘अवश्य पहावा’ असा ऐतिहासिक चित्रपट बनवतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *