HomeFilms News

मुव्ही म्हणजे काय….?

Written by : के. बी.

Updated : फेब्रुवारी 1, 2022 | 6:31 PM

 

 मुव्ही म्हणजे काय……? 

          एकविसाव्या शतकामध्ये मुव्ही म्हणजे काय….? असा प्रश्न कोणी कोणास केला असेल असे काही मला वाटत नाही. जर का चुकून तुम्ही कोणाला विचारले तर काहीजण म्हणतील काहीही प्रश्न विचारतो. तुला काय माहित नाही का.? उगाच वेळ वाया घालवू नकोस…  माझा. तूच सांगणा मला. मला माहित आहे पण मी काय सांगणार नाही. काहीजण बोलतील पडद्यावर लागतो तो मुव्ही. थेटर मध्ये लागतो तो मूव्ही, टीव्ही मध्ये पाहतो तो मुव्ही. मोबाइललात बगतो तो मुव्ही. हीरो, हीरोइन ची स्टोरी असलेला मुव्ही. हीरो, व्हिलेन ची फायटिंग असलेला मुव्ही. काहीजण गप्प बसतील, काहीजण तुमच्याकडे बघून तुम्हाला हासतील आणि बोलतील कि हा काय प्रश्न विचारलाय. पण काहीही  बोला मुव्ही शब्द आपल्या कानावर पडला कि आपल्याला एकच डोळ्यासमोर दिसु लागतं ते हीरो, हीरोइन, व्हिलेन, स्टोरी, सॉंग्स  यांनी उभारलेलं एक व्हिडिओ.

Film..

मुव्ही ची व्याख्या करायची झाली तर खालील प्रमाणे अशी होऊ शकते. 

          घडलेली या सुचलेली कल्पना यातून निर्माण झालेल्या कथेतून निर्माण होणारे वातावरण, विविध पात्रे आणि त्यांच्यातील संवाद, यांचे रेकॉर्डिंग एकत्रित करून चालणारे चलचित्र म्हणजे “मुव्ही” असे म्हणता येईल. 

मुव्ही याला बऱ्याच नावांनी ओळखले जाते, जसे आपण मराठी मध्ये चित्रपट म्हणतो. इंग्लिश मध्ये मुव्हीज, फिल्म, सिनेमा,असेही म्हणतात. असे कोणीच म्हणणार नाही कि मला मुव्ही आवडत नाही या मी एकही मुव्ही बघितला नाही. खेड्यापासून ते शहरापर्यंत आणि लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यानांच मुव्ही बगायला आवडत असतो आणि ते आवर्जून पाहतात सुद्धा. आपापल्या आवडी निवडी नुसार वेगवेगळ्या प्रकारचे मुव्ही बघत असतात. मी हि पाहतो आणि तुम्हीपण पाहत असाल यात काहीच शंका नाही.

कृपया जर का तुम्ही तुमच्या मित्राला, तुमच्या फॅमिली मधील या इतर कोणालाही मुव्ही म्हणजे काय….? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्या प्रश्नांचे दिलेले उत्तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करायला विसरू नका. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *