HomeFilmsSouth Indian

‘टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ रिव्यू: रॉकिंग स्टार यश यांचा ५ नायिका सोबत असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट

‘Toxic: A Fairy Tale for Grown-ups’ Review: Rocking Star Yash’s highly anticipated film featuring five leading Actress.

Written by : के. बी.

Updated : ऑगस्ट 26, 2026 | 12:14 PM

      टॉक्सिक चा ट्रेलर ८ ऑगस्ट २०२६ रोजी रिलीज करण्यात आला होता. आणि त्या ट्रेलर ला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. खरं पाहता हा चित्रपट धुरंधर रिलीज झाला तेव्हाच होणार होता पण काही कारणास्तव टॉक्सिक ची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आली. २६ ८ २६ हि चित्रपटाची तारीख ट्रेलर मध्ये दाखविण्यात आली. फायनली हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शन केले असून, यात  यश, नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.त्यामुळे हा चित्रपट बचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला आहे. याचे चित्रपट पाहण्यासाठी दमदार ऍडव्हान्स बुकिंग झाले आहे. तर खरंच हा चित्रपट KGF टक्कर देईल कि नाही. यश सोबत इतर ५ नायिकांचे काम कसे आहे. पूर्ण चित्रपट कसा आहे? पाहावा कि नाही त्याची पूर्ण समीक्षा वाचूया. 

'Toxic: A Fairy Tale for Grown-ups' Review: Rocking Star Yash's highly anticipated film featuring five leading Actress.
टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स (Toxic: A Fairy Tale for Grown-Ups)
२०२२, ॲक्शन, क्राईम, थ्रिलर. ३ तास १४ मिनिटे. [A]
लेखकयश, गीतू मोहनदास
दिग्दर्शकगीतू मोहनदास
कलाकारयश, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया, रुक्मिणी वसंत
निर्माताव्यंकट के. नारायण, यश
संगीतरवी बसरूर, विशाल मिश्रा, तनिष्क बागची, फहीम अब्दुल्ला, अर्सलान निजामी,
उत्पादन कंपनीकेव्हीएन प्रॉडक्शन, मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स एलएलपी
रिलीज तारीख२६ ऑगस्ट २०२६
भाषाहिंदी
बजेट₹ 500 कोटी
देशइंडिया
“जगभरून फिल्म्स (Jugbharun Films)” रेटिंग : – .८⭐/ ५

कथा:
गुन्हेगारी, विश्वासघात, कौटुंबिक संघर्ष आणि पिता-पुत्रांमधील गुंतागुंतीच्या नात्याचे जग दर्शवतो. बाप आणि मुलगा यांच्यातील भावनिक संघर्ष.

टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स” चित्रपट समीक्षा :-

KGF: Chapter 2′ नंतर यशच्या चाहत्यांची दीर्घ प्रतीक्षा संपवत, साडेचार वर्ष नंतर नवीन चित्रपट बनवला आहे. ‘Toxic: A Fairy Tale for Grown-Ups’ हा चित्रपट अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा महत्त्वाकांक्षी ‘पिरियड गँगस्टर ॲक्शन ड्रामा’ चित्रपट गुन्हेगारी, कौटुंबिक संघर्ष, हिंसाचार, सत्ता आणि प्रायश्चित्त यांसारख्या घटकांना सादर करतो. हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरात कन्नडा भाषेसोबतच हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांमधील डब केलेल्या आवृत्त्यांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. याचे डबिंग कन्नडा आणि इंग्लिश मूळ रेकॉर्डिंग झाले आहे.

‘टॉक्सिक’ (Toxic) हा चित्रपट दृश्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी आहे आणि यात यशने दमदार अभिनय केला आहे. ‘टॉक्सिक’ चित्रपटात यश दुहेरी भूमिकेत दिसून येतो. त्याचे झालेले रूपांतर विशेषत त्याचा क्लीन-शेव्हन (दाढी नसलेला) आणि तरुण लूक यामुळे ऑनलाइन विश्वात मोठी चर्चा रंगली आहे. एक नवीन सादरीकरण दिसून येते. यश चाहते आवर्जून पाहतील. असे शी काही सीन आहेत. दाढी असलेला लुक दर्जदार आहेच त्यात कोणीच शंका काढू शकत नाही. त्या गँगस्टर ला साजेल असे परिधान लुक योग्य रित्या दिसून येतात. त्याचे चालणे, वागणे, बोलणे त्याची लढण्याची ताकद ते पाहण्याची मज्जा, अटीट्युड वेगळाच असतो. ती मज्जा, तो अटीट्युड या चित्रपटांत मिळून जातो.

नेहमीच दिसून येणाऱ्या पुरुष-प्रधान ‘ॲक्शन-मास एंटरटेनर्स’ च्या म्हणजे भरपूर ॲक्शन आणि मनोरंजनाचा मसाला असलेल्या चित्रपटांच्या तुलनेत ‘टॉक्सिक’ चित्रपटांतून एक वेगळेच चित्र पाहायला मिळते. यात नयनतारा, कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांसारख्या अभिनेत्रींनी साकारलेल्या भूमिका केवळ दुय्यम उपकथानकांपुरत्या मर्यादित नसून, त्या स्वतंत्र आणि प्रभावी व्यक्तिरेखा म्हणून मांडल्या गेल्या आहेत. ते पाहण्यात डोळे गुंग होतील. यशचे वर्चस्व आहे, तसेच नयनतारा, कियारा अडवाणी आणि इतर प्रमुख अभिनेत्रींच्या भूमिकाही महत्त्वपूर्ण वाटतात.

गडद आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरण असलेला चित्रपट गँगस्टर/गुन्हेगारी-प्रधान आणि धडाकेबाज ॲक्शन दुनियेत घेऊन जातो. सुरुवातीच्या क्षणांत धक्कादायक दृश्ये, अति-हिंसा आणि प्रौढ विषयांवर अधिक भर देण्यात आला आहे. गडद वातावरणनिर्मिती आणि भव्य ॲक्शन दृश्ये सर्वात मोठी बलस्थाने आहेत. दुहेरी भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे, पण संवादफेकीवर थोडे अतिशयोक्ती वाटतात.

कथा पथकथा:
गीतू मोहनदास यांची कथा असून यात यश यांनी हि पथकथा लिहिली आहे. ‘टॉक्सिक’ (Toxic) हा चित्रपट स्वातंत्र्योत्तर काळातील गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे; जिथे गुन्हेगारी टोळ्या, तस्करी, सत्तेसाठीचा संघर्ष आणि निष्ठांची विभागणी या गोष्टी पात्रांचे आयुष्य घडवतात. या चित्रपटात यश दुहेरी भूमिकेत असून, ‘राया’ आणि त्याचा मुलगा ‘तिकीट’ हे या कथेतील मुख्य पात्र आहे. कथा सांगण्याची शैली प्रेक्षकांच्या मतांमध्ये विभागणी करू शकते. कथेचा सार शेवटी क्लायमॅक्स ला समजते, तो पर्यंत स्टोरी जास्त काही समजत नाही. कथेचे प्रेझेन्टेशन जास्त काळ राहत नाही. पटकथेतील सुसंगततेचा अभाव ही चित्रपटाची सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे. कथेचा वेग वाढत जात फास्ट मोड मध्ये असल्याचे भासते. कोणते पात्र आहे कोणाचे आहे तेही लवकर समजत नाही.

दिग्दर्शन:
गीतू मोहनदास यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शिका गीतू मोहनदास ‘गँगस्टर’ प्रकारच्या चित्रपटांमध्ये महिलांचा एक नवा दृष्टिकोन घेऊन येतात ही एक अशी शैली आहे जी धाडस, अतिवास्तववाद आणि विस्कळीत संपादन यांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ५ नायिकेचे उत्तम प्रकारे स्टोरीला साजेल असे काम करून घेतले आहे. स्त्री पात्रांचे कर्तृत्व आणि भावनिक खोली अधोरेखित केली आहे. ‘KGF’ चा फॉर्म्युला वापरल्या सारखे वाटते.

अभिनय:
यश: ‘राया’ या एका धोकादायक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या गँगस्टरच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. एक प्रौढ आणि तरुण वयाच्या दोन्हीही भूमिका उत्तम केल्या आहेत.
कियारा: कियारा अडवाणीची प्रभावी भूमिका आणि ‘नादिया’ ची महत्त्वपूर्ण भूमिका मिळाली आहे. चित्रपटाच्या ग्लॅमरस आणि तीव्र (intense) विश्वात ती अगदी सहजपणे सामावून जाते.
नयनतारा: नयनताराने चित्रपटात आणलेली भावनिक खोली या गोष्टींची दखल घेतली आहे.
हुमा कुरेशी: कलाकारांच्या समूहात हुमा कुरेशी एक वेगळा ठसा उमटवतात आणि त्यांच्या अभिनयात काही प्रभावी क्षण पाहायला मिळतात.
रुक्मिणी वसंत आणि तारा सुतारिया: चित्रपटात जरी यशचे वर्चस्व असले, तरी या दोन्ही अभिनेत्रींनी कलाकारांच्या फळीत मोलाची भर घातली आहे.

अपेक्षित प्रमाणपत्र: ‘A’ प्रमाणपत्र (केवळ प्रौढांसाठी). हिंसा आणि प्रौढांसाठीची सामग्री: या चित्रपटाला ‘A’ (केवळ प्रौढांसाठी) प्रमाणपत्र मिळाले आहे; यात हिंसा, धूम्रपान/मद्यपान आणि प्रौढांशी संबंधित विषयांचे चित्रण करणारे दृश्य आहेत.

संगीत आणि पार्श्वसंगीत:
‘Toxic’ या चित्रपटात संगीत हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात विशाल मिश्रा यांची गाणी आणि रवी बसरूर यांचे पार्श्वसंगीत आहे. रोमान्स, गडद भावनिक छटा, सुमधुर चाल आणि जबरदस्त ॲक्शन यांचा एक अनोखा मिलाफ साधण्याचा प्रयत्न केला आहे. यातील गाणी अतिशय आक्रमक किंवा विसंगत असल्याचे एकायला वाटते. पुन्हा पुन्हा ऐकावी असे वाटत नाही.
गाणी:
“ताबाही” (Tabahi): विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे तीव्र भावना आणि सूडाच्या भावनेने ओतप्रोत भरलेले आहे; हे गाणे चित्रपटाच्या गडद भावनिक पार्श्वभूमीला अधोरेखित करते.
“मदहोश” (Madhosh): यश आणि तारा सुतारिया यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे अत्यंत सुमधुर आणि रोमँटिक आहे. यात एक वेगळी शैली आणि जिव्हाळ्याची भावना दिसून येते.
पार्श्वसंगीत: रवी बसरूर रवी बसरूर यांनी पार्श्वसंगीताची धुरा सांभाळली आहे. यशची गँगस्टरची व्यक्तिरेखा आणि चित्रपटातील ॲक्शन दृश्ये यांना उत्तम प्रकारे पूरक ठरतात. चित्रपटाच्या घोषणेवेळी प्रदर्शित झालेले थीम साँग “Introducing Raya – Daddy is Home” हे स्पष्ट करते की ‘राया’ (Raya) या पात्राची एक वेगळी आणि अनोखी संगीत-ओळख आहे. यशची एन्ट्री आणि ॲक्शन दृश्यांच्या वेळी ऐकायला चांगले वाटते.

संपादन आणि कालावधी:
काही दृश्ये दृष्यदृष्ट्या प्रभावी आहेत, परंतु ती कथानकाला पुरेशा प्रमाणात पुढे नेत नाहीत. एक कट दुसरा सीन चालू, दुसरा कट तिसरा सीन चालू असे अनेक सीन कट केल्यामुळे त्या सीन शी प्रेक्षक जोडून नाही राहत. मला वाटते की या बाबतीत चित्रपट अधिक चांगला होऊ शकला असता. काही वेळा असे वाटते की अधिक सुटसुटीत संपादनामुळे ‘टॉक्सिक’ला फायदा झाला असता. ३ तास ​​१४ मिनिटांचा कालावधी असल्याने, चित्रपटाचा वेग (पेसिंग) प्रेक्षकांसाठी एक समस्या ठरू शकतो. ३ तास ​​आणि १४ मिनिटांच्या कालावधीमुळे, ‘टॉक्सिक’ प्रेक्षकांकडून खूप अपेक्षा ठेवतो.

छायाचित्रण आणि दृश्ये:
प्रभावी वातावरणनिर्मिती करणारे उच्च दर्जाचे छायाचित्रण आणि उत्कृष्ट ॲक्शन कोरिओग्राफी उत्तम करण्यात आली आहे. त्यातील एक सीन नकीच नमूद करावा असा वाटतो तो म्हणजे. प्रौढ यश आणि तरुण यश यांच्यातील फायटिंग सीन मधला फिरलेला कॅमेरा उत्तम दर्जाचे छायाचित्रण झालेले दिसते.
दृश्यात्मक भव्यता आणि प्रभावीपणे साकारलेले जग आपल्याला पाहायला मिळते. गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट ‘निओ-नॉइर’ (neo-noir) दृश्य शैलीचा वापर करून एक वास्तववादी सौंदर्यदृष्टी सादर करतो. सर्कसची संकल्पना आणि बर्फाच्छादित पर्वतांच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेले व ॲक्शन दिग्दर्शक जे.जे. पेरी (जॉन विक) यांनी दिग्दर्शित केलेले स्टायलिश ॲक्शन सीक्वेन्स ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भव्य संच (सेट्स), बर्फाच्छादित पर्वतांवरील लढाया, सर्कसशी संबंधित घटक, भव्य ॲक्शन, स्फोट, असाधारण निर्मिती-रचना निर्माण केलीली दिसते. फक्त बंदुकीच्या गोळ्याचा विषय सोडून बाकीचे ॲक्शन ठीक आहेत. कोण कोणाला गोळी मारतोय तेच समजत नाही. यात काही लॉजिक लावून चालणार नाही.

प्रेक्षकांची प्रतिक्रिया:
प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामुळे हा चित्रपट या वर्षातील एक प्रमुख ‘पॅन-इंडिया’ (संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणारा) चित्रपट म्हणून समोर आला आहे. हा चित्रपट आणि त्याच्या प्रसिद्धीच्या मोहिमेमुळे समीक्षक, चाहते व चित्रपटसृष्टीतील विश्लेषक यांच्यात मोठी चर्चा रंगली आहे.

अंतिम निष्कर्ष:
हा चित्रपट कोणी पहावा?
यश च्या फॅन नि नक्की पाहावा. यात पण त्यांची kgf प्रमाणे देहबोली, एन्ट्री दमदार आहे.
गँगस्टर चित्रपट आवडणारे नक्की पाहावे. आणि हाय-ॲक्शन आवडणारे पाहू शकता.
जर तुम्ही ‘केजीएफ’ (KGF) सारख्या सरळसोट ‘मास एंटरटेनर’ची अपेक्षा करत असाल, तर तुमची निराशा होऊ शकते. तरीही, जर तुम्हाला वेगळ्या शैलीतील ‘डार्क’ आणि हिंसक गँगस्टर चित्रपट आवडत असतील, तर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखा आहे.

“टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स” चित्रपट कुठे पाहू शकतो..?

आपल्या जवळच्या थिएटर मध्ये बघू शकता.

लेखक रेटिंग स्टार :-

उत्तम दिग्दर्शन, भूमिका, व्ही. एफ. एक्स. ॲक्शन यासाठी माझ्याकडून ५ स्टार पैकी १.८ स्टार देईन.

तुम्ही “टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स” चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *